अक्षता कुरडे

Children Stories Inspirational

4  

अक्षता कुरडे

Children Stories Inspirational

सुवर्ण नगरी

सुवर्ण नगरी

3 mins
329


सुवर्णस्पर्शा च वरदान लाभलेल्या मिडास राजाला त्याच्या सोन्याच्या हव्यासापोटी झालेली चूक लक्षात आली होती. त्याला खुप पच्छाताप होत होता. त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा स्पर्श कोण सजीवाला होऊ नये. दिल्या गेलेल्या वरदानामुळे राजा इतका खूष होता की त्याने रात्री काहीच खाल्ल नव्हत. सकाळी स्पर्श होताच अन्न देखील सोन्याचे झाल्याने तो त्याला तेव्हाही काहीच खाता आले नाही. त्याचा सोन्याच्या प्रती असलेला लोभ आज त्याला शिक्षा देत होता. सोन कधीच आनंद विकत घेऊ शकणार नाही आपल्या बायकोचे हे बोल त्याला आठवत होते. तेव्हा तिच्यावर हसणारा आज त्याला तिचे म्हणणे पटत होते. सोने च काय जगातील कोणतीही मूल्यवान वस्तू सुख विकत घेऊ शकत नाही आज त्याला कळले. त्याला मनापासुन पच्छाताप होत होता, म्हणूनच त्याने मनाशी एक निर्धार पक्का करत तो आपल्या खोली बाहेर आला. सैनिकाला बोलावून, राज्यातील लोकांनी आपल्या घराबाहेर न लागणाऱ्या वस्तू दाराबाहेर ठेवाव्या अशी राजाने गावात दवंडी पिटवली. त्याच्या सुवर्णस्पर्शाची खबर अख्या राज्यात पसरली होती. आपल्याला राजाचा स्पर्श होऊ नये म्हणून राज्यातले लोक दवंडी पिटवल्या नंतर लगेचच घाबरून आपापल्या घरात निघून गेले. राजाला ही गोष्ट कळताच त्याला फार वाईट वाटले. आपल्या माणसांच्या प्रेमाहून जास्त मोलाची गोष्ट कोणतीच नाही त्याला दिसत होते. राजाने आपला निर्धार अजूनच पक्का केला आणि आपल्या खोलीत निघून गेला.

सकाळी राजा उठून राजमहालातून बाहेर पडला. नेहमी प्रवाहासोबत खळखळणाऱ्या पाण्यासारखे त्याचे राज्य आज डबक्यातल्या पाण्यासारखे शांत आणि स्थिर होते. राज्यात भयाण शांतता पसरली होती. दवंडी पिटवल्या सारखे कोणीही आपल्या घराबाहेर काही ठेवले नव्हते. सारे लोक घाबरून आपल्या घरात बसले होते. राजाने गोष्ट फार मनावर न घेता आपले काम करू लागला. राजा आपला स्पर्श प्रत्येकाच्या घराला करू लागला. राजाचा स्पर्श होताच घर सोन्याचे झाले. असे करता करता अख्खे राज्य सुवर्णमय झाले होते. राजा दुःखी कष्टी होत आपल्या महालाच्या दिशेने परतला. राजाने रयतेच्या कल्याणासाठी केलेला विचार तर पूर्ण झाला होता परंतु त्याला स्वतःच अस्तिव काही उपयोगी नसल्याचे वाटत होते म्हणून राजाने स्वतःच्या शरीराला स्पर्श करून सोन्याची निर्जीव वस्तू बनवले. 

साऱ्यांना ही बातमी कळताच सगळे जण राजमहालाच्या दिशेने वळले. तिथे राणी आणि राजकुमारी राजाची सुवर्ण मूर्ती च्या जवळ बसून रडत होत्या. संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत होते. पण ही वेळ हळहळ व्यक्त करत बसण्याची नसून आपल्या सुखाचा विचार करणाऱ्या राजासाठी काहीतरी करण्याची आहे असे सगळ्यांचे मत होते. रयतेचा पाठिंबा मिळाला तसे राणीला फार बरे वाटले. तिला खुप मोठा आधार मिळाला. राज्यातल्या लोकांनी राजाला वरदान दिलेल्या जंगला च्या देवाला मनोभावे प्रार्थना केली. साऱ्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. रयतेच्या मनात राजाबद्दल असलेले प्रेम पाहून जंगलाचा देव प्रसन्न झाला. त्याने एका काचेच्या बाटलीत मंतरलेले पाणी देऊन ते राजावर शिंपडण्यास सांगून अदृश्य झाला. ते पाणी शिंपडताच राजा पूर्वी सारखा झाला. त्याला पाहून रयतेच्या आणि राणी चा आनंद पारावर उरला नव्हता. सारीकडे जंगलाच्या देवाचे आणि मिडास राजाचा जयघोष करत साऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सुवर्ण स्पर्शाची ही गाथा दूरवर पसरली. राज्याला "सुवर्णनगरी" असे नाव पडले. सुवर्णनगरीला सुवर्णस्पर्शासोबतच प्रेमळ स्पर्श देखील लागला. 


Rate this content
Log in