संगीत
संगीत
आहे जीवन संगीत
सात सुरांची मैफल
रंग भरावे कलेने
होई आयुष्य सरल....!!
प्रतिभेच्या वेलीवरी
चंद्र चांदणे फुलती
कधी सुगंध भरतो
येती सुखाची चलती...!!
नऊ रसाचा प्रवाह
ह्रदयात उतरूनी
देती अलभ्य आनंद
जीवा संगीत भरूनी...!!
सुख दुःख सोबतीला
जणू मित्र जीवनाची
मार्ग सुलभ होतसे
शर्थ करा प्रयत्नाची.....!!
संकटाचे आवरणे
नित्य परोपकारानी
विनम्रता अंगी घ्यावे
अंहभाव विसरुनी.....!!
असे जीवन संगीत
गान हसत जगावे
वैरभाव विसरूनी
प्रेम सदा उधळावे.....!!
जीवनाचे संगीत हे
दु:खे मनाला छळते
नाही राहत मुळीच
गाता हसून पळते....!!