Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

स्वीकार

स्वीकार

3 mins
16


 स्वीकार करणं म्हणजेच एखादी गोष्ट विना तक्रार मान्य करणे.

  हा स्वीकार कशाचा करायचा?तर स्वतःचा,इतरांचा, परिस्थितीचा करायचा आहे. परिस्थिती अनुकूल असू देत प्रतिकूल असू देत. आपल्याला फरक पडता कामा नये.

 वाईट गोष्ट घडली तर हे माझ्याबरोबर का घडलं असा विचार करायचा नाही. संघर्ष करून पुढे जग जिंकायला जायचं.

  कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला जीवनामध्ये खंबीर पाय रोवता आला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे. कोणाचा आसरा मिळो न मिळो स्वतः ठाम राहायला पाहिजे.

  हे जेवढ्या लवकर आपल्या मेंदूला सांगू तेवढ्या लवकर आपण जीवनात उभे राहतो. निगेटिव्ह गोष्टी बाजूला सारतो.

  जोपर्यंत वाईट गोष्टींचा आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्याला उपायात्मक योजना आखाव्या लागतात. पण जेव्हा आपण त्या स्वीकारु तेव्हा नकळत आपल्या हातून तशा चांगल्या कृती घडत जातात.

  एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर बऱ्याच गोष्टी लादल्या जातात. वरिष्ठ आपल्याला सांगतात हे करा, ते करा. त्यांनी सांगण्यामागे सुद्धा एक हेतू असतो. तो म्हणजे ते काम आपण चांगले करणार आहे त्यांना माहीत असते. म्हणून ते आपल्याला हे काम देतात. म्हणून आपण असे म्हणायचे नाही मलाच का काम दिले हिला का नाही दिले? हे अगदी साधे प्रश्न असतात पण त्याला सामोरे जावं लागतं. बऱ्याचदा असं होतं की सारख आपलं नाव घेतलं जातं ठीक आहे म्हणायचं आणि पुढे जायचं. यालाच ब्रेन डेव्हलपमेंट असं म्हटलं. कोणत्याही कृतीचा चटकन स्वीकार केला की आपल्या मनाला त्रास होत नाही पर्यायाने मेंदूला त्रास होत नाही. आपल्याला आजार मागे लागत नाहीत. उदाहरणार्थ आपण त्याच गोष्टीचा सतत विचार केला असता डायबेटिस,बीपी वाढण्याची शक्यता असते. मनात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या तर समोरच्या व्यक्तीचा खूप राग यायला लागतो. होते असे..अनुभव आहे. पण म्हणून आपण त्रास करून घ्यायचा नाही. आपला मेंदू तल्लख ठेवायचा आणि शांत ठेवायचा. आपल्या मनातील आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगायचे. मनमोकळं करायचं. मनातले विचार रिकामे होतात. मेंदू शांत राहतो. आजाराला आमंत्रण मिळत नाही. याचा विचार करून पहावा प्रत्येकानं...

  परत स्वीकार याच गोष्टींवर आपण ठाम राहायचं. आलेल्या गोष्टींचा स्वीकार करायचा. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करायचा. आपल्या हातात एवढेच आहे.

  उदा..अगदी विमानाची तिकीट काढलेली असतात. रेनी सीजन मुळे अथवा आपल्या आजारपणामुळे, किंवा सुट्टी मिळाली नाही म्हणून आपले फ्लाईट कॅन्सल होते. अशावेळी या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो. आपले पैसे फुकट जातात. मन अशांत होतं. पण याच्यावर इलाज मात्र नसतो. समोरची स्थिती जी आहे ती स्वीकारावी लागते. दुसरा पर्यायच नसतो आपल्याकडे.

  तसेच जीवनात आलेल्या इतर व्यक्तींच्या स्वभावा बाबत आपल्याला प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह विचार करून त्यांचाही स्वीकार करावा लागतो. सर्वच व्यक्ती समान नसतात . काही व्यक्ती आपल्या खरंच अगदी जवळच्या असतात. की ज्यांना आपण मनातलं बोलून आपण शांत होऊ शकतो. काही विशिष्ट सल्ला मिळू शकतो. त्यांना आपण यशाकडे वाटचाल करू लागलो तरी कोणताही त्रास, प्रॉब्लेम नसतो.

  पण जीवनात अशा काही व्यक्ती असतात की आपण जर यशस्वी व्हायला लागलो तर त्यांना लगेच आपला त्रास होतो.

 त्यांना दुसऱ्याचे यश बघवत नाही. सर्व काही मलाच मिळाले पाहिजे. शाब्बासकी मलाच मिळायाला हवी. मीच सर्वात श्रेष्ठ. अशाही व्यक्ती असतात यांचा सुद्धा आपल्याला स्वीकार करून त्यांना समवेत घेवून पुढे जायचं असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करायचं नसतं. उलट त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचे विचार काय आहे? त्याचा उलगडा करून घ्यायचा असतो. त्यांच्यातल्या चांगल्या गुणांना वाव द्यायचा असतो. त्यांच्यातले चांगले गुण आपण आत्मसात करायचे असतात. या चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला की ती लोक सुद्धा आपल्याबरोबर छान मैत्री करू शकतात. आपली मैत्री सफल होऊ शकते.

  अप्रत्यक्षरीत्या काही नकारार्थी भावनांमुळे माणूस स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. आनंदाला पारखा होतो. नकळत त्यांची गुलामगिरी स्वीकारून दुःखी होतो. 

  तर इतरांशी आत्मीयतेने, सहकार्याने वागावे, तसे प्रयत्न जरूर करावे. प्रामाणिकपणे वागावे. लोक आपल्याशी कसेही वागले तरी त्यांच्याशी आपण चांगलेच वागावे. आणि याचा स्वीकार करून समाजात मानाचे स्थान मिळवावे हे मात्र नक्की...


Rate this content
Log in