Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

समाजहितार्थ चळवळी"

समाजहितार्थ चळवळी"

4 mins
710


विविध क्षेत्रातील चळवळीनी समाजहितार्थ अनेक कार्य केलेले आहे. मुळात चळवळीनी दाखवून दिलेल आहे की,या जनशक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे. किती कार्यक्रम होतात त्यात अनेक पद्धतिने लोकांना काही करण्याची संधी मिळत असते.किती नावारुपाला येतात तर कित्येक लोकांना ज्ञान मिळते तर कित्येकांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटतो. 


   विकास कार्याला ही हातभार लागतो, समाजामध्ये सर्व प्रकारची लोक असतात,त्यांना कुणीची साथ हवी असते, दैनंदिन गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी सामुहिकरित्या अश्या चळवळींची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, समाजहितासाठी अनेक नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, कलाकारांनी, शेतकऱ्यांनी. क्रांतीकाऱ्यांनी अनेक प्रकारच्या चळवळी राबविल्या आहेत. सनातन काळी,ऋग्वेदात अनेक चळवळी राबवल्या गेल्या, भारतात जेंव्हा ब्रिटीशांच शासण होत तेंव्हा अनेक राजकीय, सामाजीक, संघटना,संस्थांनी चळवळी राबवल्या होत्या. उदाहरणार्थ...स्त्रीशक्तींनी उभारलेली चळवळ,बलात्कार पीडितांसाठी गाजवलेली चळवळ या सर्वातून आपणास चळवळीचे महत्व लक्षात येत. 


महात्मा गांधीनी चले जावचा नारा बुलंद करुन सत्याग्रह केला.बाबासाहेब आंबेडकरानी ही अनेक चळवळी राबवल्या होत्या,आणि आपण पहातोच आहे,की साहित्यकारांनी लेखनी हातात घेवून चळवळी उभारल्या आहेत, पुरोगामी विचारांना फाटा दिलेला आहे. या चळवळीने आज पूर्ण जग व्यापल आहे.


      बहुतेक उत्तर वैदिक काळामध्ये समाजात विषमता मोठ्या प्रमाणात होत्या.त्यानंतर मध्यमयुग कालखंडात ती अधिकच तीव्र होत गेली. विषमतेच्या विषाने संपूर्ण समाज होळपळून निघाला होता. समाजामध्ये चालीरीती, रुढी, परंपरा, अंधश्रध्दा आणि जातिव्यवस्था याचे जाळे समाजात घट्ट पाय रोवून बसलेले होते.कर्मकांड, व्रतवैकल्ये, दानपुण्य या सर्वांचे महत्व वाढल्यामुळे धर्मगुरू, शास्त्री, पुरोहित,पंडित व ज्योतिषी यांचे समाजात प्रस्त होते .समाजात स्त्रियांची परिस्थिती खुपच दयनीय होती. स्त्रीजीवन,परंपरेच्या व चालीरीतीच्या आणि धर्मांधतेमुळे जखडलेले होते.स्त्रीचे अस्तित्व चूल आणि मुलं त्यातच त्यांच सर्वस्व होत. स्त्री ही अध्यात्म मार्गातील धोंड ,मूर्ख,अविवेकी,चरित्रहीन, पाखंडी, धूर्त, कपटी, अपवित्र अश्या कितीतरी पदाने तिला नावाजल्या जात होत ! त्यामुळे तिचे अस्तित्व नाहिसे झाले होते.समाजाला या काळात योग्य दिशा दाखवण्याची व परिवर्तशिल विचाराची अत्यंत गरज होती.तेंव्हा समाजातील स्त्री मुक्त्ती चळवळींनीही स्त्रियांना त्यांचे अस्तित्व मिळून दिले.....


    विविध क्षेत्रातील चळवळी - काल आणि आज खरं तर चळवळ ही सामाजिक परिवर्तनवादी असे अस्त्र आहे की.! ज्या अस्त्रांच्या साह्यायाने अहिंसक पद्धतीने मानव आपले हक्क,,अधिकार व न्याय मिळविण्यासाठी चळवळीचा उपयोग करु शकतो .मात्र त्या मुख्य चळवळीचा सूत्रधार व संघटक हा ध्येयाने झापाटलेला व युगपरिवर्तक विचाराचा असावा लागतो. हे अतिशय महत्वाचे आहे. ! 


