Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

समाधान

समाधान

1 min
147


    *स*- सतत आनंदी

    *मा*- मानवतेला धरून

    *धा*- धारदार विचारांचा

    *न*- नशीबवान 


   *अशी व्याख्या होवू शकेल "समाधान" या शब्दाची*

   *समाधान आपल्या मानण्यावर आहे.आपल्याकडे काहीही नसताना मानता येणारे समाधान,आपल्याकडे सर्व काही आहे पण आमूक एक नाही म्हणून असमाधानी व्यक्ती.अशा दोन भागात माणसे पाहायला मिळतात*

   *अजून एक मिळवण्याची ताकद आहे .कुवत आहे.समाजात प्रतिष्ठाही आहे पण तरी देखील जे मिळेल त्यात समाधान मानणारेही आहेत या जगात अशा माणासांना आपण अल्प समाधानी म्हणतो.*

   *अल्पसमाधानी व समाधानीस्वभाव खरे तर खूपप चांगला.कारण खूप काही मिळवण्याचीअपेक्षा नसते.जे आहे त्यात आनंद उपभोगतात.आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद लूटतात,*

   *खरच माणसाने जीवनात समाधानी असावे.उंच भरारी घ्यावी पण ती घेताना हातातले चांगले क्षण सुटता कामा नयेत.याचीही दखल घ्यावी.यावर एक म्हण आहे बघा."हातचे सौडून पळत्याच्या मागे धावू नये" खरचच आपल्या जीवनातही काही असे क्षण येतात की होत्याचे नव्हते होते.अशा वेळी आपण आपले निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत.कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.*

  *समाधानाने आयुष्यातील क्षण वेचावे.आनंदाने जीवन व्यतीत करावे.*


Rate this content
Log in