Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Aarti Ayachit

Others


5.0  

Aarti Ayachit

Others


स्त्री एक प्रेरणा

स्त्री एक प्रेरणा

2 mins 767 2 mins 767

"खरच आहे हो जीवनात जेव्हां परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हां प्रत्येक माणूस गड़बडून जातो, असंच काहीसं घडलं क्षमा बरोबर पण सर्वात मोठी बहीण जी होती चार भावंडांची."

गवरमेंट प्रेस मधे होते वडील, अंखिण एकाएकीच प्रकृती बिघडली होती त्यांची आणि बस ऑफिसच्या लोकांनी त्यांना घरी सोडले होते, पाणी मागितले, घाम सुटला, तडकाफडकी देवाज्ञा झाली. "क्षमा वर सर्व जबाबदारी आली, आता आईसह भावंडांना पण सांभाळायचे गरजेचे होते."

तिने आपल्या मनाला खूप खंभीर पणे सशक्त करून आली तशी परिस्थितीला सामोरी जाऊन आर्थिक मदत सुध्धा केली. नगर निगम मधे सर्विस करत होती आणि तेथे वातावरण पण तेव्हां चांगले नसायचे, तरी घराचे संगोपन करण्यासाठी प्रयत्नशील राहून सर्व काम मुलगी असून पण मुला सारखेच संपवत असे.

आता आईला काळजी वाटायची, हिचे लग्न कसे व्हायचे म्हणून पण ती मात्र खांब पुणे सर्वांचा विचार न करिता भावंडांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होती आणि त्यात यश ही मिळाला हो.

कधी-कधी जीवनात आपल्याला असेच काही निर्णय आपल्यास माणसांसाठी घेणं गरजेचं असतं कारण की आपण त्यांच्यासाठी जगात आलेलो असतो. 


प्रत्येकाने आपल्यातला मी काढून टाकला न तर सर्व उत्तर आपल्याला सापडतील. मग पुढे तिने फक्त आपल्या हातात जे होते ते केले. भावंडांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी ती सतत प्रयत्नशील होती. 

 

 त्याचबरोबर तिने एम.ए. हिंदीच्या परीक्षा सतत अभ्यास करून चांगल्या मार्काने पास केली, त्याचा फायदा तिला लवकरच मिळाले आणि तिला सेक्शन हेड़ म्हणून प्रमोट केले. 


आर्थिक बाजू बळकट झाल्यामुळे पैसा अड़का काहीच त्रास नाही झाला आणि भावांचे शिक्षण सुध्धा निश्चिंतपणे पूर्ण झाले. आईला मात्र काळजी वाटायची की दिवसोनदिवस वय होतं चालले होते क्षमाचे, पण परिस्थितीला तोंड देण्यासाठी साठी तिने आपल्या लग्नाचा विचार न करता आपले भावंडांची लग्न लाऊन दिली आणि त्यांच्या संसारात रमून गेली.


"तिला फक्त वाटायच की मी सर्वांची मदत करू. नंतर भावांना पोर-बाळांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणे भाग होते मग ते सुध्धा त्यांच्या संसारात रमून गेले."


 क्षमा मात्र आपल्या आईबरोबरच राहिली. तिची पूर्ण सेवा करत होती. असेच काही दिवस सुरू होते, पण आपण म्हणतो न की कधी-कधी परिस्थिती आपल्या हातात नसते. एकेदिवशी आईलेकी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या, बघतात तर काय मंदिराच्या पायरीवर लहानशी छकुली दिसली, ती पायरीवरून पडणार तेवढ्यात क्षमाने कडेवर उचलून घेतले आणि गुरूजींना विचारले की कोणाची आहे हो." गुरूजी म्हणाले हे तर मला माहित नाही पण तुम्ही मात्र देवाने दिलेली लक्ष्मीला त्याचे प्रसादाचा रूपात स्वीकारा."


मग आई म्हणाली अग क्षमा गुरूजी बरोबरच तर म्हणतात आहे, देवाने दिलेली लक्ष्मीला स्वीकार कर. देवाने हेच आशीर्वाद दिले, असे समजून तिच्या जगण्याला एक नवीन दिशा दे म्हणजे तुझे हे जीवन सार्थक होईल.


Rate this content
Log in