शब्दांच्या गमती
शब्दांच्या गमती


*शब्दांच्या गमती*
मराठी भाषा अशी आहे की एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. फार गमतीदार आहे हे सर्व. जे लोक इंग्रजी कायम बोलतात, हिंदी कायम बोलतात त्यांच्या मुखातून मराठी शब्द बाहेर पडताना एक वेगळीच लय, ताल ऐकायला मिळते.
कोणत्याही वाक्याची पूर्तता ही क्रियापदाने होते. याच एका क्रियापदाचा अनेक ठिकाणी वापर करतो.
उदा - 'लावणे' या क्रियापदाचा वापर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कसा होतो पहा...
१) दिवा लावला.
२) देवाला अगरबत्ती लावली.
३) शेतात ऊस लाव.
४)बरणीला झाकण लाव.
५)कुंडीत रोप लाव.
६)दार लाव.
७)मी कुकर लावते.
८)कपाट लावा.
९)भिंतीवर फ्रेम लावायची.
१०)वह्या, पुस्तके नीट लावा.
अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये एका क्रियापदावर व अनेक वाक्य तयार होतात.
सारख्या उच्चारांच्या शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात.
उदा.- खून - जीवे मारणे.
खूण - चिन्ह
पाठ- पुस्तकातील धडा.
पाठ - शरीराचा अवयव.
मराठी भाषेचे साज शृंगार खूप काही वेगळा आहे. जसे शब्द आपण वापरू त्याप्रमाणे त्याचा अर्थ निघत असतो. बोलण्याची पण एक मजा आहे कला आहे. त्यातही वेगवेगळ्या भावना आपल्याला दिसून येतात.
१) राजुचा पहिला नं. आला.
हे एकच वाक्य आपण वेगवेगळ्या भावनांमध्ये बोलतो. राग, आनंद, मत्सर, दुःख या भावना एका वाक्यातून व्यक्त करू शकतो.
कोणतेही वाक्य बोलताना आपण व्याकरणाचा उपयोग करून घेतो. त्याचप्रमाणे विरामचिन्हांचाही वापर करत असतो. विरामचिन्हांचा वापर केला की आपल्याला विरामचिन्हांचा अर्थ समजावून घेऊन वाचन करता आले की आपले वाचन अस्खलित होते.
व्याकरण शुद्धता आपल्या शब्दांमध्ये आपल्या वाक्यांमध्ये आले की शब्दांचे नेमके अर्थ कळतात.
उदा.- दिन - दिवस
दीन - गरीब
अशी ही आपली माय मराठी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे.
आनंदी शिक्षणाची
घेऊया ज्योत हाती
ज्योतीने पेटवूया
साक्षरतेची पणती....
मराठी असण्याचा अभिमान आहे. स्वाभिमान आहे.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे