STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

शिक्षणाचे महत्त्व

शिक्षणाचे महत्त्व

1 min
575

   एका गावात एक गरिब व प्रामाणिक असा रामू नावाचा मजूर राहत होता. तो प्रत्येक काम इमानेइतबारे करत होता. आपल्या कामातच देव आहे असे त्याची प्रामाणिक समज होती.. गावात त्याला चांगला मानही होता. की एक इमानदार कामगार म्हणून ओळखले जायचा. पुुढे त्याला आवळे-जावळे दोन मुले झाली. मुलाचे नामकरण झाले. एकाचे नाव सखाराम तर दुसऱ्याचे तुुकाराम ठेवले. मुुले हळूहळू मोठी होऊ लागली आणि तो आपल्या मुलांना शाळेेत प्रवेश दिला. मुले पण दररोज शाळेत जाऊ लागली. दररोज सखाराम याने चांगला अभ्यास करत होता. व सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. 

त्याच्या उलट तुकाराम हा अभ्यास नीट करत नव्हता. शाळेत खोडया करत होता. अधेमधे शाळा बुुडवायचा. सखारामला आपल्या गरिबीची जाण होती. आपले आईवडील भरपूर कष्टकरी आहेत तर आपण चांगला अभ्यास करून आईवडीलांना सुखी ठेवायचे आहे म्हणून दररोज अभ्यास करत होता.


तुकाराम मात्र सखारामच्या उलट होता. पुढे सखाराम भरपूर शिक्षण शिकून मोठा साहेब झाला होता. आणि तुकाराम मात्र दुसऱ्याचे जनावरे राखत होता. सखाराम सुट्टीला गावाकडे आला की गावातील लोक त्याला सखाराम साहेब म्हणून आदराने हाक मारीत असत. व आईवडील पण सखाराम आल्यानंतर त्याला खायला गोडधोड करित असे. सर्वत्र सखारामचा वाहवा होत होता. सखाराम सर्वांंना आदराने बोलायचा. इकडे मात्र तुकारामला 

लोक तुक्या म्हणून हाक मारीत असत. तो दररोज सकाळी शिळी भाकरी बांधून घेऊन जनावरे राखायला जात असे. त्ययाला कोणीही आवडीने बोलत नव्हते. असे शिक्षणामुुुुळे जीवनच बदलून जाते.


यावरून शिक्षण घेतल्याने सखाराम साहेबच झाला होता. व शिक्षण न घेतल्याने तुकाराम हा जनावरे राखत रहावे लागले होते. यावरून शिक्षणाचे महत्त्व कळते. 


Rate this content
Log in