श्रद्धा
श्रद्धा
एक महिला दररोज मंदिरात . एके दिवशी बाईंनी सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही. यावर पुजाराने विचारले का? मग ती बाई मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते ! काहीनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होमहवन प्रामाणिक पणे कमी करतात. आणि देखावा जास्तच करतात.
यावर पुजारी काही काळ शांत राहीला नंतर म्हणाला,. ते बरोबर आहे. ्.. " पण तुमचा अंतीम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो तुम्ही काही करू शकता का?
बाई म्हणाली, तुम्ही मला सांगा काय करावे? पुजारी म्हणाला, एक ग्लास पाणी भरा. आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा घालावी. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एक थेंबही खाली पडता कामा नये. बाई म्हणाल्या, मी हे करु शकते ! मग थोडयाच वेळात त्या बाईने तेच केले. त्यानंतर मंदिराच्या पुजाराने महिलेला 3 प्रश्न विचारले, -
1) तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?
2) तुम्हाल मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?
3) तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसले का?
बाई म्हणाली, नाही मी काही पाहीले नाही.
मग पुजारी म्हणाला, तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते.जेणेकरुन त्यातील पाणी पडू नये म्हणून तुम्हाल काहीही दिसले नाही. आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याला तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्मा कडे केंद्रीत करा. मग तुम्हाला काहीही दिसणार नाही...
