Jyoti gosavi

Others

2.9  

Jyoti gosavi

Others

श्रमाचे महत्त्व

श्रमाचे महत्त्व

2 mins
4.1K


इथे मोल ना कामाचे

 मोती पिकतील घामाचे

मानवतेचे मंदिर हे

सत्य शिवाहून सुंदर हे

आत लाविल्या ज्ञानज्योती 

श्रमिक हो घ्या इथे विश्रांती


श्रमाला पर्याय नाही, मग ते श्रम शारीरिक असोत की बौद्धिक असोत. कोणत्याही गोष्टीत जीव ओतल्या शिवाय हवे ते यश मिळत नाही . मंथना चे श्रम केल्याशिवाय नवनीत मिळत नाही.

त्यासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच श्रमाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. आमचे वेळी शारीरिक शिक्षणाचा तास होता त्यामुळे मुलांना व्यायामाची गोडी लागायची. श्रमदानाचा तास होता त्यावेळी आम्ही श्रमदान करायचो ,पण आता जीवघेण्या स्पर्धेपायी मुलांचे हे तास आता इतर विषयाचे शिक्षक खातात.

 त्यातून मोबाईल, संगणक, टीव्ही या गोष्टींमुळे एका जागी बसून राहणाऱ्यांची एक पिढीच्या पिढी तयार होतेय. त्यातूनच लहान वयामध्ये डायबेटिस, ब्लडप्रेशर ,हृदयरोग इत्यादी आजार लागतात. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होतोय ,कारण आजारपणातील औषधे, हॉस्पिटलचा खर्च ,हा वाढत आहे त्यामुळे देशाची उत्पादनक्षमता कमी होते. मुलांना देखील शारीरिक, बौद्धिक कोणतेच श्रम करण्याची त्यांची तयारी नाही. झटपट पास होण्यासाठी कॉपीचा सोपा रस्ता मुले पकडतात. या गोष्टी टाळण्यासाठी नियोजनबद्धता हवी. जर दररोज अभ्यास केला तर कॉपी ची गरज पडणारच नाही अगदी लहान वयापासून एखादे ध्येय ठरवले तर त्या दिशेने वाटचाल चालू होईल परंतु आताच्या मुलांना श्रम करायचे नाहीत तर यशाचे शॉर्टकट पाहिजेत


समर्थ रामदासांनी श्रमाचे महत्त्व पटविण्यासाठी "यत्न तो देव जाणावा "किंवा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असे सांगितले समर्थ स्वतः दिवसाला बाराशे सूर्यनमस्कार घालीत असत.

जर कष्ट केले तर ते वाया जात नाहीत अशा अर्थाची म्हण रूढ आहे

"वाळूचे कण रगडीता तेलही गळे"

कोणत्याही आयत्या मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत नसते.

कष्टाविना नाही फळ

कष्टी कष्टाची नाही ते निर्फळ

आपल्या देशातील लोकांना मात्र सारे काही फुकट पाहिजे .फुकट मिळते म्हटल्यावर ती लोक दाऊदला पण निवडून देतील. लोकांच्या या आळशी वृत्तीला राजकारणी अजून खतपाणी घालतात स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या गोष्टी जाहिरनाम्यात देतात उदाहरणार्थ दोन रुपये किलो तांदूळ, मुलांना पीसी फुकट, एक रुपयात झुणका भाकर इत्यादी

धडधाकट लोक देखील भिक मागतात कित्येक भिकाऱ्यांकडे नोटांची पोती भरलेलीआढळतात. लहान मुलांना पळवून आणून भीक मागायला लावतात ही सारी श्रमा विना झटपट पैसा कमावण्याचे मार्ग आहेत समाज पुरुषाची मानसिकता त्यासाठी इतकी घसरलेली आहे. म्हणून कोणाला जर लहान मुलांचा इतकाच कळवळा आला तर त्यांना बिस्कीटचे पुढे किंवा इतर खाऊ द्या पैसे देऊ नका.

अर्थात जगात सारेच काही ऐत खाऊ नसतात. शारीरिक व बौद्धिक कष्टाला आपला देश मागे नाही. सर्व अरब अमिरातीत शारीरिक कष्ट करणारे भारतीय मजूर आहेत तर इंग्लंड अमेरिकेमध्ये बौद्धिक कष्टाची कामे करणारे भारतीयच आहेत 

ज्यावेळी अमेरिका आपल्याला कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान देत नव्हती तेव्हा अच्युत गोडबोले यांनी परम नावाचा सुपर र्कॉम्प्युटर बनवला.

अभिताभ सारखा सेलिब्रिटी या वयात देखील अठरा-अठरा तास काम करतो, तर सचिन सारखा सेलेब्रिटी वयाच्या बारा-तेराव्या वर्षापासून बांद्रा ते दादर एवढे मोठी बँट सांभाळून लोकलमधून प्रवास करीत होता म्हणूनच तो सचिन झाला .

जो चालतो त्याचे भाग्य चालते ,जो बसतो त्याचे भाग्य बसते.

परिश्रम, प्रामाणिकपणा, ध्येय व चिकाटी ही चतुसूत्री पाळली तर यशाचा मार्ग दूर नाही


Rate this content
Log in