स्पष्टीकरण
स्पष्टीकरण
स्पष्टीकरण....
आयुष्यात कधीही कोणासमोरही स्वतःच स्पष्टीकरण द्यायचे नाही. आपल्याकडून एखादी चूक जर का झाले तर आपण तिथे समर्थन करत बसतो. अन पुढची व्यक्ती त्या स्पष्टीकरणाच्या समर्थनाच्या ऐकण्याच्या भूमिकेमध्ये अजिबात नसते.
ही व्यक्ती त्याला स्पष्ट करण्याची गरजही नसते. कारण ज्याला तुम्ही आवडता त्यांचा प्रश्नच येत नाही. ते तुम्हाला तुमच्या चुकीचे समर्थन मागणार नाही किंवा स्पष्टीकरण ही मागणार नाहीत.
आणि ज्या लोकांना तुम्ही अजिबात आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवतील का? आणि विश्वास ठेवायला ते तयार होत नाहीत.
छापा- काटा करण्यासाठी नाणी मात्र खरे असावे लागतेच ना.
प्रेम असो वा नसो भावना शुद्ध असाव्या लागतात. दुसऱ्यांची मने कधीही दुखवायची नाहीत. करण मन हे एखाद्या झाडाच्या फांदी सारखे आहे. झाडाला फांद्या पुन्हा फुटतील पण म्हणे तुटल्यानंतर ती कायमची तुटतील. हे प्रत्येकाने लक्षात ठेवून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा त्याचे मन दुखवायचे नाही हे मनातच ठरवायचे आहेत. तशी कृती आपल्याकडून झाली पाहिजे.
दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक मस्त हार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचा एक सुंदर नातं तयार होतं.
या माणुसकीच्या नात्यासाठीच तर आपण कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही आणि कोणाचेही मन दुखायचं नाही या दोनच गोष्टी आपण करायच्या आहेत.
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
