The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

krishnakant khare

Others

4.5  

krishnakant khare

Others

श्रमाचे महत्त्व

श्रमाचे महत्त्व

5 mins
1.2K


आपण आजूनही खेड्यागावात पहातो लांबुन पायपिट करीत पाण्यासाठी दुरवरच्या पाणी असलेल्या विहीर कडे पाणी भरायला ,तहान भागवायला ,आपलं श्रम घेत असतात

 आपल्याला श्रम म्हणजे नक्की काय बघायचं असेल तर लहान मुलं ,शिशु याचं आपोआप खेळण्याचं निरीक्षण करायला पाहिजे तेव्हा कळतं हे की श्रम काय असतात, म्हणजेच निसर्गधर्माप्रमाणे शरीरच आपल्याला काहीतरी शरीराची हालचाल करण्यासाठी खेळण्याच्या माध्यमाने सांगत असतं आणि लहान मुल खेळण्यातच रंगत असतात. म्हणजेच 

निसर्गताच त्या बाळाला श्रमात तुझा विकास आहे ,

 , मानसिक विकास आहे असं सांगत असतो. आणि लहान मुलांना सुद्धा खेळणे बागडणे शिवाय करमत नाही आणि हिच मुले वयात आल्यानंतर ,मोठी झाल्यानंतर त्यांचं शारीरिक, मानसिक विकास पूर्ण झालेला असल्याने ,त्यामुळे त्या वयात ती मुलं लहान मुलासारखी खेळायला बागडायला मागत नाहीत म्हणजेच आपल्याला इथे कळून येईल की शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी श्रमा शिवाय कोणताच पर्याय नसतो,, पाहिलंच ना लहान मुलांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्यालासुद्धा श्रमा शिवाय पर्यायच नाही असं कळून येतं पण जसजसं आपलं वय वाढत जातं तसं आपण सभोवतालच्या नेहमीच्या रुटींग स्वभावामुळे आत्मनिरीक्षण करणेही सोडुन देतो पण इथेही आपल्याला कळले असेल आत्मनिरीक्षण करणेसुद्धा एक श्रम आहे पण आपण ते सातत्य ठेवायला हवं नाहीतर शरीर आणि मन ही आपल्याला साथ देणार नाही मग काहीच श्रम न करता असलेले शरीर निरोगी कसे राहील यासाठी हे श्रमाचे महत्त्व आहे.

 श्रमाचं दुसरी गंमत म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जातं तसंतसं शरीर आपलं मनही वेगळ्या तऱ्हेने बदलून श्रम घेत असतं पण ते आपल्याला कळत नसतं त्याकरता आत्मनिरीक्षण करणं आवश्यक असतं कारण वयात येताना त्याची तारुण्याची भाऊगर्दी वाढलेली असते ,

 तारुण्यसुलभपणे आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असतो, निसर्गाने मानवाला पशुपक्ष्यांना बालपण, तारुण्य म्हातारपण अशा तीन अवस्था दिलेल्या आहेत  जेणेकरून तुम्ही त्याचा योग्य तो उपयोग करा पण कोणतीही गोष्ट अती करू नका कारण अतीपणा मुळेच आपलं मानसिक, शारीरिक नुकसान होऊ शकतो हेच निसर्गाच्या सूत्राला सांगायचं असतं,आपल्याला निसर्गाच्या सुत्र काय आहेत ते समजून घ्यायचे असते. म्हणून तर आत्मनिरीक्षण करणं महत्त्वाचं असतं व आपल्याला कळतं, श्रमा शिवाय पर्यायच नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यामागे आपल्या पालका करवी आपल्याला मार्गदर्शन मिळते आपलं संगोपन होतं त्यामुळे आपली पुढची वाटचाल सोपी होत असते पण यासाठीही आपण एक दुसऱ्याला मदत करत असतो भावी पिढीने येणाऱ्या पिढीला अशा रीतीने मदत करत असतो. निसर्गाने आपल्या शरीरात पुन्हा कार्यरत करण्यासाठी शरीराची काही वैशिष्टे दिली आहेत ते म्हणजे आपल्या शरीराला काहीवेळ श्रम केल्यानंतर थकलेल्या शरीराची श्रमपरिहार करण्यासाठी विश्रांतीची गरज असते म्हणून निसर्गनियमाप्रमाणे आपल्याला आठ तास झोपेची गरज असते. पण मनुष्य हा कधीकधी कामाने इतका व्यस्त होतो ती की त्याला विश्रांती घेणे आवश्यक का आहे हे सुद्धा कळत नाही त्यामुळे शरीर पाहिजे तसा त्याला साथ देऊ शकत नाही म्हणजेच काही गोष्टींसाठी तज्ञांची गरज असते ती ह्याच मुळे आता आपण म्हणाल तज्ञ का बरं कारण तज्ञामुळे काय बरं काय वाईट याचं आकलन होतं, मार्गदर्शन मिळत असतं म्हणजेच तज्ञ व्हायला,त्याविषयाचा अनुभव घ्यायला त्यालाही श्रम लागलेले असतात असंच आपल्याला कळून येतं.  श्रमाचं महत्व किती असते ते म्हणून आपण नेहमी वावरतो तिथे प्रत्येक जण काहीना काही श्रमदान करत असतो आणि या श्रमामुळे एक दुसऱ्याचं भलंच होत असतं,

