krishnakant khare

Others

3  

krishnakant khare

Others

स्त्री एक प्रेरणा

स्त्री एक प्रेरणा

4 mins
705



भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर यापूर्वी जगातली कोणतीही स्त्री गव्हर्नर झाली नव्हती ती स्त्री संयुक्तप्रांतात गव्हर्नर झाली होती ,

तीचे नाव सरोजनी नायडू, सरोजिनी नायडू हे आपल्या भारत देशातील महान स्त्री होती.

 सरोजनी देवी यांचा जन्म इ.स. 

13 फेब्रुवारी  1879 ला भारतातल्या, आंध्रप्रदेशातल्या हैदराबाद मध्ये झाला. त्यांच्या घरातले वातावरण एक चांगला लेखक ,एक चांगला कवी बनेल असं ते अनुकूल वातावरण होते, कारण त्यांचे वडील अघोरनाथ चटोउपाध्याय हे हैदराबादेत शास्त्रीय विषयांचे प्रोफेसर होते , आपल्या मुलीने सरोजिनी देवीने गणितात आणि शास्त्रीय विषयात तज्ञ व्हावे असे सरोजनी देवीचे वडीलांना अघोरनाथ चट्टोउपाध्यायांना वाटायचे व आई वरदासुंदरी चट्टोउपाध्याय चांगली बंगाली कविता लिहायची . 

आपल्याला चांगल्या गोष्टीची आवड निर्माण होण्याकरिता ,आधी कुठून तरी प्रेरणा मिळत असते तशीच ती प्रेरणा एक स्त्री प्रेरणा होती, सरोजनी देवीची आईची वरदासुंदरी चट्टोउपाध्यायांची.

वरदासुंदरी चट्टोउपाध्याय ह्या बंगाली भाषेत फारच चांगल्या कविता लिहित. ह्याच आई वरदासुंदरी चट्टोउपाध्याय कडून प्रेरणा मिळालेल्या सरोजनी देवीची कविता लिहिण्याची आवड अप्रतिम होती, 

कधीकधी सरोजनी देवी काही अभ्यासतले उदाहरणे सोडवत असे पण उदाहरणे सुटली नाही , तर सरोजनी देवी त्या वेळेत कविता आवडीने लिहायची. म्हणजेच सरोजनी देवी यांच्याकडून आपल्याला पण प्रेरणा घेण्यासारखी आहे ती प्रेरणा म्हणजे आपण आपला वेळ फुकट जात असेल तर त्यावेळी आपले काही आवडची काम असेल ते आवडीने काम करावे म्हणजे आपल्या आवडीच्या कामाने प्रगती होईल.ह्याच पद्धतीने सरोजिनी देवी आवडीने आपल्या कविता लिहीत असायच्या.

आई-वडिलांचा शिक्षणाचा वसा मिळालेले सरोजनी देवी अभ्यासात पण फार हुशार होत्या अवघ्या बाराव्या वर्षी मॅट्रिकच्या परिक्षेला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या होत्या. वडिलांनी तिची हुशारी पाहून ती पुढील शिक्षणासाठी बाहेर देशी पाठवलं. पण बोलतात ना आपण कुठेही असलो तरी आपली आवड आपल्याला गप्प बसू देत नाही तसंच सरोजनीदेवी यांच्या बाबतीत झालं होतं विलायतेत सरोजिनी देवी विलायतल्या संस्कृतीविषयी कविता लिहीत व विलायततेला मोठमोठे कवींना सरोजनी देवीच्या त्या कविता फार आवडत. विलायतेतील मोठमोठे कवी सरोजनीदेवीना म्हणत "कविता लिहिण्यात तुमचा हातखंडा फार सुरेख आहे हेच जर तुम्ही कविता तुमच्या 

भारतातील कल्चर संस्कृतीविषयी लिहिलात तर कवी वाचकांना भारतातील थोर संस्कृती विषयी कविता वाचायला मिळेल.” तेव्हापासून सरोजनी देवी आपल्या भारतातील संस्कृतीविषयी त्यातील बारीक-सारीक समस्या याविषयी कविता लिहू लागल्या. "गोल्डन थ्री शोल्ड" हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता आणि दुसरा कविता संग्रह "बर्ड ऑफ टाईम "आणि तिसरा कवितासंग्रह "ब्रोकेन विंग" या दोन्ही कविता संग्रहाने त्या सुप्रसिद्ध कवियत्री झाल्या. 

