Sangieta Devkar

Others

4  

Sangieta Devkar

Others

स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्ह

स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्ह

5 mins
922


निमा सकाळ ची तिची कामे उरकत होती. तसे ही ते दोघेच राहात होते घरात ती आणि हेमंत. त्यांची एकुलती एक मुलगी हर्षदा जिचे सहा महिन्यां पूर्वीच मितेश शी लग्न झाले होते. हर्षदा एम बी ए झालेली हुशार सुंदर वर्किंग वूमन होती. मितेश ही दिसायला स्मार्ट आय टी मध्ये उच्च पदावर जॉब ला होता. दोघांच लवमँरेज होत.त्यामुळे निमा आणि हेमन्त आता निश्चिन्त होते. हेमन्त हॉल मध्ये पेपर वाचत बसला होता. सकाळ चे नऊ वाजले होते. घराची बेल वाजली. निमा म्हणाली, हेमन्त बघा जरा सकाळी सकाळी कोण आले आहे. हेमन्त ने दरवाजा उघड़ला. दारात हर्षदा ला पाहून त्याला आश्चर्य वाटले कारण अशी सकाळी ती खूपच महत्वाचे काम असेल तर येत असे. अरे हर्षदा तू इतक्या सकाळी काय काम काढलेस. हेमन्त ने तिला विचारले. त्याचा आवाज ऐकून निमा बाहेर आली. हरषु ला बघून तिला ही आश्चर्य वाटले.

काय ग असे अचानक कसे आली फोन पण नाही केला . तशी रागानेच हर्षदा म्हणाली, आई आता माझ्या घरी यायला पण परवानगी घेउन यायच का? तसे निमा म्हणाली, तसे नाही ग आज अचानक इतक्या सकाळी आलीस, ऑफिस नाही का तुला ? म्हणून विचारले. आणि ऐकटीच का आलीस मितेश कुठे आहे.? आई मी ते घर सोडून आली आहे. हेमन्त म्हणाला,काय झाले अचानक तू घर सोडून का आलीस तुमचे भांडण झाले का? आणि मीतेश ला माहित आहे का की तू इकडे आली आहेस ते. हो बाबा त्याला माहित आहे. त्याच्याशी च तर भांडुन आले आहे मी. अग पन इतके काय मोठे भांडण झाले की तू घर सोडून आलीस, निमा म्हणाली. हो,तो मितेश लग्ना आधी सगळ माझ्या मनासारख करायचा,माझ्या सगळ्या गोष्टी त्याला पटायच्या आणि आता काय मी हक्का ची बायको झाले ना मग त्याची नवरेशाही नको गाजवायला. अग पन भांडण का झाले ते तर सांग. आणि काही ही झाले तरी असे घर सोडून यायचे नसते हरशु. हेमन्त म्हणाला.

अहो, बाबा लग्ना आधी हा म्हणायचा हर्षदा तुला कायम तुझी स्पेस मी देइँन, तुला प्रत्येक गोष्टी चे स्वातंत्र्य असेल. आणि आता माझ्या गोष्टी याला खटकायला लागल्या.काही नाही इथून तिथुन सगळे पुरुष सारखेच! हर्षदा तू शांत हो आधी आम्ही बोलतो मितेश शी.निमा म्हणाली. नको आई काही गरज नाही त्याची. तसा हेमन्त म्हणाला, हर्षदा असे नसते वागायचे आम्ही बोलू कोणाचे काय चूकले हे समजायला हवे. हर्षदा रूम मध्ये गेली.थोड्याच वेळात मितेश ही घरी आला. तसे निमा ने हर्षदाला बाहेर बोलावले,ती आली आणि सोफा वर बसली. मितेश म्हणाला,आई बाबा तुम्हाला माहित आहे का की हर्षदा का भांडुन घर सोडून आली. नाही काही बोलली नाही ती अजुन . बाबा म्हणाले. तसा मितेश म्हणाला, बाबा मी हर्षदाला कोणत्याच गोष्टी साठी मनाई केली नाही तिला कसले बंधन घातले नाही. अमुक एक गोष्ट कर अशी जबरदस्ती पन कधी केली नाही. तिला पूर्ण स्वातंत्र्य मी दिले आहे कारण ती आजच्या काळातील सुशिक्षित तरुणी आहे आणि माझे तिच्या वर प्रेम ही आहे . घरी माझे आई बाबा पण तिला कशा वरुनच टोकत नाहीत. पण काल हरषु ने हद्द केली,ऑफिस च्या पार्टी मध्ये तिने ड्रिंक्स घेतली. मी तिला पूर्ण मोकळीक दिली आहे याचा अर्थ तिने तिच्या लिमिट्स क्रॉस कराव्यात असे होत नाही. पार्टी ला पिकनिक ला जाते ऑफिस स्टाफ सोबत इथ पर्यन्त ठीक आहे पण ड्रिंक करने हे मला कदापि मान्य नाही. यावरून आमचा वाद झाला.