ज्यांनी आपल्या प्रगतीसाठी श्रमाचे सातत्य ठेवले तर त्याची प्रगतीच होत राहील त्या प्रगतीला कोण  अडवू शकतो,

तुम्हाला किंवाआपल्याला असही आढळलेले आहे की काहींकाना शरीराचे अंग कमी असते. म्हणजेच ती शरीरानी, मनानी व्यंग किंवा अपंग जरी असली तरीही ती व्यक्ती इतरांपेक्षा एक्सपर्ट असते , असं का कारण त्या व्यक्तीला पूर्ण अंग नसल्याने त्याच सारे लक्ष गरज पुरवणाऱ्या इतर अंगाकडे असते त्यामुळे त्या श्रमामुळे ,मेहनतीने ते शरीरातील अंग जास्त क्रियाशील होतं आणि शरीर धर्माप्रमाणे आपल्या गरजेला शरीर आपलं साथ देते,   

 

आपण जगात पाहतो एकाहून एक व्यक्ती  वयान, अनुभवानं, पैशानं मोठी झालेली असते. ह्यामागे सुद्धा श्रम असतात, 

आताच पाटलांनी आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात केले. नवरामुलगा चंदन चांगला एम.बि.ए.झालेला, 

पाटलांची मुलगी श्रद्धा पण आय.टी. झालेली.पण तिच्या मैत्रिणी आय.टी. होऊन जोब करीत होत्या, लग्न होऊन, श्रद्धा बरोबर दहाव्या महिन्यात अशीच घरी आली होती, पाटिल आपली बर्याच दिवसांनी आली म्हणून आनंदात होते,घरात कसं काय चालले आहे हे विचारणारच होते पण  एवढ्या लवकर नको म्हणून इकडतिकडच्या गोष्टी झाल्या, चाय नाश्ता झाला,श्रद्धाची आई सहजच श्रद्धेला म्हणाली घरी कसे ठिक चालेलय ना?हे ऐकून श्रद्धा थोडी चचापली आणि सासरकडची गोष्ट सांगायला सुरुवात केली,आई काय सांगू ?आपण म्हणू तश्या गोष्टी नसतात ग, चंदनने एम.बि.ए.केले खरे पण एमबिएच्या सलग्न काही तरी जोब नको का करायला, एमबीए एमबीए करीत एमबिएच्या जोब शिवाय दुसरा कोणताच जोब करायला तयार होत नाही तें,त्यामुळे त्याच्यांत त्यांच्या पप्पां बरोबर खडाजंगी होते,नशीब त्यांचे पप्पा सरकारी खात्यात कामाला आहेत म्हणून बरं,त्यामुळे घरचा कारभार सासरांच्या हातात आहे म्हणून तरी राहणे खाणे हि समस्या आम्हाला होत नाहीत ,एमबिएच्या नावाने छोटेमोटे काम करायला नको, श्रम घ्यायला नकोत ,छोट्या मोठ्या वडापावाचा स्टाल जरी खोलून इमादारीने श्रमाने काम केले असते ना तरी बरे वाटले असते,  

