Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Rahul Mohite

Others


3.5  

Rahul Mohite

Others


सायकलवारी

सायकलवारी

4 mins 228 4 mins 228

आपलं ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी ऑफिसची नाइट शिफ्ट करायची आणि पुढचा दिवस मस्त सायकलवारी करायची. यावेळी घरून थोडा लवकर निघालो होतो सकाळी ६.३० वाजता दिघी सोडली आणि लोणावळा कडे हळू हळू सायकलिंग सुरू झाले. नाशिक फाट्यावरून ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागलो. डोक्यामध्ये एकच ध्येय होते लोणावळा गाठून घरी लवकर यायचे. पहिला टप्पा पार झाला आणि चहा घेण्या साठी तळेगावच्या पुढे थांबलो. टपरीवाल्या काकूंनी मस्त गरम गरम चहा बनवून दिला सोबत पार्लेजी बिस्कीट. एकदम तरतरीत फ्रेश झालो आणि सुरू झाला तो पुढचा लोणावळ्याच्या प्रवास. मनामध्ये होते की खंडाळा घाट गाठायचं थोडा वेळ तिथे बसून काही फोटो काढायचे आणि परतीचा प्रवास सुरु करायचा. जसा काही लोणावळा गाठलो माझ्या लक्षात आले को खंडाळा तर मुंबई दौरा करताना सायकलवर सर केला आहे अत्ता दुसरे काही तर सर केले पाहिजे.


थोडावेळ सायकल बाजूला घेऊन मी आपल्या गुगलची मदत घेतली तर मला समजले लोणावल्या जवळच मस्त असा टायगर पॉईंट फेमस आहे. या अधी मी हा पॉईंट कधीच पहिला न्हवता. गूगल मॅप वर पाहिले तर लोणावळा पासून २० किमी दाखवत होते. मनामध्ये आले आणि मॅपवर टाकून निघालो. गुगल मावशी प्रत्येक वळणा आधी मदत करायची टेक लेफ्ट,राइट असा करत करत लोणावल्या मधून बाहेर पडलो आणि भुशी धरण्याच्या मार्गावर पुढे चालत राहिलो. नयनरम्य डोंगर, वातावरण पाहून मन हेलाऊन गेला. खूप दिवसानंतर मोकळा स्वास आणि अशी हिरवळीचा आनंद घेता येत होता. मॅप जसे मार्ग दाखवत होता त्याचा पाठलाग करत करत डोंगराच्या पायथ्याला पोहचलो. या आधी पाहिला नसल्याने मला काहीच अंदाज न्हवता हा किती लांब आहे, किती उंच आहे माझ्या मन मध्ये फक्त एकच ध्यास तो म्हणजे टायगर पॉईंट पहायचा. हळूहळू पुढे जात होतो दोन्ही पाहुजे घनदाट जंगल आणि रोड वर मी एकटाच। वाटसरू अधून मधून केव्हा तरी एकादी कार किंवा मोटारसायकल यायची. लोणावळा म्हटलं तर शनिवार, रविवार दोन दिवस खूप गर्दी पण मी निवडलेला दिवस थोडा वेगळा त्यामुळे रस्त्यावर पर्यटक ही खूपच कमी.


मी गुगल मावशी जसे सांगेल तसे पुढे चालत राहिलो. मन मध्ये विचार यायचे बस आत्ता खूप झाले इथून परतीचा प्रवास सुरु करावा तर कधी मनामध्ये यायचे की या जंगलातून एकादा प्राणी तर येणार नाहीना. तसाच मनाला धीर देत पुढे निघालो. तस पाहिले तर घाट चढण्याचा हा माझा तिसराच अनुभव होता. पण यावेळी मी मनामध्ये ठाम केले होते की हा घाट काहिकेला तर नथांबत न सायकल वरून उतरता पूर्ण करायचा. जसा घाट चढत राहिलो तसे जंगल ही घनदाट होते मना मध्ये भीती वाटत होतीच, ती सावरण्यासाठी गुगल मॅप बघायचो किती अंतर राहिले मग थोडं बरा वाटायचे. तसाच पुढे चालत राहिलो घाट संपला आणि पुढे डाव्या बाजूला नेव्हीचे युनिट दिसले मग असे वाटले आपण आपल्या लक्ष्या जवळ आलो आहोत. तसाच विश्रांती न घेता पुढे जाऊ लागलो पाहतो तर काय उजव्या बाजूला मस्त असा टायगर पॉईंट मंजुळ अशी वाऱ्याची एक झुळूक आहाहा मस्त वाटले. नजरा पाहून मन प्रसन्न झाले. खूप सारे पर्यटक फोटो काढत निसर्गाचा आनंद घेत होते मलाही त्याचा मोह अवरला नाही. सर्वां प्रमाणे मी पहिला माझ्या सायकलचे फोटो काढले. एकाटोका पासून ते दुसऱ्या टोकापर्यंत मी पूर्ण पॉईंट पहिला मनसोक्त फोटो काढले खूप निसर्गाचा आनंद लुटला. तिथून माझ्या मित्रांना कॉल केला तर त्यांनी सांगितले तिथे खूप प्रसिद्ध अशी कांदा भजी मिळते ती खाल्याशिवाय येऊ नको. इतक्या अग्रहाने सांगितले म्हंटल्यावर मी आवर्जून कांदा भजी आणि ताकाचा अस्वाद घेतला.


टायगर पॉईंट आणि कांदा भजी खाऊन मन तृप्त झाले पण मना मध्ये एकच विचार घरी लवकर पोहचले पाहिजे आणि सुरू झाला परतीचा प्रवास. परतीच्या प्रवासा मध्ये एक छान अनुभव आला. माझ्या सारखे काही नवीन सायकलस्वार लोणावल्या वरून पुण्याच्या दिशेने येत होते. एका ठिकाणी उभे राहून ते दोघे सायकल स्वार मालवाहतूक वाहनं कडून मदत मागत होते. तेवढ्यात मी त्यांना मदतीचा हात पुढेकेला आणि विचारले काही प्रॉब्लेम झाला का मी काही मदत करू शकतो का? तेवढ्या त्यातील एकाने दबक्या आवाजात उत्तर दिले, सर हा आमचा पहिला प्रवास आहे आणि आत्ता आम्ही खूप थकलो आहोत पुढचा प्रवास करणे आम्हला शक्य नाही. हे ऐकताच माज्या मनामध्ये एकच विचार आला की आत्ता यांना आपल्या पद्धतीने पुढची वाट सोबत घेऊन गेले पाहिजे. तास मी त्यांच्या सोबात ५-१०मी गप्पा मारून त्यांची थोडीफार माहिती काढली आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी प्रोत्साहन दिले. तिथून पुढे मी त्यांच्या सोबत गप्पा मारत मारत ३०-३५किमी कधी गाठली त्यांना समजलेच नाही. तेही जोमाने गप्पा ऐकत त्यांचे अनुभव सांगत आम्ही निगडी च्या भक्ती शक्ती चौकात पोहचलो. तिथून मी माझा मार्ग निवडला आणि संध्याकाळ होण्या आधीच घरी फोहचलो. साधारण १४५किमी ची ही नवीन अनुभव देणारी सायकलवरी.

(हा प्रवास जानेवारी महिन्यात झाला आहे)


Rate this content
Log in