सावधान राहा सतर्क राहा
सावधान राहा सतर्क राहा
२ जून २०२१
वेळ :- सायंकाळचे ५
माझी प्रिय डायरी,
आज मी तुम्हाला आताच घडलेला किस्सा सांगणार आहे. लॉकडाउन मुळे भरपूर लोक आज ऑनलाईन खरेदी विक्री करतात. लोक ऑनलाईन खरेदी विक्री मध्ये खूप हुशार झाले आहेत.पण म्हणतात ना, कधी कधी हुशारीपेक्षा जास्त समजूतदारपणा कामी येतो. जर हुशारी देखील जास्त दाखवली, तरी नुकसान आपलंच होणार आहे.
असंच काहीस दृश्य मी शॉपिंग मॉलमध्ये गेलो असताना दिसले. एक व्यक्ती शॉपिंग मॉलमध्ये घाईघाईने आला. आणि तो जोरजोराने ओरडू लागला, तेथील सर्व लोक त्यांच्या अवतीभवती जमा झाले. तेव्हा हे सर्व घडत असताना. तिथे मॉलचे मॅनेजर आले. त्यांनी त्या माणसाला आपल्या केबिनमध्ये बसवले, त्याला पाणी पिण्यास थंड पाणी दिले. थोड्यावेळाने मॅनेजरने त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले. "एवढं भडकायला काय झाले तुम्हाला". तेव्हा तो माणूस म्हणाला, मी माझ्या सामानाची खरेदी ऑनलाईन केली. पण काही वस्तूची एक्सपायरी दिनांक निघून गेली होती. मी पैसे तर पूर्ण दिले होते. हे सर्व ऐकल्यानंतर मॅनेजर ने सर्व लोकांना बोलवले, आणि परत अशी चूक होता कामा नये अशी सक्त ताकीद दिली.
मी समजू शकतो, हे जग ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी पागल आहे. पण हे ही विसरून चालणार नाही, की कोणतेही सामानांची डिलिव्हरी झाली की पहिले त्या सामानाची एक्सपायरी दिनांक नीट तपासून घ्यावी. जर एक्सपायरी दिनांक निघून गेली असेल तर जिथून तुम्ही सामान घेतलं त्यांच्याशी संपर्क साधावा.
लक्षात ठेवा, सावधान राहा, सतर्क राहावा.
