सोशल मिडियाचा गैरवापर एक...
सोशल मिडियाचा गैरवापर एक...
मोबाईल फोन हातात आला आणि तंत्रज्ञानाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मोबाईल फोन स्मार्ट होत गेला आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला. त्यातूनच वेगवेगळ्या सोशल मिडियाचा जन्म झाला फेसबुक, व्हाट्सअप, ट्वीटर , इंस्टाग्राम इ. इ. सुरवातीला वैचारिक देवाण घेवाण होणारे साधन म्हणून याकडे पाहिल्या गेले. तसा यांचा वापर देखील सुरळीत चालू होता.
मात्र जी गोष्ट चांगली व जास्त प्रमाणात वापरली जाते तेथे अपप्रवृत्तिचा शिरकाव होतो आणि चांगल्या गोष्टीचा वापर हा वाईट हेतून होत राहतो. तसाच प्रकार या बाबतीत होत गेला आणि काही वाईट लोकांनी या सर्व सोशल मिडियाचा वापर गैर प्रकारे करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचे अत्यंत घातक व गंभीर प्रकार समोर येत आहेत.
समाजमन ढवळून निघत आहे. इतके वाईट प्रकार ऐकून , पाहून मन खिन्न होते. याची सुरुवात हा मेसेज किंवा फोटो इतक्या लोकांना पाठवा चांगली बातमी येईल किंवा वाईट घटना घडेल. हा प्रयोग यशस्वी होत होता. त्यानंतर एखादया व्यक्तीचे कागदपत्र हरवले आहे व हरवलेल्या व्यक्तीची बातमी हा प्रकार राजेरोस व सर्रास सुरू झाला.
हळुहळु आर्थिक मदत मिळवण्याचा प्रकार वाढीस लागला. आजारपण, अपघात आणि बोगस संस्था नावे पैसे उकळण्याचा व पैसे कमवण्याचा धंदा सुरू झाला. त्यामुळे जे खरे व गरजू लोक आहेत त्यांवर ही अविश्वास दाखवला गेला. त्यामुळे खऱ्या गरजू पर्यंत ही आर्थीक मदत पोहचतच नाही. खोटयायी झोळी भरणे सुरू झाले.
पुढे पुढे अत्यंत घातक प्रकार म्हणजे धार्मिक भावनेशी खेळ सुरु झाला. देशातील वातावरण बिघडणे सुरु झाले. तसेच चुकीचे माहिती व फोटो प्रसारित करून लोकांचा जीव घेण्याचा अघोरी प्रकार सुरू आहेत. ऑन लाईन लिंक व्दारे आर्थिक लुबडणूक करणे सुरू आहे. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे की, जे काही पोस्ट होते ते खरं न मानता त्याची सत्यता पडताळून पाहणे योग्य ठरेल. आपली विवेक बुध्दी जागृत ठेवणे हेच आजच्या परिस्थिती उचीत होय.