सावित्रीबाईचे प्रयत्न साकार होऊ द्या
सावित्रीबाईचे प्रयत्न साकार होऊ द्या


सावित्रीबाईच्या अथक प्रयासाने आजच्या युगात स्त्रिया शिक्षित व स्वतंत्र झालेल्या आहेत.
सावित्रीबाईच्या परोपकारी भावना,स्त्रीजातीला घडविण्यासाठी आणि कर्तव्य समजून अथक प्रवास करून स्त्रियांचे भविष्य घडविण्याचा जो उंच्चाक गाठला आहे तो वाखानन्यासारखा आहे.शेवटच्या क्षणापर्यंत वात्सल्यमुर्ती सावित्रीबाईनी लढा दिला, व नवी शैक्षणीक दिशा देवुन आजच्या सावित्रीला दृढ केले. त्यांचीच प्रेरणा प्रत्येक स्त्रीमध्ये आरूढ आहे. अशी एकमेव कुशल नेतृत्वाची धनी महिलेने आपल्या भारत देशात जन्म घेतला नावलौकीक मिळवून अजरामर होवून गेल्या.तिच्या पुण्याईने आजची स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही.
सावित्रीबाई पहिली भारतीय शिक्षिका झाल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिकवण्याचे काम ज्योतीरावांनी केले. सुरूवातीला ज्योतीरावांची विद्यार्थिनी असणारी सावित्रीबाई विचारवंत आणि उत्तम संघटक होती. त्यापुढची वाटचाल ही कवयित्री,शिक्षिका,मुख्याध्यापिका व समाजकार्यकर्ती ही होती.त्यांनी अनेक भूमिका वटविल्या,त्या आपण सर्वांना ठाऊक आहेत. तिती कठोर परिश्रमातून त्यांनी प्रवास केलेला होता.शाळेतील सर्व मुलामुलींना जीवनात पुढे स्वतंत्र आणि स्वावलंबी होता यावे, सभ्यपणाने जगता यावे यासाठी सतत प्रयत्न केला. उद्योगजगाचे ही शिक्षण देण्याची व्यवस्था करण्याची दुरदृष्टी त्यांच्याकडे होती."
आपल्या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे, रोग आहेत.जातीभेदामुळे ज्यांना अनिवार्य दु:खे भोगावी लागतात त्यांच्यासाठी शिक्षण सुरू करणे हे खरे देशकार्य असल्याने आपण ते सुरू केले." "जे लोक या देशाच्या सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी महिलांना विद्या शिकवली पाहिजे." या हेतूने ह्या दोन्ही संस्था संचालकांनी सुरू केल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे. या शाळांमध्ये विनावेतन काम करताना "या पतीपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसद मिळत नसे" असे निरिक्षण वर्तमानपत्रांनी नोंदवले होते.
भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा,दलित मुलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि पहिले वाचनालय यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे या सरकारी अहवालात म्हटलेले आहे. अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीबाईंनी शिक्षकेचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिलेली आहे.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी देशातील आणि आशिया खंडातील पहिली मागणी 19 ओक्टोबर 1882 रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी केली होती. त्या मागणीपत्रात ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे.
सावित्रीबाईंनी ओतुर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भुषवले. 6 पुस्तके लिहिली. त्या कित्येक ज्ञानामृताने भरलेले अध्ययन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या. सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी "बालहत्या प्रतिबंधक गृह", सुरु करून त्यात 35 स्त्रियांची बाळतपणे पोटच्या मुलीच्या मायेने त्यांनी केली. दुष्काळात सुमारे एक हजार मुलांमुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू करून,
बालवयात विवाह झाल्यावर पतीचा एकाएकी मृत्यु झाल्यास, अशा विधवा मुलींचे त्याकाळी केशवपन करण्यात येत असे. या अघोरी प्रथेचा तीव्र निषेध करुन त्याच्या विरोधात प्रखर लढा दिला
हुंड्याशिवाय कमी खर्चात गोरगरीब दुर्बल घटकांच्या मुलींचा विवाह व्हावा यासाठी फुले दांम्पत्यांनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरु केली. त्यामुळे असंख्य दलितांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न सहजपणे सुटला. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला करुन दिला.नाभिकांचा संप घडवला. या कामांच्या वेळी ज्योतीराव फुले हयात होते. सावित्रीबाई त्यांच्या नेत्या होत्या. ज्योतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व करून सावित्रीबाईंनी केले. स्वत:अग्नी दिला.
