Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

संकटातून मार्ग

संकटातून मार्ग

2 mins
19


एक गाव होते त्या गावात एक गरिब कुटुंब राहत होते. या परिसरात आई -वडील आणि त्यांना एक मुलगी होती. मुलीचे नाव संध्या होते. संध्या फार गुणी व हुशार मुलगी होती.अभ्यासात फार हुशार होती. कोणतीही गोष्ट तिच्या डोक्यात लवकर जाते. तिचा मेंदू फार फास्ट होती.

     शाळेतून सतत पहीली येत होती. प्रश्न विचारल्या बरोबर उत्तर द्यायची. तिचे आई-वडील खूप गरिब होते. शेतात मजूरी करुन आपली उपजीविका भागवतात. एकट्या मुलीवर आई-वडील खूप प्रेम करायचे. आणि संध्या पण आई-वडील यांच्या वर खूप प्रेम करत व त्यांची परिश्रम जाणून होती.

     तिला माहिती होते तिच्यासाठी तिचे आई-वडील खूप काबाडकष्ट करतात म्हणून. या गोष्टी ची जाणीव असल्याने तिचे स्वप्न फार मोठे होते. पण तिला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचे होते. आणि आपले आई-वडील व आपल्या गावचे नाव मोठे करायचे होते. दिवसेंदिवस संध्या च्या मनात भीती वाटत होती. पण म्हणतात ना संकटात आपल्याला देव मार्ग दाखवतो, मदत करतो.

     त्याचप्रमाणे संध्याचे एक शिक्षक होते त्यांचे रमेश होते. ते विद्यार्थी यांना चांगले शिकवत होते. आणि आयुष्यातील संकटांना तोंड कसे द्यायचे ते चांगल्याप्रकारे शिकवतात. आणि त्यांना गरीबी विषयी खूप माहिती होती. त्यांनी पण गरिबीतूनच आलेले आहेत. ते असे शिक्षक होते की त्यांचे काम कोणीही ऐकत होते. संध्या दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाली होती. तेही चांगल्या पहिल्या आल्या होत्या .       संध्या शाळेतूनच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून पहीली आली होती. आणि सगळीकडे तिचे कौतुक होत होते. तिच्या मनात तिच्या पुढील शिक्षणाची भिती होती. जेव्हा ती आपल्या आईवडिलांना पुढील शिक्षणाविषयी तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात, 'हे बघ पोरी आतापर्यंत गावात शाळा होती तर तुला शिकवले. आता पुढील शिक्षणासाठी तुला बाहेर जावे लागणार. जर तुला तिथे काही झाले तर आम्ही समाजाला तोंड कसे दाखवणार. "

     तिचे आई-वडील या गोष्टी बोलत असताना तिच्या डोळयात पाणी आले होते. अशात तिचे शिक्षक रमेश सर आले. काय झाले संध्या डोळे भरून आलेत? असे विचारले, तेव्हा तिचे वडील सर्व हकीकत सांगितले. तेव्हा सर म्हणाले, तिच्या पुढील शिक्षणाची चिंता करू नका. तिला राहण्याची, जेवणाची शासनाने सोय केली आहे. वसतिगृह स्थापन केले आहे. तिथे फक्त मुलींच्या राहतात. मग प्रश्नच नाही.

      असे समजावून सांगितले. तेव्हा संध्या तिथे राहून शिक्षण घेतली. आणि तिचे स्वप्न साकार केली. आणि एका दिवशी जिल्हाधिकारी पदाचा ऑफर आली आणि ती जिल्हाधिकारी झाली. तिला पाहून तिचे आई-वडील यांच्या डोळयात आनंदाश्रू आले. तिने पहील्यांदा आई-वडील यांना भेटून आशीर्वाद घेतली. नंतर रमेश सर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला...... 


Rate this content
Log in