Ujwala Rahane

Others

4.2  

Ujwala Rahane

Others

थेंबें थेंबें तळे साचे

थेंबें थेंबें तळे साचे

1 min
233


पुस्तकाच्या कपाटात पुस्तके शांतपणे विश्रांती घेत होते. Lockdown आणि या विचित्र साखळीत बिचारे अडकले होते.

पुस्तकप्रेमी ना त्यांना भेटू शकत होते ना पुस्तके त्यांना. सतत वेगवेगळ्या वाचकांच्या हाती अगदी मानाने विसावणारे, ज्ञानाचे अमृत पाजणारे, आज भुकेले होते.

शेवटी मनातल्या लेखकाला एक युक्ती सुचली. Online एक साहित्यवेडी, साहित्यिकांची सभा भरवली.

साहित्याशी निगडित सगळ्याच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावणार्‍या सगळ्याच चल, अचल सदस्यांना आमंत्रित केले.

त्यात लेखक, कागद, लेखणी हे ही आमंत्रित होते.वाचकाला संमेलनाध्यक्ष बनवले. विषय ठेवला,

'एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ'.

व्यासपीठावरून परीचय करून देताना, प्रत्येकातला अहंपणा जाणवत होता.तू तू मै मै मध्ये संमेलन रंगलेले.

मी लिहते म्हणून लेखकाचे विचार, वाचकांपर्यत पोंहचतात लेखणी उवाच!

माझ्यावर उमटतात म्हणूनच स्मरणानिय होतात इति कागदराव!

माझी विचारशृंगला म्हणूनच ते चितरतात, लेखकाची टिमकी!

आपण सगळे येथे विशिष्ठ उद्देशाने आलेले आहोत, याचे भान ठेवा.

एकमेकांच्या सहकार्यानेच साहित्यनिर्मिती होते यात शंकाच नाही.

वाचकवर्गही याला सहमत आहेच.अहंकार मिटवून एकोप्याने कार्यरत रहाल तर, साहित्यिक बगीचा फुलून, सुंदर साहित्याची निर्मिती होईल.

साहित्यरूपी बागेतील ज्ञानार्जनासाठी वाचकवर्ग उत्सुक आहेच, आता तुम्हीच ठरवा.

वाचकाने छानशा अभिप्रायाने कार्यक्रमाचा समारोप केला.


Rate this content
Log in