Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

समाधान

समाधान

1 min
125


वासंती ताई स्टेशनवर उतरल्या. बॅगा घेऊन चालू लागल्या. इतक्यात एक हमाल त्यांच्याजवळ आला. "ताई दया त्या बॅगा इकडे. "नाही नको" "अहो ताई दया जड आहेत" "अरे नको ,मी नेईन " त्या पुढे जात म्हणाल्या. का कुणास ठाऊक अचानक त्यांचे पाय जड झाले आणि हातही भरून आले. पाहिले तर तो हमाल अजूनही तिथेच उभा होता अशक्त, दमलेला दीनवाणा चेहरा करून, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे आशेने बघत. त्याच्या बरोबरीचे हमाल मात्र पटकन प्रवासी पकडून चालत होते. वासंती ताईनी त्याला हाक मारली तसा तो धावतच आला. त्यांनी बॅगा त्याच्या हातात दिल्या कसे कुठून त्याच्यात बळ आले तो एका दमात त्या बॅगा घेऊन टॅक्सी पाशी आला. वासंती ताईंच्या पायातही आता जोर आला होता. मगासच थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. त्यांना आश्चर्य वाटले. त्याच्या हातात शंभरची नोट ठेवली आणि त्या टॅक्सीत बसल्या. "अहो ताई, हे जास्त आहेत" "राहू देत, ताई तुमचे मोठे उपकार झाले,आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचे आहे मी वायदा केलाय पण सकाळपासून हवी तशी कमाई झाली नाही पण आता आशा आहे तुमच्या बोनीने चांगली कमाई होईल. तो हात जोडत म्हणाला इतक्यात टॅक्सीतून एक गृहस्थ उतरले आणि त्याला बॅगा देत" चल" म्हणाले तसा तो निघाला. वासंती ताई हसल्या एका गरजूला मदत करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.


Rate this content
Log in