STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

सुखी जीवनाची पहाट

सुखी जीवनाची पहाट

1 min
421

  भारतीय संस्कृती जीवनाचे सार सांगते. सुखी, सुसंपन्न, आनंदी जगायचे तर श्रद्धा ती देवावर, धर्मावर, व देशावर. धार्मिक सणांची निर्मिती हीच सुसंपन्न जीवन जगण्यासाठी झालीय. सर्व सण, उत्सव हे आरोग्य धनाचा जनतेत मुक्तहस्ते, मुक्तपणे वाटप करुन सुखाची अनुभूति देतात.

      भारतीय संस्कृतीचा चातुर्मास म्हणजे वर्षभराच्या आनंदाची तजविजच. सगळे सण, उत्सव, वृतवैकल्ये, उपवास सानंद संपन्न झालेत. कार्तिक पौर्णिमेला लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने आता वर्षभर जीवन उजळणार. कारण भौतिक जगतातील घटनांत अडकून न राहता खरी सुखाची वाट दाखवलीय ती आमच्या संत मंडळींनी.

      संत मानवी जीवनाचे गतव्य स्थान..... सार समजावतात. मग भक्तही अर्ध घडीही नावाशिवाय राहत नाही. यंदा तर वारकरीभक्तानी हरिपाठ पठनासह विठ्ठल दर्शनाचा परमानंदही प्राप्त केलाय. संत तुकोबांना विठूरायाचे दर्शन घडले. ते म्हणतात. जीवनात चैतन्य निर्माण करणारे विठ्ठलाचे . आता जगाचा विसर पडावा. या वाचेने गावे ते केवळ विठ्ठलाचे नामक. या नामाचा गोवा अवर्णनीय. डोळयाना दिसावा सुखदायक विठूरायाच. या कानांनी दुसरे काही ऐकूच नये. ऐकावे ते विठूनामच. हे मन सतत धावतच राहते. या मनाची धाव असावी ती पण त्याच्याच चरणापर्यंत. हे मन इतरत्र न भटकता त्याच्याजवळच स्थिरावे.

     हे विठूराया तुझे हे दिव्य रुप बघून माझे देहभान हरवले. हे देवा या जीवाला तुझ्या जवळच स्थान दे!. 


Rate this content
Log in