समाधानी कोण?
समाधानी कोण?
एक अत्यंत श्रीमंत राजा साऱ्या, सुखसुविधा असुनही आनंदी नव्हता. एके दिवशी त्याने आपल्या सेवकाला आनंदाने गाणे गात असताना पाहीले. राजाला आश्चर्य वाटले की मी या देशाचा असूनही दु:खी, निराश आणि तो सेवक गरीब असूनही इतका आनंदी कसा काय आहे.
शेवटी सेवकाला विचारलेही तू एवढा आनंदी कसा? तेव्हा तो म्हणाला, "महाराज , मी एक अगदी सामान्य माणूस आहे पण आम्हाल फार काही लागत नाही.डोक्यावर छत आणि पोटाला अन्न मिळाले की आम्ही समाधानी असतो.पण राजाला त्या सेवकाचे उत्तर पटले नाही म्हणून आपल्या विश्वासू मंत्र्याला विचारले . राजाची शंका आणि त्या सेवकाची गोष्ट ऐकल्यावर तो मंत्री म्हणाला, 'मला वाटतं तो सेवक 99 क्लब चा भाग नसावा' अजून. ते ऐकल्यावर आश्चर्याने राजा त्या मंत्र्याला विचारले, '99 क्लब म्हणजे नेमके काय' महाराज, आपण 99 मोहरा भरलेली थैली त्याच्या घराजवळ ठेवा. राजाने तसे केलेही . जेव्हा त्या सेवकाला ती थैली आपल्या घराजवळ दिसली तेव्हा त्याने ती आत नेली.
त्यातील ते सुवर्ण मोहरा पाहून आनंदी झाला. मोहरा मोजल्यावर त्या 99 निघाल्या. 100 वी मोहरा गेली कुठे म्हणून तो शोधायला लागला. खुप शोधल्यावर ही ती सापडेना तो शोधून थकून गेला. तो विचार करायला लागला की कोणी 99 मुद्रा कशा काय ठेवेल. ? पण शंभरावा नाही हे ही खरे आहे. त्याने ठरवले की आपण कठोर मेहनत करुनच शंभरावा मुद्रा खरेदी करु.
त्या दिवसापासून त्या सेवकाचे आयुष्य बदलले. तो अक्षरश: यंत्रासारखे काम करु लागला. कुटूंबातील सर्वांनी मिळून मदत म्हणून आरडाओरडा करु लागला. काम करताना त्याचं गाणं म्हणनं ऐकू येई नसे झाले. राजानेही ते पाहिले. त्याच्यातला हा बदल पाहून राजाने मंत्र्याला विचारले याचे कारण काय.
मंत्री म्हणाला आता तो 99 क्लब चा मेंबर झालाय. याचे कारण की प्रत्येकाला आपल्या जवळ जे आहे त्यापेक्षा जास्त अपेक्षा लागली . त. जो आहे त्यात समाधान मानतो तो सर्वात सुखी. आणि ज्याची आशा जास्त तो सतत दु:खी असतो......
