Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

1 min
271


श्री स्वामी समर्थ 

जय जय स्वामी समर्थ 


स्वामी म्हणजे माऊली. कृपेची सावली .स्वामींचे अनुभव घेऊ तेवढे कमीच. स्वामींची प्रचिती येते ती संकट समयी. या वेळी ते आपली आईसारखी काळजी घेतात. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या हाताचा प्रेमळ स्पर्श सदैव जाणवतो. त्यांचा आश्वासक, धीराचा स्वर ऐकू येतो. वेळोवेळी ते आपल्याला सूचना देतात. संकेत देतात. उपदेश करतात. योग्य मार्गदर्शन करून आपला खडतर प्रवास सुखकर करतात. साशंक मन निःशंक होते. भय पळून जाते. आशेचा किरण दिसतो. सारे कष्टं संपल्यासारखे वाटतात. 


संकट कितीही मोठे असले तरी आपण त्यातून सहज तारुन जातो.

अर्थातच यासाठी स्वामींवर निस्सीम श्रद्धा हवी, भक्ती हवी, निःस्वार्थ मन हवे.


Rate this content
Log in