सुमित बारी

Others

5.0  

सुमित बारी

Others

शिव महिमा!

शिव महिमा!

1 min
380


 मध्य प्रदेशात बाबा वैद्यनाथांचे भव्य मंदिर आहे. तिथे इंग्रज अधिकारी (सैनिक)आपल्या भारतातील सुखदुःखाच्या खबरी आपल्या ब्रिटन स्थित पत्नीस पाठवत असे, त्याची बाबा वैद्यनाथांवर श्रद्धा होती. पुढे त्याला युद्धासाठी अफगाणिस्थान जावे लागले, तेथे त्याला पत्नीस निरोप पाठवायला वेळ मिळत नव्हता, तिकडे त्याची पत्नी त्याच्या समाचार साठी बेचैन होती. शेवटी ती भारतात आली तेव्हा तिला कळले की तिचा पती अफगाणिस्थानला युद्धासाठी गेला आहे. तेव्हा तेथील पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे तिने पती सुखरूप परत यावा यासाठी अखंड अकरा दिवस ओम नमः शिवाय चा जप केला. तिकडे पठाणी सैनिक ब्रिटिशांवर वर भारी पडत होते, पुढे अचानक एक मोठा जटावाला बाबा त्रिशूल घेऊन आला त्याने पठाणी सैन्याला पळवून लावले, पठाणी सैन्याची हार झाली जटावाला बाबा अदृश्य झाला. तिकडे त्याच्या पत्नीने वैद्यनाथ बाबाकडे पती सुखरूप यावा म्हणून मानता केली की बाबांचे मंदिर उभारणार.

         जेव्हा तिचा पती परत तेथे आला त्याने पत्नीस भारतात पाहिलं पत्नी ने केलेला जप व पठाणी सेनेवर केलेले आक्रमण हे सर्व बाबा वैद्यनाथांनीच केले. त्यामुळेच आपण आपल्या पत्नीस जिवंत भेटू शकलो. तेव्हा पत्नीने मानलेली मानता म्हणून बाबा वैद्यनाथ मंदिराचे त्यावेळी त्या इंग्रज अधिकाऱ्याने ११,०००(अकरा हजार) रुपयात बांधकाम पूर्ण केले व वैद्यनाथांवरील वरील श्रद्धा कायम टिकवली.


Rate this content
Log in