आपण हाय एज्युकेशन घेतल्याने आपण छोटमोठे धंद्ये,नौकरी करीत नाही,पण हेच छोटे मोठे नौकरी धंदे करणारे लवकरच स्वावलंबी होतात,व आपल्या हौसचे सर्व गोष्ट करतात,आणि जीवन सुखाने घालवतात.ह्यासाठी चंदनने पण नको का छोटे मोठे श्रम करून कामधंदे करायला, एवढा शिकलो मग का म्हणून छोटे मोठे श्रम घेऊ हा चंदनंचा हेका असतो,  

 एक इंजिनिअर झालेला आणि एक वडापाव विकणारा काही दिवसांनी तुम्हाला कळेल की वडापाव विकणारा आपला मेहनतीने श्रमाने बाजी लावून जातो कारण का त्याला आहे त्या कृतीतून पैसा कमवायचा असतो आणि लोकांची नाश्तेची गरज भागवायचे असते आणि तो ती  गरज भागवतो पण इंजिनिअरिंगला खूप वेळ झालेला असतो त्याला त्याचं श्रमाचे फळ मिळतं पण थोडा उशीर होतो. म्हणजेच आपल्याला समजून घ्यायचं असतं कोणत्या श्रमाने आपल्याला कसं कधी कमवायचं असतं आपल्या वयाचा कमविण्याचा पिरियड 24 पासून ते 50 वयापर्यंतचा असतो. हे जर पालकांनी लहानपणी मुलांवर बिंबवण्याचा श्रम घेतले तर पाल्य चांगलीच प्रगती करेल यात कुठलाच संशय नाही. तारुण्या नंतर आपलं उतरत वय असतं पण आपलं हे उत्तरत वय सुखासमाधानाने जाण्यासाठी आपल्या शरीरासाठी श्रम करावेच लागेल तरच शरीर तुम्हाला साथ देईन आपण पाहतोच नेहमीचे रुटीन मध्ये गाडीला सुद्धा एअरआईलिंग करावं लागतं मोबाईलला सुद्धा चार्जिंग करावी लागते मग हे आपल्या शरीर पण मशीन सारखेच असते ना त्याला श्रमाची जोड द्यावीच लागेल त्याशिवाय शरीर आपल्याला सात साथ कशी देईल जितका शरीराला आपण श्रम द्याल तेवढं ते क्रियाशील होईल साधं उदाहरण द्यायचं तर आपण  सुरीला धार द्यायची असेल तर कानसेने घासतो आणि त्याची धार चांगली करतो तसंच आपल्या शरीराला श्रम दिल्याशिवाय पर्यायच नसतो कारण या उतरत्या वयात शरीर श्रमा अभावी अर्थात योगसाधना अभावी,व्यायामा अभावी पोक्त होत चाललेलं असतं आणि श्रम नसल्यामुळे शरीराला वजनही वाढत असतं आणि या वजनामुळे आपल्याला अनेक व्याधी होत असतात मग काहिकाना जाडेपणा ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबेटिस दमा,अशा ना ना व्याधीने वार्धक्य येत असतं आणि आपण डॉक्टर उपायाने ती व्याधी कमी करण्याची मेहनत घेत असतो आणि आपल्याला काही प्रमाणात बरं ही वाटतं पण येथे आपण हा विचार करायला हवा की आपण श्रमपरिहार म्हणजेच योग साधना व्यायाम साठी श्रम दिले पाहिजेत , मेहनत घेतली पाहिजे तरच आपल्याला उतरत्या वयात आपल्याला असहनीय वार्धक्य, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीस, दमा यासारखे छोटे-मोठे रुटीन रोग आपल्याला सतावणार नाही . 

म्हणजे पाहिलेत ना जसं आपलं हृदय रक्ताचं पंपिंग करण्याचं काम अहोरात्र करीत असत ते श्रमच करीत असतं, त्यामुळे हृदयाचे काम चालुच असल्यामुळे आपण जिवंत असतो. हृदयाचं चालु रहाण्याचा काम संपलं तर ते आपलं जीवनही संपलेलं असतं. म्हणून आपल्यालासुद्धा आपल्या शरीराच्या प्रगतीसाठी आपल्या मनाच्या प्रगतीसाठी श्रमच करावे लागतात म्हणजेच हृदय जन्मापासून ते मरेपर्यंत चालू असतं तसेच आपल्याला सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनासाठी श्रम करावेच लागतात.  श्रमा शिवाय कोणत्याच गोष्टीला पर्याय नसतो हेच हे या श्रमाचे महत्व असते.Rate this content
Log in