स्त्री सक्षमीकरण गोत्यात
स्त्री सक्षमीकरण गोत्यात
स्त्री हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रीय असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे.स्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्वाचेआहे.ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत.इथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात.त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे.घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत,याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे प्रबोधन झाले पाहिजे ती अजूनही पुर्णत:हा सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही.
याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात आणि अशा वेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभ्या राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरवात करतो; पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का? की ते सर्व भाषनातच ऐकत रहायचं का?
आजच्या स्त्रिया खरंच सबळ आहेत काय काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे दिपावळी च्या दिवशी घटना घटित झाली स्त्रीला लक्ष्मी मानून तिला सन्मान आपण देऊ शकत नाही परंतु तिला अजून बोलून आणि सोलून काढत असतोय कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तिचा धूवा घेतला जातो. अरुणा एकुलती एक मुलगी आपल्या आई-वडिलांना होती तिचे विवाह सुसंस्कृत संपन्न परिवारात झाला. परंतु हुंड्यासाठी तिला रात्रंदिवस घरची लोकं टोचत असे अरुणाच्या वडीलाने खूप काही वस्तू दिल्या होत्या सोनं चांदी फर्निचर इतर साहित्य वगैरे तरी महिन्या दोन महिन्यात अरुणाला तिच्या माहेरी पाठवत असे कितीही अहेर आणला तरी समाधान होत नव्हते. दिवाळीची वर्दळ होती सारखं लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू होती घरची कामे करून अगदी थकून अरुणा तिच्या रूम मध्ये थोडावेळ आराम करायला म्हणून गेली तितक्यातच तिचा पती आला त्याच्या आई-वडिलांनी काहीतरी भांडण उकरून काढले व सांगितले की घरी दिवाळी असून ती काहीच काम करीत नाही आणि आपल्या बेडरूम मध्ये आराम करीत आहे. अनेक आरोप लावून अरुणाच्या पतीचे मन खराब केले. या गोष्टी रोजच होत होत्या.परंतु अरुणा तिकड़े काना डोळा करायची.ती समझदार शांत स्वभावाची होती.
त्या सर्व गोष्टी ऐकून तो तावातावात रागाने हेडरूम मध्ये गेला व तिला खेचत बाहेर हॉलमध्ये आणले आणि आई-वडिलांच्या समोरच तिला बेदम मारहाण करायला लागला. तसाच तिने आपले धाडस दाखविले ता धावत मोबाईलजवळ गेली. आईला कॉल गेला परंतू लगेच मेबाईल हिसकाऊन घेतला गेला तिच्या तोंडात कापड कोंबुन तिला अबोल केली व काठीने तिला बेदम मारहाण केली ती मरणप्राय अवस्थेत बेशुद्ध झाली होती.
वडिलाला तिकडे काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली त्यांनी लगेच धाव घेतली जवळपास एक तासाचा रस्ता होता.आल्याबरोबर आपल्या मुलीची परिस्थिती बघितली अरुणाच्या नाकातोंडातून रक्त सांडत होते त्यांनी लगेच तिला घरातून उचलून गाडीत टाकले व हॉस्पिटल मध्ये नेले ती बेशुद्ध अवस्थेत होती तिच्या सोबत काय घडत होतं तिला काहीच कल्पना नव्हती अथक प्रयास करून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला.
तिच्या पप्पाने सर्वांना फोन करून अरुणाची हकीकत सांगितली तिचे नातेवाईक पण धावून आले आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नंतर जे व्हायचं ते झालय.तीघांनाही अटक झाली. कोर्टकचेरी करता-करता कित्येक वर्षे निघाली तिचे पूर्ण जीवन उध्वस्त झाले होते.
कित्येक दिवसांनी ते जमानत वर सुटले त्यानंतर तारखावर तारखा सुरू झाल्या आई वडीलाच्या सांगण्यावरून खरी परिस्थितीत न ओळखता आपल्या हातानेच आपली जिंदगी बरबाद केली खूप ठिकाणी बघायला मिळते की स्त्रीवर सतत अत्याचार होत असतात पूर्ण आयुष्य वाया गेल्यागत त्या निरपराध असून सुद्धा अपराध्यासारखं जीवन जगतांना दिसतात.