डॉ. रामचंद्र गुहा यांनी सावित्रीबाईंचा उल्लेख आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारात केला. पहिल्या भारतीय महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक आणि नेत्या सावित्रीबाई रोडे या सगळया सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी होत्या.
शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशविदेशात गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून ओक्सफर्ड पुणे विद्यापीठाचे नामकरण "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "असे करण्यात येत आहे. हा या शहराच्या दृष्टीने हा ऎतिहासिक क्षण आहे.
एकोणीसाव्या शतकातील प्रमुख शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे नाव या विद्यापिठाला देऊन विद्यापिठाचे अधिकारमंडळ आणि राज्य शासन यांनी स्त्रीशिक्षण, ज्ञाननिर्मिती आणि दलित-बहुजन वर्गाच्या मानवी हक्कांचा सन्मान केलेला आहे. आजवर त्यांची ओळख प्रामुख्याने महात्मा फुलेंची पत्नी आणि सहकारी अशी झालेली आहे. ती अपुरी आहे. मुळात त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व आणि शैक्षणिक योगदान व्यवस्थित रित्या मांडलेले नाही.सावित्रीबाईचा पुर्ण परिचय करण्यात आलेला नसावा.त्या एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ आणि नामवंत कवयित्री होत्या. त्यांच्याठायी कुशल नेतृत्वाचे अनेक गुण होते. त्या उत्तम संघटक होत्या. प्रभावी वक्त्या होत्या. खुद्द ज्योतीरांवानी केलेल्या नोंदी आणि इतर बारिकसारिक महत्वपुर्ण कार्याचे दस्तावेज सांभाळले होते. यांमधून हे सगळे संदर्भ आता उपलब्ध झालेले आहेत.त्यावरून सावित्रीबाईचे कार्य किती महान होते.त्यांची विचारधारा किती प्रगाढ अकल्पनिय, आत्मविश्वात्मक होती याची प्रचिती येते.
यानिमित्ताने प्रा. हरी नरके यांनी शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे
जर स्त्रियांनी आपला विचार नाही केला तर सावित्रीबाईचे कष्ट व्यर्थ जाणार कां, त्या काळात सावित्रीबाईंनाही हाल-अपेष्टा भोगल्या नसत्या तर आपल्याला आज इथे खितपत पडावं लागलं असतं सावित्रीबाई ने समाजात कष्ट भोगले पण माघार घेतलेली नाही.आजच्या"स्त्रीमध्ये जागृती व्हायलाच पाहिजे"
शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा" असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांचा "काव्यफुले" हा 1854 साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे.
अद्यापही सावित्रीबाई फुले यांचे कार्य पूर्ण झालं नसल तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. मुलींनी शिक्षण घेऊन स्व:तचे कुटुंबाचा व समाजाचा विकास साधावयास तयार असायला पाहिजे.
सावित्रीबाईच्या कृपेने आज आपण इथपर्यंत पेहोचलो आहे.मग आजच्या सावित्रीने ही स्वतःला दोष देणे बंद केले पाहिजे मी एक अबला आहे आणि कमजोर आहे हे मनातही आनु नये.आपल्या रक्षणासाठी आपला अधिकार मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे.आपल्या क्षमतेला ओळखले पाहिजे.आंतरिक आत्महिनता स्त्रीयांसाठी नुकसान देह आहे.
कोणीही यावं आणि स्त्रियांवर अत्याचार करावा तिला मनात येईल तसे वागवावे. अशा घटना समाजात घडायलाच नको आहेत मुकाबला करायला सदैव सज्ज राहायला पाहिजे.सतत सावित्रीबाईचा आदर्श नजरेसमोर ठेवला पाहिजे.जरी समाजात आपल्या स्थानासाठी झटतांना कित्येक अडचनी आल्या असेल तरी हसत सामना केला पाहिजे.तेव्हाच आजची स्त्री ही नक्कीच सावरेल .
