श्रावणसरी
श्रावणसरी
रिमझिम रिमझिम पाऊस धारा
सोबत मंद गार गार वारा!!!
स्वागत करू पावसाचे
रूप घेऊन आले नाविन्याचे!!!
पाऊस खूप छान पडतोय ना?? पाऊस सर्वांना खूपच आवडतो आणि मला पण!!
वादळी पाऊस वेगळा, मान्सून पाऊस वेगळा, आणि श्रावणातला पाऊस खरेच आल्हादायक!!!!
श्रावण सरी कोसळतात आणि निसर्ग नयनरम्य होतो.
आत्ता पण श्रावण महिन्यात चालू आहे. झाडे, पाने, फुले कसे टवटवीत होतात. जणू काही नयनरम्य सोहळा!!!!
सगळीकडे हिरवळ जणू काही नवीन "नववधू"!!
हिरवा शालू ,,हिरवा चुडा घालून नववधू कशी नटते...
तशीच वसुंधरा पण सजते श्रावण सरीने..
वादळी पावसासारखे या पावसाचे भय वाटत नाही..
ना विजेचा प्रचंड कडकडाट
ना ढगांचा गडगडाट
शांत ,मोहक श्रावणधारा!!!
श्रावणाच्या पावसाने माझा बगिचा तर फुलून येतो.. सृष्टी हिरवीगार होते ,वसुंधरा नटते. तर माझी बाग पण हिरव्या मखमली गालिच्याने बहरते....
गर्द हिरवाई ला शोभे
केशरी उन्हाचा साज!!!
सर्वांना हवा हवासा वाटतो
हिरवागार श्रावण राज!!!
श्रावण महिन्यांमध्येच व्रतवैकल्ये असतात आणि अशा सुंदर वातावरणात बाहेर जाण्याचा आनंद खूप वेगळा असतो..
देवदर्शनास जाण्याची ही अगदी वेगळीच मजा येते...
सूर्याची कोवळी किरणे
धरतीवर आली!!!
तिला पाहून वसुंधरा हसली
पांघरुनी सोनेरी शाल सृष्टी ही नटली!!!!
श्रावण मध्ये ऊन-पावसाचा खेळ चालू असतो.
कोवळे ऊन आणि रिमझिम पाऊस धारा!!!!
पक्ष्यांची किलबिलाट!!
चातक पाहतो पावसाची वाट!!
पाऊस चातकाची तृष्णा भागवतो
कोकिळा तिच्या मंजुळ स्वराने गीत गाते तर काळ्याकाळ्या ढगाला पाहून मोर नाचत असतो...
पक्ष्यांची किलबिलाट
चिमण्यांची चिवचिवाट!!!
कोकिळेच्या मंजुळ स्वर
धरती आनंदी झाली सृष्टी ही गीत गाऊ लागली!!!!
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
रिमझिम पाऊस पडतो आणि सृष्टी नाहून निघते.. अशा वेळेस दुचाकी वाहनावर फिरायला मजा येते.. पावसाचे थेंब चेहर्यावर पडतात आणि त्याची मजा खूपच वेगळी येते.. अशा पावसात भिजायला हि खूप मजा वाटते.
येरे येरे पावसा तुला देतो पैसा
मला लहानपणी चे गाणे आठवते
तसेच,,,,
ये ग ये ग सरी माझे मडके भरी...
अजून बालपणीची एक आठवण...
कागदाची बोट तयार करणे (होडी)
आणि तासनतास ती पाण्यात सोडणे खूप मज्जा यायची..
मग ती बोट वाहून जायची
परत बाबांना हट्ट करून नवीन बोट तयार करायला लावणे...
छत्री घेऊन उगीचच पावसात जाणे..
छत्री वरचा पाण्याचा टप टप आवाज.. अन छत्रीची उघड झाप
तसेच रेनकोट आणि गम बुटा मजा...
श्रावणात वाहणारे झरे, धबधबे डोंगरातून पडणारा पाऊस, कड्या कपारीतून वाहणारे पाणी..
अल्हाददायक वातावरण
निसर्गरम्य वातावरण
तुडुंब भरलेल्या नद्या ,नाले, तळी... खरेच खुप छान वाटते
पाऊस पडताना चहा आणि भजी खाण्याचा आनंद खूप वेगळाच वाटतो..
गरम गरम भजी आणि वाफाळता चहा श्रावणातल्या पावसाला न्यारीच रंगत आणतो...
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे!!
क्षणात येते सर
क्षणात फिरुनी ऊन पडे!!!!
