Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक दान अनंत हस्ताने !!

शीर्षक दान अनंत हस्ताने !!

2 mins
206



   आज गेट परीक्षेचा निकालाचा दिवस !! जगभरातील हुषार मुले ह्या परीक्षेला बसतात. I I T मधून पदवी घेणे मानाचे लक्षण असते. 

    आज मीनलच्या मनाची धडधड वाढली. माधवने आग्रह केला म्हणून मीनल परीक्षेला बसली. दोघांनी मिळून अभ्यास केला.आता काय निकाल लागतो , उत्सुकता असणारच!!

     नेटवर माधवची पहाटेपासून गडबड चालू झाली. त्याचा व मीनलचा स्कोअर चांगला आला. त्याची रँक 145 आली आणि मीनलची 152. माधवचा आनंद गगनात मावेना!! स्कूटीवरुन तो मीनलच्या घरी आला. मीनल त्याच्या येण्यानेच जागी झाली.

  अगं कसला मस्त स्कोअर आलाय आपला आणि रँक पण पाठोपाठच!! माधवला काय अन् कसे व्यक्त व्हावे कळेना!!

   दोघेही बाबांच्या पाया पडले. आईच्या फोटोला नमस्कार करताना मीनलला हुंदका दाटून आला. तिला बाबांनी जवळ घेतले. एक वर्षापूर्वीच अपघातात आई गेल्याने मीनल सैरभैर झाली होती. तिला सावरले माधवने. बाबांनीही दुःख गिळले.

   आता पुढचे काय करायचे? मीनल वडीलांना सोडून येण्यास तयार नव्हती. माधवने तिला खूप समजावले. पण तिचे मन मानत नव्हते.

    चार दिवसांनी माधव आईवडीलांबरोबर आल्यावर दोघांनाही आश्चर्य वाटले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर थेट विषयाला हात घालत माधवचे वडील म्हणाले " आमच्या माधवला मीनल पसत आहे. मीनल तुला कसा वाटतो माधव? मीनल अनपेक्षित प्रश्नाने लाजून चूर झाली. तिने खाली मान घालूनच हो सांगितले . पुन्हा बाबांचीही पसंती विचारली. बाबा हो म्हटल्यावर आईने तिला साडी दिली पेढ्याचा पुडा दिला.हे लग्न ठरले असे म्हणून त्या मीनलला म्हणाल्या " तुझ्याजवळ इतकी आफाट बुद्धिमत्ता आहे तू शीक मोठी हो तू आणि माधव दोघेही शिकून यशस्वी व्हा. तोपर्यंत तुझ्या वडीलांची जबाददारी आम्ही घेऊ. काहीही काळजी करु नकोस

  शिक्षण पूर्ण झाल्यावर शुभमंगल!!मग मात्र तुम्ही दोघे आसाल तिथे आम्ही तिघेही येणार बरं का!!

  माधव मीनल दोघेही हसून हो म्हणाले."आता आंगठ्या घालून घ्या बरं!!अहो फोटो काढा छानपैकी" माधवच्या आई म्हणाल्या.

  बाबांनी हलकेच डोळे पुसले. मीनल माधवला जवळ घेतले आणि देवापुढे पेढे ठेवून म्हणाले " परमेश्वरा , तुझी लीला अगाध आहे. तू एका हाताने नेतोस आणि अनंत हस्ताने देतोसही!


Rate this content
Log in