सुखद आठवण
सुखद आठवण
आज ७ वर्षाचे झाले बाळराजे अनुज... २०१३ अर्थात सात वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मला अचानक रात्री १०-१०.३० ला जयश्री दिपक बनसोडे चा (छोटी वहीनी) फोन आला ...अत्यंत वेदना (प्रसुतीकळांमुळे)असल्याच्या रडवेल्या आवाजात " ताई तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच इथे दवाखान्यात या... मला फार त्रास होत आहे"... असा झोपेतच उचललेल्या फोनवरच्या आवाजाने खडबडुन जागी झाले... तिच्या जीवात जीव घालवण्याचा व सहनशिलता वाढवण्याचा प्रयत्न करत होते .. पण निर्थकच.... शेवटी मलाच तो आवाज ऐकवेना म्हणून फोन कट केला...
त्याच वेळी गर्भातील बाळाची बाहेर येण्यासाठीची धडपड चालु होती अन माझी बसल्या जागी धडधड वाढत होती... एकाच वेळी दिपाभाऊ , मी, आणि जयश्री आमचे जीव अंशात होते... पण नैसर्गिक न्यायाने त्याला पर्याय नव्हता... झालं... विसेक मिनिटात पुन्हा दिपाभाऊ चा फोन आला ... ताई,जयश्रीला O.T त घेतलं.. काळजी करु नको ... तेवढा वेळ वाट पाहत बसणं... तेवढं आपल्या हातात आहे ... तु ये आरामशीर...
एकीकडे जयश्री रात्रभर आयुष्यातील सुखी क्षणांची पहाट होण्यासाठी अनंत कळा सोसत होती .. आणि तेवढ्या झटक्यात मी भाचा असो का भाची.. दिपक भाऊच्या बाळासाठी लगेच नावही इंटरनेटवर शोधत बसले... हा प्रसंग मला आज आठवताना मलाच माझ हसू येतं...
अन् तो क्षण आला..जो आजवरचा सर्वात आनंदाची बातमी कानावर टाकणारा होता .. वेळ 11 रात्री ची*
*ताई... तू आत्या झाली... मुलगा झाला... जयश्री पण ठीक आहे.. भगवंताचे आभार मानले...
दिपक भाऊला पहीली मुलगी..आणि आता मुलगा... खुप आनंद झाला.. इतका वेळ सुरु असणारी तिकडची तडफड,धडपड,व इकडची धडधड आता थांबली होती... पण इकड आता आत्याला भाचा डोळ्यांनी पाहुन तो आनंद मेमरीत फिट्ट करण्याची उत्कंठा वाढली होती..
उशीर होता फक्त दिवस उगवण्याचा.. पण इथे आनंदाच्या भरतीत एकेक क्षण युगांसारखा भासत असताना दिवस उगतच नव्हता.. म्हणुन मग पहाटे अंधारातच आंघोळ उरकून जातेगाव वरुन स्कुटी वरुन आनंदाने बधीर अवस्थेत गाडी एका तासात घाटीत पोहचली...
घाटीच्या वार्डात अगोदर जयश्री दिसली... बाजुला दिपक भाऊ .. दोघांच्याही चेह-यावरचा तो आनंदी क्षण आणि ते छोटसे गोंडस बाळराजे.. पहिल्यांदाच या डोळ्यांनी पाहिलं तो क्षण व्यक्त व्हायला या जगात कोणत्याही भाषेत तो शब्दच नसावा... हे क्षण फक्त एक आत्याच अनुभवुच शकते... ते गोरे गोरे रुपडं पाहुन क्षणीक नानाची ( आमचे वडील ) आठवण आली...
कपाळावरची ठेवण.. ही तशीच दिसली... आणि क्षणात... मोठ्या दादांचे नाव 'अशोक' म्हणुन (अ) घेतला आणि वडीलांच्या नावातले दोन अक्षर ... आणि नाव ठेवले "अनुज" आज ह्या सातव्या वाढदिवसाने पुन्हा एकदा ... ह्या लाडक्या भाच्याची जन्म कहाणी आठवली... "अनुज" , तुला आज सातव्या वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा... भगवंत तुला उदंड आयुष्य, आरोग्य, व सर्वात महत्वाचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडून प्रेम मिळो.. एवढीच प्रार्थना...
तुझीच आत्या