सरोजनी देवी इ.स. 1898 मध्ये डॉक्टर मुत्तयल गोविंदराजूलु नायडू यांच्या पत्नी झाल्या.त्या आता सरोजनीदेवी चट्टोउपाध्य वरून सरोजनी देवी नायडू झाल्या.नंतर सरोजनीदेवी नायडू या नावाने ईतिहासात कायम प्रसिद्ध त्यांना जयसुर्य,पद्मजा,

रणवीर,लीलामणी चार मुले झाली ,

 सरोजनी देवी यांना एक चांगला अनुभव होता की महिलाच आपल्या घरासाठी आपल्या देशासाठी चांगले कार्य करू शकतात म्हणून सरोजनी देवी महिला-मुक्ती आणि महिला शिक्षण आंदोलनासाठी खूप काही प्रयत्न केले, भारतीय महिलांचा विकास कसा होईल, त्याकरिता सरोजनी देवी अखिल भारतीय महिला परिषदच्या सदस्य झाल्या. स्त्रियांच्या मोठमोठ्या मंडळांत कामे करून त्यांनी हिंदच्या स्त्रियांना पुढे आणले.

महात्मा गांधीजींनी आपल्या देशाच्या स्वराज्यासाठी सुरुवात केली होती तेव्हापासून सरोजनी देवी पण त्यांना येऊन मिळाल्या, मिठाच्या लढाईच्या वेळी सरकारने गांधीजींना पकडले तेव्हा आपल्या जागी सरोजनीदेवीना नेमले.

सरोजनी देवी आपल्या राष्ट्रसभेच्या अध्यक्ष पण होत्या त्यावेळी आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिम आपापसात भांडत असत , सरोजिनीदेवींनी दोन्ही जमातीमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी फार प्रयत्न केले . त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं, काही वेळेला तुरुंगवास झाला. सरोजिनी देवी संकटांना न घाबरणारी धीरविरांगणा सारखी गावागावात फिरून देश प्रेम जागवत होती. देशातील नागरिकांना त्यांची कर्तव्याची जान करून देत होती. सरोजनी देवी भाषण करीत तेव्हा इतके मधुर बोलत आणि असे सुंदर शब्द वापरीत की कित्येक त्यांना “हिंदची बुलबुल ”म्हणत.तर कित्येक "भारत कोकिला" म्हणत त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक दुरदुरून मोठ्या जमावाने येत. सरोजनी देवी बहुभाषिक पण होत्या. मग त्या आपलं प्रभावी भाषण आपल्या प्रांतानुसार कधी हिंदीतून कधी गुजराती मधून तर कधी बंगला मधून तर कधीकधी इंग्लिश मधून हि भाषण केलेले आहे लंडनमध्ये त्यांचे भाषण ज्यावेळी इंग्लिश मधून झालं त्यावेळी सर्व लंडन वासी त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध झाले होते. श्रीमती ॲनी बेझंट ह्या त्यांच्या खास प्रिय मैत्रीण होत्या.  


 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळी सरोजिनी देवी संयुक्त प्रांताच्या गव्हर्नर झाल्या होत्या याआधी यापूर्वी जगातली कोणतीही स्त्री गव्हर्नर झाली नव्हती सरोजनी देवी नायडू ह्या स्त्री गव्हर्नर झाल्या.त्यांनी आपले देशी सेवा प्रामाणिकपणे केली आणि

 गव्हर्नर असतानाच  

2 मार्च 1949 रोजी उत्तर प्रदेशातील इलाहबाद मध्ये वयाच्या 70व्या वर्षी प्रकृतीने साथ न दिल्याने 

 सरोजनी देवीनायडूंचें निधन झाले. पण इतिहासातल्या पानांवर देशसेवेला वाहिलेले त्यांची उच्च कोटीची कारकिर्द पुजनीय,आदरणीय स्त्री म्हणून त्यांची आठवण आपल्या सर्वांना चागली प्रेरणा देत राहिल म्हणून तर असं म्हटलंच अशा गुणांची स्त्री एक प्रेरणा असते. 


भारतात अशा अनेक महान स्त्रियां होऊन गेल्या , इतिहासातल्या पानांवर कायम सोनेरी अक्षरांनी त्यांचं नाव कोरलं गेलय त्यामधलीच एक प्रेरणादायक सत्यकथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in