सोनपरी :
सोनपरी :
नेहा खूप समजदार आणि हुशार मुलगी होती. शाळेत नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे. अभ्यासात ही ती खूप हुशार असते, पण ती नेहमी उदास राही. त्यामागे कारण ही तसेच होते ते म्हणजे नेहाची सावत्र आई खूप तिला त्रास देत असे. तिला खूप छळत असे . तिच्याकडून घरातील भांडी, कपडे, घरातील साफसफाई अशी खूप काम करून घेत असे . तिला कधीच प्रेमाने वागवत नसे. तिला पोटभर जेवण कधी देत नसे.त्यामुळे ती नेहमीच आईला घाबरून राहत होती.
शाळेत तिला खूप करमुन जात असे, कारण शाळेत सर्व मॅडमच्या आवडीची विद्याथींनी होती. शाळेत तिला खूप मैत्रिणी ही होत्या.त्यामुळे तिला शाळेत घरच्यापेक्षा खूप आवडत असे.
जेव्हा नेहाचा जन्म झाला, तेव्हा तिची आई तिला सोडून देवाघरी गेली. नेहा खूप लहान असल्यामुळे तिच्या संगोपनासाठी तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. नेहा वडिलांची खूप लाडकी होती . तिचे वडील तिचे सगळे लाड पुरवत असत. ते नेहमी कामानिमित्त बाहेरगावी राहात, त्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरची उदासी बघून तेही नेहमी टेन्शन मध्ये राहत.तिला आनंदी ठेवण्याचा ते खूप प्रयत्न करत. तिच्यासाठी भरपूर खेळणी, नवीन ड्रेस तसेच तिच्या आवडीचे हेअर बेल्ट तसेच तिच्या आवडीचे चॉकलेट, केक आणत, पण तरी पण ती नेहमी दुःखी राहत.
तिच्या दुःखी राहण्या मागचे कारण त्यांना सावत्र आईचे वागणे याबद्दल काहीच माहित नव्हते , आणि नेहा ही आई च्या सांगण्यावरून त्यांना याबद्दल काही कळून देत नसे . नेहा मात्र आईच्या रोजच्या छळाला खूप कंटाळी होती .
असेच दिवसामागुन दिवस जात असतात. नेहाच्या ख़ुशी साठी नेहा चे बाबा काश्मीरची पिकनिक अरेंज करतात. त्यामुळे नेहा खूप आनंदी होते. ते सर्व जाण्याची तयारी करतात.सर्वजण आपापल्या ब्याग भरून निघण्याची तयारी करतात. नेहाने बरोबर खूप चॉकलेट, मस्त स्वेटर, ऊबदार शाल, आणि टोपी अशा प्रकारे तिची सर्व पॅकिंग झालेली असते. दुसऱ्या दिवशी ते सकाळी 7वाजता निघतात.
नेहाच्या पिकनिक मुळे चेहेऱ्यावर आनंद दिसत असतो, आणि तिचे वडील ही तिच्याकडे बघून ते ही समाधानी असतात.
दुपारी ते काश्मीरला पोचतात. तेथील थंडगार वातावरण पाहून सर्वजण खूप आनंदी होतात.तिच्या बाबानी राहण्यासाठी A1 हॉटेल जे काश्मीर मधील नामांकित हॉटेल बुक केलेले असते. ते हॉटेल पूर्ण काचेचे असते. थंडगार हवा आणि बाहेरून पूर्ण बर्फ, झाडें आणि मधोमध ते हॉटेल अशा सुंदर प्रकारचे हॉटेल पाहून मन एकदम सर्वांचे प्रफुल्लीत होते. ते हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचे असते. या अशा सुंदर वातावरणात सर्वजण भारावून जातात. नेहा ची आई मात्र नेहाचा सारखा राग राग करत असते. सर्वजण हॉटेल मध्ये जेवणावर ताव मारून फिरायला जातात.
नेहा खूप आनंदी झालेली असते. सगळीकडे बर्फ आणि थंडगार हवा पाहून ती मस्त स्वेटर आणि ऊबदार टोपी घालून खेळण्यासाठी निघून जाते. नेहाला आनंदी पाहून तीचे बाबाना आनंद वाटतो. कारण खूप दिवसातून नेहा खुश असते. नेहा स्केटिंग खेळत असते, आणि स्केटिंग खेळत ती खूप लांब जाते.तिथे सगळे बर्फlचे डोंगर झालेले असतात. उंचच्या उंच निवडुंग ची झाडें आणि त्यावर बर्फ पडलेला असतो. पिकनिक ला आलेले लोक या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत असतात. बर्फाचे डोंगर पाहता पाहता तिचा तोल जाऊन ती खाली गरंगळत खूप जोरात खाली पडते . तिला खूप जोरात मार लागलेला असतो आणि थंडीमुळे खूप दुखतही असते ,त्या असह्य वेदने ने आई आई म्हणून रडू लागते, तेव्हा तिथे एक सोनेरी प्रकाश पडलेला दिसतो, जसं काही सूर्याच्या किरणांचे तेज भासते. नेहाचे प्रकाशांकडे लक्ष जाते. त्या प्रकाशात तिथे एक बर्फातुन परी अवतरली असते. ती परी दिसायला खूप सुंदर असते.नेहा तिच्याकडे पाहतच राहते. नेहा तिच्याकडे बघून जरा घाबरते, पण परी तिला बोलते , घाबरू नकोस बाळा...! मी तुझ्या आई सारखीच आहे. तुला तुझ्या आईची आठवन येते ना? म्हणून मी तुला भेटायला आले, मी तूझ्या बरोबरच राहणार तुझ्या आई सारखी !परी नेहाला उचलून घेते आणि डोळे पुसते. मी आहे ना तुझ्याबरोबर! आता अजिबात घाबरायचे नाही, आणि जादूच्या राखेने तिचे दुखणेही बरे केले. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा उन्हाळा सुरु होईल तेव्हा मात्र मला निघून जायला लागेल. कारण उन्हाळ्यात माझे अस्तित्व राहत नाही. म्हणून मला जावे लागेल, चालेल ना बाळा? हो नकीच आई !मी तुला आई बोलू ना? हो नक्की तू माझ्या मुली सारखीच च आहेस ..नेहा ला खूप आनंद होतो ती त्या परी ला घट्ट मिठी मारते. मी आहे ना तुझ्याबरोबर.....!
