शिक्षण म्हणजे काय?
शिक्षण म्हणजे काय?
माणसाला योग्य वळण लावणे, त्याच्या कलागुणांना वाव देणे, तो स्वतः सक्षम होणे, स्वत:चा निर्णय स्वत: घेणे, फसवेगिरीपासून स्वत:चा बचाव करणे, आपले व देशाचे भविष्य चांगले घडवणे, स्वत: ज्ञानी होणे. म्हणजे शिक्षण. इतरांची भावना समजून घेणे, गरजूंना मदत करणे. वृद्धांना मदतीचा
हात देणे. सरकारी सामग्रीचं तसेच सरकारी मालमत्तेची काळजी घेणे. नवीन अनेक सुविधा उपलब्ध करून देेण. . दानधर्म करणे. हे सर्व सुशिक्षित माणसांचे कर्तव्य आहे.
मुलाच्या जन्मजात शक्तींना संस्कारित करून त्यांना अनुरुप अशा सद्गुनांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय.शिक्षण म्हणजे माणसातील पुर्णणत्वावाचा अविष्कार. शिक्षण म्हणजे सर्व अवयवांंचा व शक्तीचा नैसर्गिक विकास होय. इच्छा शक्तींचा विकास करणे, तिचे नियंत्रण करून
आत्मविकासाच्या कामी तिचा विनियोग करण्याचे सामर्थ्य म्हणजे शिक्षण.
आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करुन अभिव्यक्ती मधील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे. प्रौढ माणसांनी आपल्या ज्ञानाची व अनुभवाची छाप लहान पाडणे म्हणजे शिक्षण होय. व्यवहारातील कामाचे वळण मुुुुलांना लावणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुुुुलांचे प्रत्यक्ष जीवनच होय. सत्य, शिव, सुंदर ही जीवनाची अंतिम मूल्ये आहेत ती समजण्याची व अनुभवाची पात्रता मनुष्याााला आणूून देते ते शिक्षण. जीवनाच्या सर्व व्यवहाराकरिता महत्त्वाचे असणारे ज्ञान, कौशल्य, व जाणीव संंक्रमित करणारे संघटित व सातत्याचे अध्यापन म्हणजे शिक्षण.
