Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

स्त्री-मुक्ती कशी होणार

स्त्री-मुक्ती कशी होणार

3 mins
649


सावित्रीबाईच्या अथक प्रयासाने आजच्या युगात स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत.परंतू "स्त्री-मुक्त कशी होणार" आजची सावित्री ही खुप कष्टातून सावरली आहे. प्रगतीपुर्ण विचाराचे समर्थन करणारी आहेत.व कर्तुत्व दाखविण्यासाठी नेहमी सज्ज असणारी आहे. सावित्रीबाईच्या परोपकारी भावना, स्त्रीजाती विषयी प्रेम आणि कर्तव्य समजून अथक प्रवास करून स्त्रियांचे भविष्य घडविण्याचा अट्टाहास केला. व नवी शैक्षणीक दिशा देवुन आजच्या सावित्रीला दृढ केले. तिच प्रेरणा प्रत्येक स्त्रीमध्ये रूढ आहे. अशी एकमेव महिला आपल्या भारतात नावलौकीक मिळवून अजरामर होवून गेली.तिच्या पुण्याईने आजची स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही,योग्यतेनुसार आपल्या कार्यात समरस होताना दिसतात. भारतीय स्त्रीची अवस्था ही पायातल्या चप्पलेपेक्षा जास्त नव्हती. आता त्या चंद्रावरसुद्धा जावून पोहचलेल्या आहेत. आणि समाजात आपल्या स्थानासाठी झटत आहेत.

 

 या प्रयत्नात "आजची स्त्री ही कितपत मोकळी झाली आहे",हे मात्र आपण ठामपणे सांगु शकत नाही. कुठेकुठे अजुनही परस्वाधिनतेच्या कचाट्यात रूतून बसलेल्या आहेत.त्या कश्या बाहेर निघणार? त्या स्त्रीयांंना कोण बाहेर काढणार हा यक्ष प्रश्न आजही मला भेडसावतो आहे? काही स्त्रिया जिवंतपणी नर्कयातना भोगत आहेत. त्या मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. आज एकविसाव्या शतकात पदार्पण करताना ही किव येण्यासारखे जीवन जगत आहेत. काही महिलांनी स्वत:वर पांघरूण घातलं आहे.आणि रूढी-परंपरेच्या बेड्यात अडकुन खितपत पडलेल्या आहेत .

 

 ग्रामीण भागात अजून " स्त्री मुक्त नाही", पुरूषापेक्षा जास्त काम करूनसुद्धा तिला सन्मान मिळत नाही. स्वत:मजूरी करते पण एक रुपया खर्च ती करू शकत नाही कारण पुरुषी अहंकारी वृत्ती वरचढ ठरत असते.तेव्हा त्या स्त्रींने नेमक काय करायला पाहिजे.?तिच्याजवळ काही पर्यायच नसतो.ती एकतर घर सोडते किंवा आत्महत्या करते.! (जशी सिंधूताई सपकाळ यांची दुर्गती करण्यात आली होती.) अश्या समाजात अनेक घटना रोजनिशी ऐकायला मिळतात ) झुरून, रडून ,ऐकून कुंठत जगत असते. माझ्या माहिती नुसार ५० टक्के ही स्त्रियांना स्वातंत्र्य नाही . ज्या स्त्रियामध्ये कर्तृत्व क्षमता जास्त आहे त्याच पुढे गेल्यात.पण ज्या स्त्रीमध्ये काही कर्तुत्व नसतं त्यांना काय जगण्याचा हक्क नसतो ? त्यांना ही मन,ह्रदय असतं, त्यांच ही स्वतंत्र विश्व असतंच ना? 

   

क्षेत्र कोणतेही असो , काम करायला आजची स्त्री घाबरत नाही पण, त्यांना घरून प्रोस्साहन मिळत नाही, त्याच्या आशा,अभिलाषा चार भिंतीच्या आत कोंडून त्यांचे दमन केले जाते."वरून तिला काहीच कामे नाही ती घरातली राणी आहे" ,कुठल्याच गोष्टींची कमी नाही.अस म्हणुन तिला अजून वेदनेच्या डोहात बुडवले जात असते. या सर्व गोंष्टींना जबाबदार कोण आहेत.?त्यावेळी स्त्रींला समर्पण करणे भाग ठरते.

   

काहीच नामी स्त्री व्यक्तिमत्त्व नावा रूपाला आलेली आपणास दिसते आहे.पण त्या सहज मार्गाने नाव लौकिकास आल्या असेल काय ? त्यामागे कित्येक आहुत्या देवून त्यांनी आपले स्थान बनविलेले असेल. तशीच आजची प्रत्येक स्त्री प्रयत्न करीत आहे. महत्वाकांक्षा त्यांच्याजवळ भरपूर आहेत.त्यांची यशस्वी वाटचाल विस्तारीत व्हावी. त्यासाठी स्त्रीयांची आत्मविश्वास समाजाने जागृत केला पाहिजे. तिला स्वबळावर आपली एक छबी निर्माण करण्यासाठी चाललेली तिची तळमळ जाणली पाहिजे तेंव्हा तिच्या भविष्यात निश्चीतच बदल होवू शकतो.

  

स्त्री-मुक्ती संघटनांनी स्त्रीवरील होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम व,मोफत शिक्षण,वेळोवेळी समाजसुधारकांचे मार्गदर्शन मिळायला हवे. वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन, लघुउद्योगाकरिता मानधण महिला सशक्तीकरणाला हातभार होईल आहे. अश्या योजनांमधून स्त्रीमध्ये जागृती व्हायला पाहिजे. शासकिय मदत आहे परंतू त्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करणे खुप किचकट कार्य आहे. आणि शासकिय अधीकाऱ्यापासून तर शिपायापर्यंत सर्वांचे खिशे भरावे लागत असतात. विनयभंगाला सामोर जावे लागून कुत्सित व्यवहार, वासनाधीनांच्या नजरा या सर्वांचा सामना करावा लागतो. वरून सारख्या चकरा मारून बेजार होतात. स्त्रीयांना ते नकोस होत असते. त्यामुळे लाभार्थीमध्ये महिलांची संख्या खुपच कमी असते.असे अनेक कारणे ज्यामुळे कोणतीही महिला पुढे येत नाही. म्हणुन गरीब होतकरू सावित्री आज मागे पडली आहे. तिला पुढे नेण्यासाठी यौग्य मार्गदर्शन अतिशय गरजेचे आहे.  तिचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तेव्हाच ती नवनिर्मात्री होवून आपले स्थान उंच करण्यासाठी तत्पर हाईल आणि सक्षम होवून स्वयंप्रकाशित होईल. 


 जिद्द आणि ध्येय ठेवणे अतिशय गरजेचे आहे.आजची सावित्री आपले स्थान उंच करुन नवनिर्मात्री होईल असा विश्वास करून सदिच्छा देते.


Rate this content
Log in