Swapnil Kamble

Others

1  

Swapnil Kamble

Others

सैनिक व धर्मप्रचारक

सैनिक व धर्मप्रचारक

2 mins
3.9K


ट्रेनमधल्या गर्दीत चेंगराचेगरीत त्यात अॉफीस सुटण्याची वेळ असेल, तर विचार करता, कल्पना करा की; त्यात अधुनमधुन सेल्समन्स तडफडतात, कधी मालिश आयटम, पेन्सिल, वह्या कधी नकाशे, माहीती वेळापत्रक रेल्वेचे पुस्तक विक्रेत, इंग्लिश शिका आेरडत असतात. असाच भर गर्दीत एक ग्रंथविक्रेता आत शिरताे. अन् तोही इतरांप्रमाणे आेरडत असतो. तो एक प्रचारक सेवक आहे ते कुठल्यातरी सदगुरुचा सेवक आहे, त्याचा तो प्रचार करतोय. तो सर्वांना सांगतोय की, जीवनात सुख हवे असेल तर, हे पुस्तक वाचा ; तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल जीवनाचा अर्थ काय आहे, हे जीवन म्हणजे काय; जीवनात खरा आनंद कोणता, तुमच्या जीवनात सदगुरू नसेल, तर तुमचं आयुष्य निरर्थक आहे. ते सांगतात की, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तूच परमात्मा शोधू शकतोस, कसा शोधायचा ते या पुस्तकात आहे, फक्त वाचा एक पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकतं 'शुध्द' या शब्दावर जोर देत होता. आयुष्य खुप मौल्यवान आहे, त्याला सदगुरूची जोड द्या व जीवन मुक्त करा. ईश्वर आहे तो आेळखण्यासाठी सदगुरूची संगत धरा, सत्संग करा तो तुम्हाला मार्ग दाखवेल, खरे सदगुरू अवतरले आहेत ते तुम्हाला या एका पुस्तकातुन समजेल. बाजुला एक फौजी उभा होता तो ते ऐकत होता. तो पण एक त्या सदगुरूचा भक्त सेवक आहे. तो त्याला आवाज देतो की मी पण ह्या परिवाराचा हिस्सा आहे. आमच्या बिल्डींगमध्ये पण सत्संग भरतो. मी उद्या परवा जाणार पण कोणाला वाचायला वेळ आहे. विक्रेता म्हणतो की, तुम्ही ट्रेनमधुन जाताना वाचा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. बघा तरी एकदा वाचून! फौजी उद्गारला की अरे..! या पुस्तकाची गरज मला नाही तर जे युध्द पुकारतात त्यांना आहे समोरील देशाने शांती ठेवली की, मग युध्द करायची गरजंच काय? अन् मी जर हे पुस्तक वाचलं तरी, मला युध्द करणं भागच आहे. माझी त्यातून सुटका नाही. यावर आजूबाजूचे लोक गंभीर होऊन ऐकत होते. सैनिक हा देश सेवेसाठी असतो. तुम्ही धर्मप्रचारक आहात. जसे तुम्ही देशात अविचाराचा नाश करता, तसे आम्ही सीमेवर घुसखोरीचा नाश करतो.


Rate this content
Log in