Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

संस्कार

संस्कार

1 min
141


    मुलांवर सर्व संस्कार हे थोरांच्या कृतीतूनही होत असतात. वडील धोतराचा नाक साफ केले तर मुलाने बाहेर नाक साफ केलेच म्हणून समजा. वडिलांच्या तोंडात शिवी आली तर मुलांच्या शाळेतल्या भांडणात ती शिवी वापरतात. मुलाने सिगारेट ओढू नये असे वाटले तर वडीलांना पहीले सिगारेट ओढणे सोडले पाहिजे. इतकेच नव्हे तर मुलाने आपल्या आईशी उद्दटपणा करु नये असे वाटत असेल तर घरात व इतरत्रही वडील व घरातील सर्वजण आपुलकीने वागले पाहिजे.         


मुलाभोवतीचे पहीले वातावरण म्हणजे आपले घर. संस्काराची ती पहिली शाळा म्हणजे घर. आणि आईव वडील हेच या शाळेतील पहीले शिक्षक. मुलावर चांगले संस्कार हे आईवडीलच घडवतात. आई-वडीलाचेच अनुकरण आपले मुले करतात. आपल्या घरात सामोपचाराने वागले पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. सर्वांचे हित जपले पाहिजे. एकमेकांशी प्रेमाने, आनंदाने वागले पाहिजे. व वडिलधाऱ्या मंडळींचे आदर केले पाहिजे. "एकमेकां साहय करु अवघे धरु सुपंथ" या उक्तीप्रमाणे आपण जर वागलो तर नक्कीच आपले अनुकरण आपले मुले करतात. आपण वाईट वागलो, व्यसनी झालो तर नक्कीच आपले मुले वाईट वागले म्हणून समजा, व्यसनी झाले म्हणून समजा.

       

आपण जर दररोज सकाळी देवाचे नामस्मरण करत असलो तर याचे अनुकरण आपले मुले केलेच म्हणून समजा किंवा आपण गैर वागलो तर नक्कीच आपले मुले गैर लागतील यात शंकाच नाही. 


Rate this content
Log in