मी जुन्या वळनाचा, टिपिकल पुरुष आहे असे हर्षदा चे म्हणणे आहे. ड्रिंक्स ही आजच्या जमान्यातील कॉमन गोष्ट आहे . तशी निमा म्हणाली, हरशु तुझे वागने पूर्णपणे चूकले आहे. अग मुलीने ड्रिंक्स करून यायचे हे कोणत्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना आवडेल. यात तुझ्या सोबत आमची पण बदनामी नाही का ? आई ला मध्येच तोड़त हर्षदा म्हणाली, आई कधी तरी ड्रिंक्स घेतली तर इतका का त्याचा इशू करायचा? आणि मितेश तू नाही पार्टी मध्ये ड्रिंक्स घेत मग बायको ने कधी तरी घेतली तर काय बिघडले. तसे बाबा ओरडले, हरशु हे अति होते आहे, पुरुषाने घेतली ड्रिंक तरी त्याचा ग़ैरफ़ायदा कोणी नाही घेणार पन विचार कर काल तुज़या ड्रिंक्स घेण्याने कोणी तुझ्याशी गैर वर्तन केले असते तर, अग बाळा आज काल बाहेर किती अशा घटना घड़तात तू पहातेस ना! तुझी काळजी वाटली मितेश ला म्हणून तो बोलला. तुला त्याचा राग दिसतो पण त्या मागचे प्रेम नाही दिसले.

बाबा आता हरशु जवळ गेले आणि तिच्या डोक्या वरुन हात फिरवत म्हणाले, बाळा जरा विचार करून बघ मितेश ने तुला पूर्ण स्पेस दिलीय कधी कोणत्या गोष्टीला आडवले आहे का? तुला वागण्याचे ,कपड़े घालन्याचे,नोकरी करण्याचे सगळ सगळ स्वातंत्र्य त्याने दिले आहे. अग एकमेकाना रिसपेक्ट देणे,भावनांचा आदर राखणे ,एकमेकांची स्पेस जपने म्हणजेच सहजीवन आहे, तुम्ही आजच्या स्वतंत्र काळातील हुशार मूल आहात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्रय मिळाले आहे याचा अर्थ काही ही विचार न करता स्वैराचाराने वागने असा होत नाही. लग्ना नन्तर काही जबाबदारी, कर्तव्ये हे मुलीला पार पाडावे लागते तसेच मुलाला ही जबाबदारी असते. आणि मितेश वर तुझी आई वडिलांची जबाबदारी आहे मग त्याला तुझी काळजी असणार च ना बेटा? लग्ना नन्तर थोड्या तड़जोड़ी कराव्या लगतात पण त्याही आपल्याच माणसांसाठी असतात,त्यात प्रेम ही असते. मला वाटत हरशु तुझे चूकले आहे . बाबा इतक बोलून शांत बसले. हरशु ला तिची चूक समजली होती. तिचे डोळे भरून आले होते. ती मीतेश जवळ गेली आणि म्हणाली, आय एम रियली सॉरी मितेश. माझे काल चुकलेच मी इतराचे बघून ड्रिंक घेतले. पण पुन्हा नाही असे होणार. सो सॉरी. तसा मितेश म्हणाला,तुला तुझी चूक समजली ना मग यातच सगळे आले. डोळे पूस आधी. तसे आई म्हणाली, आता तुम्ही दोघे इथेच थाबा मी छान स्वयपाक करते . हो आई पण त्या आधी मी आई बाबांची माफी मागते लगेच कॉल करते. असे म्हणत हर्षदा गैलरी मध्ये गेली. मितेश प्रेम भरल्या नजरेने हरशु कड़े पहात होता. आणि आई बाबां ना म्हणाला,थैंक यू सो मच. बाबा म्हणाले मितेश आभार कसले मानतोस तुमचे भांडण मिटले हे महत्वाचे. आमची हरशु अजुन ही अल्लड़ आहे तिला फक्त सांभाळून घे. हो बाबा नक्कीच हसत मितेश म्हणाला. 


या कथे मधून हेच सांगायचे आहे की स्वातंत्र्य म्हणजे कोणती ही गोष्ट करण्याची मुभा असे नाही. आजकाल च्या मुलांच्या आणि मुलींच्या ही आपल्या जोडीदारा कडून खुप अपेक्षा असतात त्याना स्पेस फ्रीडम सगळ हव असत त्यामुळे कधी कधी वाद विवाद होतात आणि अगदी ते टोकाला ही जातात . मुलाना हे समजने गरजेचे आहे की स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण पणे मोकळीक नसून काही गोष्टी बाबत मर्यादा ही येतात. पण स्वातंत्रयाची व्याख्या व्यक्ति सापेक्ष बदलत असते. एखादा गायक त्याच्या गाण्यातून वक्त होऊन स्वातंत्र्य अनुभवतो,डांसर त्याच्या डांस मधून व्यक्त होतो. जसे मी लेखिका आहे तर माझे शब्द म्हणजे माझे स्वातंत्र्य त्या शब्दातुन मी व्यक्त होते .!!!


Rate this content
Log in