STORYMIRROR

Tukaram Biradar

Children Stories Inspirational

4  

Tukaram Biradar

Children Stories Inspirational

समस्या

समस्या

2 mins
555

एका राजाने अतिशय सुंदर महाल बनवला होता आणि महालाच्या मुख्य दारावर एक गणिताचे सुत्र लिहिले होते. आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हे महाद्वार जो कोणी उघडेल त्याला माझा उत्तराधिकारी घोषित करेन. कारण राजा निपुत्रिक होता. व त्याला आपले राज्य अशा व्यक्तीकडे द्यायचे होते की ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी. ही घोषणा ऐकून राज्यातील मोठ-मोठे गणितज्ञ आले आणि सुत्र पाहून निघून गेले.

    कारण असे सुत्र त्यांनी आयुष्यात पाहीले नव्हते. मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी फक्त तीन लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सुत्र सोडवायचा प्रयत्न करु त्यामधील दोन जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते. आणि एक त्याच राज्यातील अत्यंत गरिब पण अतिशय हुशार असा एक शेतकरी होता. गणितज्ञाने अनेक सूत्राचा उपयोग करून पाहीले पण दरवाजा काही उघडायचा नाव नाही. लोक हैराण झाले. तेवढ्यात तो शेतकरी ऊठला. तेव्हा लोक म्हणू लागले की एवढे मोठमोठे गणितज्ञ काही करु शकले नाहीत, तर हा शेतकरी काय करणार? शेवटी त्याला सांगण्यात आले की चला तुमची वेळ आली आहे. तेव्हा शेतकरी ऊठला स्मित हास्य केला. दरवाजाकडे गेला सुत्र वाचले, त्याला काय कळणार त्या सूत्राचे. शेवटी त्याने दरवाजा न्याहाळून पाहीले अन् दरवाजा मागे ढकलला.आणि काय आश्चर्य दरवाजा उघडला. सर्वांनी त्या शेतकरी यांचा जयजयकार केले. नंतर त्याचा सन्मान करुन राजाने त्याला सहज विचारले की आपण कोणते सुत्र वापरुन दरवाजा उघडला.

      तो शेतकरी नमृपणे म्हणाला की मी गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान लोक सुत्र वापरन दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही. तेव्हा मी विचार केला की हे सुत्र खोटे असावे. आणि दरवाजा पाहीला तर त्याला कडी-कुलूप काहीही दिसत नाही. मी ठरवले होतं की समस्या काय पहीले बघू नंतर ते कसे सोडवायचे ठरवू. मी तेच केलं. 

    कित्येक वेळा जीवनात समस्या या नसतात. पण आम्ही त्या विचारानेच अर्धमेलो होतो की ते कसे सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते. जीवन दु:खी होण्याचं हेच मोठं कारण आहे. जीवनात संकटाचं येणं हे part of living आहे. आणि संकटांना हसत सामोरे बाहेर पडण्याचे हे सुत्र आहे..... 


Rate this content
Log in