STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Children Stories Comedy

3  

Sumit Sandeep Bari

Children Stories Comedy

सरड्याची कमाल

सरड्याची कमाल

3 mins
391

     एक सरडा असतो त्याच्या शेपटीत काटा घुसतो, तो काटा काढायला एका न्हाव्या कडे जातो आणि म्हणतो न्हावी दादा माझ्या शेपटीतला काटा काढून द्या. न्हावी म्हणतो नाही बाबा तुझी शेपटी तुटली तर तू भरून मागशील, सरडा म्हणतो नाही मागणार. मग न्हावी त्याच्या शेपटीत ला काटा काढतो, काटा काढताना सरड्याची शेपटी तुटून जाते, मग सरडा कुभांड करतो व न्हावी ला सांगतो माझी शेपटीत चिकटवून दे. न्हावी म्हणतो ते कसं शक्य आहे? मग सरडा म्हणतो माझी शेपटी चिकटून दे नाहीतर तुझी नरहानी दे. न्हावी नरहानी देऊन देतो.

         तो नरहानी घेऊन पुढे जातो एक आजीबाई झोपडीत धिंडरे करत होती, ती धिंडरे हाताने उलथवत असल्याने तिला चटके लागत होते. सरड्याने ते बघितले मग तो आजीबाई जवळ गेला व तिला म्हणाला आजीबाई ही घे नरहानी याच्याने धिंडरे उलथव आजीबाई म्हणते तुझी नरहानी तुटली तर तू भरून मागशील, सरडा आग्रह करतो तेव्हा आजीबाई आजीबाई नरहानीने धिंडरे उलथवते. धिंडरे उलथवताना नरहानी तुटते, सरडा आजीबाई जवळ कुभांड करतो की माझी नरहानी दे नाहीतर धिंडरे दे. आजीबाई त्याला धिंडरे देते.

        तो धिंडरे घेऊन कुंभाराजवळ जातो व त्याला सांगतो, माझे धिंडरे सांभाळ, कुंभार म्हणतो बाबा माझे मुलं येण्यातच आहे, ते आले की ते धिंडरे खाऊन टाकतील मग तू भरून मागशील. सरडा म्हणतो मी लवकर येऊन जाईल. कुंभार सरड्याचे म्हणणे ऐकतो. कुंभाराचे मुलं येतात त्यांना धिंडरे दिसतात ते धिंडरे खाऊन जातात. सरडा आल्यावर कुंभाराजवळ पुन्हा कुभांड करतो, तो सांगतो मला माझे धिंडरे दे नाहीतर मडके दे. कुंभार मडके देऊन टाकतो.

         तो पुढे गेल्यावर त्याला रस्त्यावर एक मनुष्य पायातल्या बुटात म्हशीचे दूध काढतांना दिसतो, सरडा त्याला म्हणतो हे घ्या मडके याच्यात दूध काढा. तो मनुष्य म्हणतो म्हशीने पाय मारला तर तुझे मडके फुटेल व तू भरून मागशील. सरडा म्हणतो नाही फुटणार मडके. तो मनुष्य मंजूर करतो व मडक्यात दूध काढतो. दूध काढतांना म्हैस मडक्याला पाय मारते व मडके फुटते, सरडा पुन्हा कुभांड करतो, तो म्हणतो माझे मडके दे नाहीतर तुझी म्हैस दे. तो मनुष्य त्याला म्हैस देऊन देतो.

         पुढे जाऊन त्याला शेतात शेतकरी औत हाकताना दिसतो. त्याच्याजवळ एकच बैल असतो तर दुसऱ्या बाजूस त्याने आपल्या बायकोला जुंपलेले असते. सरडा त्याच्याकडे जातो ब त्याला म्हणतो ही घे म्हैस तुझ्या बायकोच्या जागी जुंप. शेतकरी म्हणतो तुझी म्हैस मेली तर तू भरून मागशील सरडा म्हणतो नाही मरणार. शेतकरी तयार होतो, म्हैस शेतात काम करून थकते व मरते. सरडा शेतकरीजवळ कुभांड करतो माझी म्हैस दे नाहीतर तुझी बायको दे. शेतकरी त्याला बायको देऊन टाकतो.

        तो बायकोला घेऊन एक डोलकी वाल्याकडे जातो व त्याला सांगतो, थोड्या वेळासाठी मला तुझी डोलकी दे. तो डोलकी देऊन टाकतो. सरडा डोलकी घेऊन राजवाड्यात जातो व ढोलकी वाजवत म्हणतो डूम डूम डूमाक डूम डूम डूमाक ऐक राजा माझी कमाल.

शेपटी वर नरहानी, नरहाणीवर धिंडरे, धिंडऱ्यावर मडके,मंडक्यावर म्हैस, म्हशीवर बायको, शेवटी गेली शेपटी मिळाली बायको. राजा सरड्याला शाबासकी देतो, सरडा मजेत राहतो.


Rate this content
Log in