प्रगत विचारच देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी हातभार लावू शकतात.
सावित्रीबाईच्या पुढाकाराने आजची स्त्री काही प्रमाणात जरी सक्षम झाल्या असेल तरी खुप माता भगिनी आजही आपल्या अधिकाराबद्दल अज्ञानात आहेत.आणि
परस्वाधीन जीवन जगत आहेत. आणि मनातल्या मनात तडफडत असते. आणि आपल्यासारखीच लेकींना ही रहाण्यास भाग पाडते. हिच परंपरा सुरू ठेवायची गरज नाही ही गोष्ट कशी समजवायची ?इतक्या कालावधीनंतर ही परिस्थिति बघायला मिळते. त्यावेळच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच धाडस आजच्या सावित्रीत दिसत नाही. स्वता:ला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू नये दिलेरीने वागून आपले जीवन व्यवस्थित करायला सावित्रीबाईचे चरित्र वाचायला पाहिजे.
आपण आता प्रगत देशातील सुशिक्षीत समृद्ध महिला आहोत.याची जाणिव प्रत्येक स्त्रीला व मुलींना असायला पाहिजे.निडरपणे सामना करून समान हक्कासाठी आवाज ऊठविला पाहिजे.आपण काही वस्तू किंवा जनावर नाहीत. आपण कोणतेच असे पाप केलेले नाही. मग समर्थपणे स्वाभिमानाने का नाही जगायचे?
आपला हक्क कां सोडायचा!आतापर्यंत माताबहिनीला खुप सोसाव लागले. खुप सहनशिलता बाळगली.
परंतू काळ बदललेला आहे. विचार करा आज प्रगत देशात अन्याय सहन करने यौग्य आहे का व तो कां करावा ? आजच्या कित्येक स्त्रीया व मुलीं पुरूषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. आणि केलच पाहिजे.
स्त्रीयांना वेळोवेळी मिळालेले शासकिय प्रोत्साहन, लघुउद्योगाकरिता मानधण महिला सशक्तीकरण,अश्या स्त्रीमध्ये जागृती आली पाहिजे. आत्मविश्वास वाढला पाहिजे.या सर्व योजनांमधून लाभ घेवून सक्षम व्हावे. आपले स्थान उंच करण्यासाठी तत्पर होऊन स्वयंप्रकाशित नवनिर्मात्री झाल्यास सावित्रीबाईलाही आपल्या स्त्रीयांचा अभिमान होईल.
स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे चार आधारस्तंभ समाजात भक्कम केले तर समाजात सुराज्य दिसेल.आणि वास्तवात महिला सबलीकरण होवूनी आपल्या भारत देशाला पूर्ण विकसित बनवण्यासाठी व परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महिला सबलीकरण महत्त्वाचे ठरेल आहे
सावित्रीबाईंजवळ महत्वाकांक्षा भरपूर होती. त्यांची यशस्वी वाटचाल विस्तारीत व्हावी. त्यासाठी स्त्रीयांचा आत्मविश्वास समाजात जागृत झाला पाहिजे व तिला स्वबळावर आपली एक छबी निर्माण केली पाहिजे ही सावित्रीबाईंनी शिकविले.त्यांची तळमळ पुर्णत्व प्राप्त होण्याआधीच सावित्रीबाईंनी निरोप घेतला.
तेंव्हा आजच्या सावित्रीने तो भार थोड्यातरी प्रमाणात आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे.भविष्यात निश्चीतच बदल होवून आजची प्रत्येक स्त्री आत्मसन्मानाने आपले जीवन फुलवावे आणि सावित्रीबाईंचे अधुरे स्वप्न बाळगून कृती करण्याचा प्रयत्न करावा,आत्मविश्वास ठेवल्यास कोणतेही कार्य सक्षम होवू शकतात.सावित्रीबाईंच्या कृपेने आपले स्थान उंच करून नवनिर्मात्री होण्यासाठी तत्पर होवून स्वयंप्रकाशित होऊन समाजकल्यान स्वकल्यान करू शकते. हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल.