Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

सेल्फीचं वेड लागलंय मला

सेल्फीचं वेड लागलंय मला

2 mins
643


 सेल्फीचे वेड लागलय मला सेल्फी काढल्या शिवाय झोप लागेना मला. सेल्फी म्हणजे कलात्मक वृत्ती असते, पुढून मागून पुर्णतया वेडे वाकडे चित्र घेणे स्वत:चे तर घेतातच आणि इतर प्राणी किंवा डोंगर दऱ्यासह छायाचित्र घेणे भलतीच कसरत करण्याचे प्रकार सेल्फीने गाजवले आहेत. जितके प्राविण्य शिक्षणात किंवा इतर गोष्टीत नसतं तितकी बुद्धीमत्ता व वेळ या सेल्फी घेण्यात खर्ची घालतात. त्यात सर्वच नसतात पण काही सेल्फीबहाद्दर वेड लागल्यागत उपयोग करीत असतात.


 हा नवीन शोध आजच्या आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. इतरांना प्रभावित करण्याकरीता सेल्फीबहाद्दर छान उपयोग घेत असतात. जागचे न हालणारे सेल्फीच्या प्रेमात पडून अतिशय शिताफिने सेल्फीचा उपयोग करतात. उठापटक प्रयत्नामुळे वेगळी एक्सरसाइज करावी लागत नाही.


 तरूणाईमध्ये सेल्फी ही खूपच लोकप्रिय आहे, सेल्फी कुत्रिम आनंद देणारी जरी असली तरी आनंददायी आहे.


सेल्फीद्वारे विवाहकार्यात सेल्फीशिवाय मजाच नाही.

कोणत्याही प्रकारचे सोहळे असोत युवापिढीला भारी हौस जास्तच असते. स्वतः व मित्रासोबत सेल्फी घेउन आठवणी जपतात. ती या छंदात आनंद घेण्यासाठी देहभान विसरतात आणि एखाद दुसरा अपघात घडतोय. तसेच रिस्क घेतल्याशिवाय मनुष्याला कोणत्याही क्षेत्रात पर्याय नाही, कधी कधी काही क्षणाच्या आनंदासाठी आपण बेजार होतो तेव्हा विषन्न, उदास न राहता सेल्फी प्रयोग फ्रेश होण्याकरीता करत असेल तर तो आनंद सेल्फीमुळे मिळत असेल तर अवश्य घ्यायलाच हवा. कोणतीही चांगली गोष्ट हमखास करायलाच हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आजचे प्रगतीशील तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे याचा सन्मानच झाला पाहिजे. त्या तंत्रज्ञानाला बदनाम करू नये ही गोष्ट तेवढीच आवश्यक आहे. जसे इतर जीवनावश्यक गोष्टी

आवश्यक आहेत.


या स्पर्धात्मक युगात सेल्फीच्या माध्यमातून कलाकौशल्यातही भरपूर वाढ झालेली आहे. एकच सांगावेसे वाटते की उत्तमरित्या हाताळावी आणि सेल्फी आपल्या जीवनात व्यसन होवू नये आणि आपली विचारशक्ती हरवून सेल्फीचा विळख्यात फसू नये. पूर्ण सतर्कपणा बाळगून कार्य केल्यास धोका होत नाही.


"जान है तो जहां है!” अन्यथा सेल्फीचे वेड किती घातक आहे हे आताशी सर्वांना माहितीच आहे. या सेल्फीच्या अती वेडापायी कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी जीवघेणी पुनरावृत्ती होवू नये असे कर्तव्यविमूढ करणारे छंद जोपासण्यापेक्षा न केलेले बरे...


Rate this content
Log in