Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

सर!

सर!

2 mins
216


एका शाळेत एक शिक्षक गणित विषय शिकवत होते. ते प्रामाणिक पणाने शिकवत असत. मुलांना अवघड वाटणारे गणित अगदी सोपे करुन सोडवून दाखवायचे. मुलांचे समाधान होईल अशा प्रकारे समजावून सांगायचे. सरांचे विद्यार्थी आता खूप मोठया पदावर नोकरी करीत.

    एकदा सर नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले होते. नंतर काही वर्षांनंतर सर आजारी पडले. तेव्हा त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मग सर कोमात गेले. डाॅ. खूप प्रयत्न करत होते. अशा एका दिवशी डॉ. आले सरांना म्हणाले, "सर, ओळखलत मला, मी तुमचा विद्यार्थी विनय. विन्या". सरांना थोडा होश आला होता.. सर किल्ले डोळे करून पाहीले. व म्हणाले, " मला इथे कोण आणले आहे? "सर, मला मित्राचा फोन आला की तुम्ही निपचित पडला होता म्हणून .

    तेव्हा मी तुम्हांला इथे माझ्या दवाखान्यात आणले आणि ट्रीटमेंट केले तुम्हाल. बरे व्हावे म्हणून मी whatsapp मॅसेज पाठवले. तेव्हा तुमचे हजारो विद्यार्थी देवाकडे प्रार्थना केली. आणि तुम्ही बरे झालात. सर म्हणाले, " अरे वेड्या मला या महागड्या दवाखान्यात कशाला आणलास किती बिल झाले असेल. एवढे पैसे माझ्या कडे नाहीत. "सर कोणताच विचार करु नका सगळी सोय झाली आहे. पैशाची काहीही गरज नाही. हे दवाखाना माझा आहे". पण तरीही आपली एवढी ओळख नसताना तू हे का केलास. आणि माझ्या बॅक खात्यात काही पैसे आहेत ते मी तुला आणून देतो.

    सर ऐकाल का माझे, त्याची काहीही गरज नाही. तुम्ही दिलेल्या शिक्षणावरच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आणखी काय हवय आम्हाला. तुमची सेवा करायची संधी मिळाली. बस्स! एवढेच. मला घरी जायचे आहे. माझी पत्नी वाट पाहत असेल. सर काळजी करू नका. आम्ही तुमचे मुले आहोत. सरांच्या घरी पोहचलो. वाटेने सडा-रांगोळी केलेली होती, सरांच घराला कलर लावले होते.

      सर्व विद्यार्थी जमा झाले होते सरांची वाट पाहत होते. सर दारात येताच समांतर फुलांचा वर्षाव झाला. सरांचे जंगी स्वागत झाले. ते पाहून सरांच्या डोळयात पाणी आले. बाईंनी सरांना ओवाळले. पेढा भरवला.एव्हडे अनोळखी चेहरे कोण आहेत. सरांच्या मनात काहूर मानले होतं. सरांना खुर्ची वर बसवले बाजूला बाईंना बसवले समोर केक ठेवले. सर कापा म्हणाले. सर म्हणाले माझा वाढदिवस नाही. तेव्हा विद्यार्थी म्हणाले सर आज शिक्षक दिन आहे. सरांच्या डोळयात पाणी आले भरल्या डोळयानी केक कापला. बाईंना भरवले. सर्वांनी आनंदाने हा सोहळा साजरा केला.

    सर म्हणाले मी आज भरपूर कमावले आहे, पैसा पेक्षाही भरपूर कमावले आहे. पैशापेक्षा ही मोठी धन मला शिक्षकी पैशातून मिळाले आहे. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. असे सर म्हणाले. परत सर म्हणाले आम्हाला मुलंबाळं नव्हते. पण आज लक्षात आलं शिक्षकांची कुस कधीच ओस नाही पडत. विद्यार्थी हीच त्यांची लेकुरे असतात. 


Rate this content
Log in