"सकारात्मकतेने नवीन प्रयत्न"
"सकारात्मकतेने नवीन प्रयत्न"
घरी बाळ मंडळी जमली होती आणि डांस गाण्यांसाठी सेलिब्रिटींची वाट बघत होते. मस्ती धमाल सुरू होती पण एकटी परी...... अगदी शांत! आई-वडीलांनी खूप समजावले की जी घटना शाळेत घड़ली निधी बरोबर त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे असे घाबरून चालणार नाही. त्या माणसाला कोर्टात शिक्षा सुनावली गेली, न बर झाल तो तिच्यावर एसिड़ नाही टाकू शकला!
तेवढ्यात सेलिब्रिटींचे सर्वांनी मिळून सत्कार केले आणि मग परी बघते एकदम आश्चर्याने थक्क.......काय झक्कास डांस केला निधीने.
मग निधी म्हणाली सरत्या वर्षांची गोड़ आठवण मनात ठेवून येणाऱ्या नव्या वर्षात जीवनात झालेल्या परिवर्तनांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र झालोय न आपण? केक कापून सर्वांनी केले #2020 चे अनोखे स्वागत.