    इंग्रजी राजवटीला जेंव्हा भारतात सुरुवात झाली तेंव्हाच खऱ्या अर्थाने नव्या युगाचा प्रारंभ झाला. व इंग्रजीतून नवशिक्षण घेतलेल्या बुद्धीवादी तरुण वर्गाला समाज अस्थिरतेची खरी कारणे कळायला लागली.समाजाच्या राजकीय,आर्थिक, धार्मिक, सामाजीक व सांस्कृतिक जीवनात आधुनिक व वैज्ञानिक विचारांचा स्वीकार केला. हे केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही याची जाणीव समाजातील शिक्षित तरुणांना व्हायला लागली होती. व त्यामुळेच समाजात खऱ्या अर्थाने प्रबोधनात्मक चळवळींना सुरुवात झाली होती.


  विशिष्ट समुदायाने एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नाच्या मागे एखादी मार्गदर्शन करणारी व्यक्ती किंवा विचारांचे सशक्तीकरण त्यामागे असते. त्या प्रेरणेने झालेल्या प्रयत्नास यश दिले होते.खर तर याच परिवर्तन वादी चळवळींनी समाजातील अस्थिरतेला प्रगतीच्या मार्गावर नेले .महात्मा फुले यांनी पुढाकार घेवून समाजसुधारणा चळवळीची सुरुवात केलेली होती.आणि समाजातील दलित समाजाला आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिली होती.व स्त्रीशिक्षणाची मोहीम राबवली होती.दलीतांना शिक्षण, विधवा पुनर्वसनास चालना व बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना,शेतकऱ्यांचे प्रश्न व सर्वच समाज कंठकाच्या नियमांना झुंगारुन स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद सुरू करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला होता.त्यांच्या नंतर अनेक समाजसेवी लोकांनी चळवळी राबवल्या होत्या. जसे विष्णुशास्त्री पंडित,आगरकर,पंडिता रमाबाई, न्यायाधीश रानडे यांनीही समाजसुधारना चळवळीत मोलाचे कार्य केले होते.या चळवळींनी समाजाला नवसंजीवनी व नवदृष्टी दिली होती. अनेक प्रेरणा देवून समाजामध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या. चळवळीत आर्य समाज व सत्यशोधक समाजाने समाजातील लोकांना योग्य मार्ग दाखवून समाज प्रबोधण केले. त्यामुळे समाजातील शतकानूशतके गुलामगिरीच्या सावटाखाली खितपत पडलेल्या समाजाला नवंसंजीवनी मिळाली होती.


  स्वातंत्र्य चळवळीचे योगदान तर सर्व भारतवासियांना माहितच आहे .स्वातंत्र चळवळीने इंग्रजांच्या जुलमी धोरणा विरुद्ध अनेक उठाव करून त्यांना सळो की पळो करून सोडले होते .दादाभाई नौरोजी,लोकमान्य टिळक यांनी आपल्या संघटने मार्फत व लोकांमध्ये नवविचाराचे बीज रोवून स्वराज्याची नवदृष्टी दिली होती.स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण या विषयी अभिमान जागृत करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात रणसिंग फुंकले होते. 


  भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदिप्यमान पर्व म्हणजे, सशस्त्र क्रांतीकारी चळवळ होती. या क्रांतीकारकांच्या अपरिमित त्यागाने व बलिदानाने अनेक भारतीय जनतेला प्रेरणा देऊन कार्यास प्रवृत्त केले. महात्मा गांधी यांची असहकार चळवळ, चलेजाव चळवळ व भारतीय स्वतंत्र चळवळीतील भारत छोडो नारा, अभियानामुळे इंग्रज हा देश सोडून जाण्यास बाध्य झाले होते .


   भारतीय स्वातंत्र्या नंतरही समजात अनेक समस्या होत्या. त्यामुळे दलित व कामगार चळवळ अस्तीत्वात आली.कामगारांना हक्क व योग्य श्रमाचा मोबदला मिळवून देण्यासाठी कामगार चळवळीचा उदय झाला होता.तर दलित चळवळींनी हजारो वर्ष मानवी हक्कापासून वंचित असणाऱ्या समाजाला न्याय मिळून दिला होता.दलित चळवळ ही भारतीय स्वातंत्र पूर्व चळवळ असून यात महात्मा फुले, छ्त्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षि शिंदे यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर डॉ .आंबेडकरांनी समतेच्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारून न्याय,हक्क व अधिकार मिळवून दिला होता.


Rate this content
Log in