Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Sangieta Devkar

Others

2  

Sangieta Devkar

Others

सलाम !! तिच्या कर्तुत्वाला !!

सलाम !! तिच्या कर्तुत्वाला !!

2 mins
246


स्त्री ही प्रेमळ,वात्सल्याची मूर्ति, तसेच सौंदर्याची खाण असते तसेच ती कणखर ,वेळप्रसंगी कर्तव्य कठोर त्यागाची परिसीमा गाठनारी असते. सहनशील, कर्तव्यपूर्तिसाठी झटनारी, लीलया एखाद्या क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करणारी असते. हे सारे गुण तीला तिच्या आईकडून माते कडून अर्थात जगजननी आदिमाते कडून मिळाले आहेत. कोणी तिला चंडिका,रणरागिनी,तर कोणी महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखतात्. ती कधी दुर्गा,तर कधी अनुसया, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आदी नावाने पूजली जाते. आज मुलीं मोठ्या संख्येने शिकत आहेत नोकरी व्यवसाय करत आहेत. आवडेल ते शिक्षण घेत मुलीं स्वतःच भविष्य उज्वल आणि उजळ बनवत आहेत्. समाजात स्वतःचे विशिष्ठ असे स्थान निर्माण करत आहेत. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत या मुळेच आजच्या स्त्रीला आपन आकांक्षा बाळगनारी,स्वतंत्र करियर करणारी महत्वाकांक्षी स्त्री म्हणून संबोधतो. धोंडो केशव कर्वे,महात्मा फुले,सावित्री बाई फुले यांनी स्त्री शिक्षणा साठी ,तिच्या प्रगती साठी जे अपार कष्ट घेतले त्याचे चीज झाले असे म्हणायला हरकत नाही.


या साऱ्यातुन प्रगल्भ विचारसरणीतून ती खंबीर बनत आहे. काही जणी अनिष्ट  रूढी ,पंरपरा तोडून काढ़णया साठी आप आपले उंबरे,भिंती ओलांडून जाण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्या हिमंती चे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कधी कधी यासाठी संघर्ष करावा लागतो तर कधी तिच्या जिवावर ही बेतत. खर पाहता तिची लड़ाई आईच्या गर्भातच असताना सुरु होते . पुढे जन्म झालाच तर अनेक बंधनाचे आणि अपेक्षा चे ओझे वागवत ती मोठी होते. मग लग्नाचे बंधन आणि त्या नन्तर संसाराच्या रंणागणा वर विविध भूमिका पार पाडत् ती रणरागिनी आयुष्यभर लढत राहते कारण तिच एकमेव सक्षम असते पूर्ण कुटुंबाची धुरा वाहण्या साठी!! तिची ही लढाई फक्त घरा पुरतीच मर्यादित नसते . ती आज कमवती आहे उच्च पदावर काम करत आहे पन अमानवीय सापळयात ती आज ही हतबल आहे . बुद्धिमता आणि कर्तव्य यांच्या जोरावर तिने स्वतःची वाट तर निर्मान् केली आहे पन त्याने ही तिच्या वाटेचा वाटेकरी व्हावा अशी सुप्त इच्छा अजुन अपूरीच आहे पन ती न् डगमगता उभी आहे सक्षमपने स्वतःच्या सामर्थ्या वर !!ती सर्व प्रथम माणुस आहे म्हणुच ती मुक्त हस्ताने मायेची,प्रेमाची ,उधळन करते आयुष्य समृद्ध करते ते ही समोरच्याला जाणीव ही न् होऊ देता कारण ती आहे अघाध अपार शक्तीने परिपुर्ण ,तीला ही शक्ति बहाल केली त्या विश्वविधात्यानेच म्हणून ती आई असते जणु मूर्तिमंत त्या भगवंताचे रूप ! आज च्या जागतिकिकरणाच्या झपाटयात स्त्री चे प्रश्न जसे स्त्री भ्रुण हत्या,लिव इन रिलेशनशिप,बदललेली नैतीकता , एक्ट्या राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न ,आय टी ,कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या स्त्रियां चे प्रश्न असे अनेक आजचे प्रश्न तीला घेरून् टाकत आहेत पन यातून पन ती मार्ग काढत पुढे जात आहे. नेटाने लढा देत आहे कारण तिच्या इतकी सक्षम ,सामर्थ्यवान तिच आहे. म्हणूनच तीला ,तिच्या कर्तुत्वाला सलाम!


Rate this content
Log in