तु अजिबात रडायचे नाहीस. मी तुझी नेहमी मदत करेन !पण एक लक्षात ठेव मी तुझ्याशिवाय कोणाला दिसणार नाही आणि तुही माझ्याबद्दल कोणाला बोलायचं नाही. प्रॉमिस कर मला ! अशा प्रकारे दोघींची मैत्री होते .
नेहाला ती परी म्हणते जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा तू ही राख हातावर घेऊन माझी आठवण काढ. मी लगेच येईल. नेहा अजून खुप खुश होते.
परी नेहाला जादूई राखेने ने खूप सारे चॉकलेट,केक, बिस्कीट, देते,तसेच तिच्यासाठी नवीन खेळणी, ड्रेस ही देते, ते पाहून नेहाला खूप आनंद होतो. इकडे तिचे बाबा तिला शोधत येतात. नेहा जोरात बाबांना हाक मारते. काय झाले...? म्हणून तिचे बाबा पळत येतात. नेहा लगेच बाबांना मिठी मारते.
त्यानंतर सर्वजण पूर्ण काश्मीर फिरतात. नेहा खूप सारी शॉपिंग ही करते. काश्मीर पूर्ण फिरून झाल्यावर दोन दिवसांनी घरी जायची तयारी होते.
जायच्या वेळेस नेहा जादुई राख हातावर घेऊन परीला आठवते. परी लगेच तिथं हजर होतें. चल आम्ही घरी जाणार आहोत तू पण चल ना माझ्याबरोबर आई ....!
हो नेहा नक्कीच...!मी तुला दिलेले वचन विसरले नाही. चल मी तयार आहे. नेहा आनंदाने नाचू लागते.
नेहा पिकनिक वरून आल्यापासून खूप खुश असते. परी पण तिच्याबरोबर नेहमी राहत असते. तिच्या बाबांना आता मात्र कामावरून कॉल येतो. त्यामुळे लगेच त्यांना कामावर जायला लागते. इकडे नेहाची आई तिला त्रास मात्र देयला चालु करते.ती घरातील कामे नेहाकडून करून घेण्यास सुरुवात करते, पण परी तिची मदत करत असते. परी तिची खूप काळजी घेत असते. आणि तिला खूप सारे चॉकलेट देऊन तिचा लाड करते. अशा प्रकारे तिचे दिवस खूप छान जात असतात. त्यात नेहाचा निकाल पण लागतो. तिला 96%मिळालेले असतात. तिचे बाबा निकाल बघून पेढे आणतात, आणि तिला भरवतात. परी तिच्या आवडीचे जेवण, स्टोरी बुक्स, तिच्यासाठी नवीन खेळणीही जादूने देते. तिचे सर्वाकडून कौतुक होते. त्यामुळे ती आणखीनच खुश होते.
तिच्या सावत्र आईला तिचे लाड अजिबात सहन होत नाही. तिच्या बाबांना पण नेहा आता खुश दिसायला लागलेली असते.त्यामुळे ते ही खुश असतात. एक दिवस परी तिच्या बाबाची महत्वाची फाईल घरातच लपवून ठेवते. तिचे बाबा ती फाईल न घेताच तसेच निघून जातात. ते मध्येच रस्त्यावर गेल्यावर त्यांना त्या फाईल ची आठवन होते आणि ते मागारी फिरतात.इकडे परी ने नेहाला फरशी पुसायला सांगितलेली असते. तोपर्यंत तिचे बाबा येतात.तिला फरशी पुसताना पाहून ते तिच्या सावत्र आईला खूप बोलतात. त्यांच्या सगळा प्रकार लक्षात येतो. मुलीच्या उदास राहण्याचे कारण ही कळते, आणि सावत्र आई चे खरे रूप ही बाबान समोर येते. तिच्या बाबाना दुसरे लग्न केलेला खूप पश्चताप होतो आणि तिच्या सावत्र आईला ही घराबाहेर काढुन टाकतात, पण सावत्र आई नेहा ची माफी मागते... हात जोडते, आणि बोलते पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही अशा प्रकारे सावत्र आई आता खूप प्रेमाने नेहाशी वागू लागते. आणि आता तिचे कुटुंब आनंदाने राहू लागते.
नेहा परीचे खूप आभार मानते. नेहा आता खूप आनंदी राहायला लागते. अभ्यास ही मन लावून करू लागते.तिला जग आता सुंदर वाटू लागते. आता उन्हाळा ही जवळ आलेला असतो., आणि परीची आता जाण्याची वेळ ही आलेली असते . ती नेहाला याबद्दल बोलते ही नेहाला मात्र खूप वाईट वाटते, ती खूप रडते,"आईची माया लावणारी परी सोडून जाणार म्हणून...!"पण परी तिला पुन्हा हिवाळ्यात येण्याचे प्रॉमिस करते,आणि जसे ऊन होऊ लागते तशी सोनपरी वितळू लागते आणि तिला bye bye करत नाहीशी होते....
