संगणक आणि ग्रामीण भाग….
संगणक आणि ग्रामीण भाग….
"यंदा उन्हाळ्यात MS-CIT करताय ना, MS-CIT म्हणजे एक परिपूर्ण कॅंम्प्युटर कोर्स...!" ही जाहिरात बघितली तेव्हा मी नववीला होतो. तेव्हा CRT माॅनीटर असायचे, भला मोठा डब्बा, सिपीयू देखील आजच्या तुलनेने जड आणि मोठे होते. म्हणजे माझी आणि संगणकाची ओळख होई पर्यंत मी नववी मध्ये गेलो होतो. वडील शिकलेले होते म्हणून त्यांनी कोर्स करायला सांगितला पण माझा पहिलाच कोर्स आणि मी त्यात नापास झालो. तसा मी वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी,पहिली ते दहावी पहिल्या दोघांत असायचो. मी जिथे परिक्षा द्यायला गेलो तिथे अगदी पाचवी सातवी चे मुले पास झाले होते. तेव्हा मात्र माझा भ्रमाचा भोपळा फुटला मी ज्या मुलांमधून पहिला येत होतो त्या माझ्या बरोबरीच्या मुलांशी माझी स्पर्धा नव्हतीच. मला स्पर्धा करावी लागणार होती ती शहरातील KG , Jr. KG च्या मुलांसोबत. जेव्हा गाव सोडल तेव्हा कळायला लागल. आपण जगाच्या स्पर्धेत कुठेच नाही. ना शहरातील मुलांप्रमाणे अस्खलित इंग्रजी बोलायला येत, ना संगणकाच ज्ञान. आमच ज्ञान कशात तर गणित सोडवणे, इंग्रजी वाचण करणे, हस्ताक्षर सुंदर काढणे. पण जेव्हा संगणकाची ओळख झाली तेव्हा लक्षात आले कि, भविष्यात हे संगणक एवढ प्रगत होईल की हस्ताक्षर इतिहास जमा होईल, गणित काही सेकंदात सोडायच. हळूहळू त्या संगणका बद्दल माहिती होऊ लागली.
बारावी सायन्स पास झाल्यानंतर कळाले कि, आपल्याला सायन्स मधील कुठलाच विषय सोप्पा जात नाही. मग मात्र निर्णय घेतला आपण बिसीएस करायच. पण त्यात कोडींग लॅग्वेजेस असतात हे देखील माहिती नव्हत. एक वर्ष डाऊन राहिले. पण आता संगणकच सर्व काही बनल होत. इतर मुलांचा विचार केला कि, स्वतः चा राग यायचा, ती मुल संगणकाच्या लॅग्वेजेस सोबत अक्षरशः खेळायची आणि मला डोक्यात पण बसत नव्हते. मग आणखी एक निर्णय घेतला आपण साॅफ्टवेअर नाही तर हार्डवेअर इंजिनिअर व्हायचे. म्हणून मग बाहेर इन्स्टिट्यूट मधुन काही कोर्सेस केली. आता संगणकाच्या हार्डवेअर सोबत सहज खेळतो. अगदी तोकड्या संगणकाच्या ज्ञानाने मला कॅंम्प्युटर इंजिनिअर ची पदवी दिली. अर्थात संगणक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर अनुभवाने खूप काही शिकलो. CCNA, MCSA,RHCSA,RHCE,AWS यासारखे अनेक कोर्स केले तरी माझ्या डोक्यात संगणक 5 % मला समजले अस मला वाटतं. संगणकाच हे विश्व खूप खूप मोठ आहे. माझ्या सारखा संगणक सुरू करायला घाबरणारा. तोकड्या ज्ञानाने जर कॅंम्प्युटर इंजिनिअर होऊन चांगल्या पगाराची नोकरी करत आनंदात जगत असेल तर मित्रांनो तुमच्या सारख्या हुशार मुलांसाठी संगणक क्षेत्रात किती वाव आहे हे यावरून तुम्ही च ठरवा. पुणे, हैदराबाद, बंगलोर सारखी शहर आयटी हब बनली आहेत. गरज आहे ती तुमची.... येणाऱ्या काळात आणि आजही सर्वात जास्त वाव आयटी क्षेत्रातील मुलांना आहे. माझ्या ग्रामीण भागातील लाखो तरुण सरकारी नोकरी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी वर्षांनुवर्षे स्पर्धा परीक्षेला देतात आणि हताश होतात. मित्रांनो, आयटी क्षेत्र तुम्हाला खुणावत आहे. रक्कड पगाराच्या नोकर्या, रिस्पेक्ट आणि आयटी क्षेत्रात देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी तयार व्हा........
