साथीच्या रोगात अफवांचे व्हायरस
साथीच्या रोगात अफवांचे व्हायरस


कोरोना जागतिक साथीचा रोग म्हणून प्रसिध्दीस आला आहे .त्यामुळे प्रत्येकजन धास्तावलेल्या स्थितीत आहे. भिती निर्माण होण्याचे हे ही एक मोठे कारण आहे . आजच्या वर्तमान परिस्थितीनुसार ३९ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळलेले आहे बाकी राज्यभरात १,२,३,४ रुग्ण आढळलेले आहे.महाराष्ट्रात पुर्णतया दहशत पसरली आहे. अंधश्रध्देला खतपाणी घालणारे अनेक आहेत शहानिशा न करता अफवा व्हायरल करतात त्यामुळे समाजाने धास्ती घेतली आहे.बऱ्याच ग्रामीण भागात तर अपुरी व चुकीची माहिती पोहचली आहे त्यात सोशल मीडिया द्वारे दिली जाणारी माहिती यावर विश्वास ठेऊन नागरिक अजूनच घाबरलेले आहेत.
बहूतेक रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तरीपण सारे वातावरण विस्कळित झालेले आहे.याला जवाबदार कोण आहे. जरी अजून लस उपलब्ध नाही पण लक्षणांवर उपचार करून नियंत्रण मिळवणे जास्त अवघड नाही.
कोणत्याही अफवात्मक व्हिडिओ पोस्ट अथवा मेसेजेसला बळी पडणार नाही यासाठी एक नागरिक म्हणून दक्षता घ्यावी असले फालतू अफवा पसरवून काय आपला इलाज होणार आहे .
खरंतर हा जगासाठीच एक ब्रेक गरजेचा होता.आधूनिक जग न थांबता यंत्रासारखं सारख धावत आहे , आपल्या जीवाभावाच्याही लोकांना किंवा आप्तेष्ट नातेवाईकांनाही भेटायला बोलायला वेळ नव्हता आता काही दिवस घरी शांत बसून विश्रांती घ्या .एकामेकाची विचारपूस करा.
कोरोनाला न घाबरता आपली प्रतीकार शक्ती वाढवा, आणि स्वतःला,छंदाला,निसर्गाला,आरोग्याला आपला वेळ द्या.हा निसर्गचक्र सतत फिरत असतोय ,कित्येक कोरोनासारख्या माहामारी इथे येवून गेल्यात त्यातुन आपण बाहेर आलोत तसेच आताही धीर ठेवून याचा सामना करावा अस मला वाटतय.उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे ,यातही मार्ग सापडतात ती शोधावी लागतात.
कोरोनाचा विषाणू हा आकाराने मोठा आहे .तो हवेत नसून जमिनीवर असतो तो हवेत राहात नाही पर्याय म्हणुन गर्दीच्या ठिकानी मास्क लावायचे किंवा आपला रूमालही चालतोय. कोरोना 28 डिग्री तापमानाच्या वर जगत नाही . कोणत्याही आजाराला जायला वेळ लागतो त्याची वेळ झाली की तो निघूनच जाणार आहे.कारण आज कोणालाही वेळ नाही थांबायला, मग कोरोनाला कसा राहिल वेळ ,काही वेळ स्वत:ला देणे गरजेचे आहे.व्यक्ति शोधाचा पुतळा आहे नवनविन प्रयोग करून आरोग्याला पुरक घरच्या घरी आवश्यक अश्या औषधीचा शोध घेतला पाहिजे ,जेंव्हा प्लेग सारख्या साथीच्या रोगाला किती जाणकार लोकांनी आपल्या गावाची सुरक्षीत बचाव करून गाव वाचविले होते ,त्यात साईबाबाचाही उल्लेख पुरानात आहे.त्यांनी गावाच्या शिवेवरून पुर्ण गावाला वेढा मारून काहीतरी पिठासारखा पदार्थ टाकला होता ,ती भूकटी कश्याची होती त्याचा अजून शोध लागलेला नाही,त्या गोष्टीला दैवी शक्तीचा दर्जा मिळाला.त्याच्यासारखाच प्रयोग अजून महाराष्ट्रात वर्धा जिल्हा ,सेलू घोराडला तुलसीदास वैष्णव यांनी केला होता.त्या प्रयोगाने दुसऱ्या दिवशी म्हणे पाखरू ही दगावले नाही.असले अफलातून प्रयोग करून कित्येक लोकांना मृत्युच्या दाढेतून काढले होते. निव्वळ लस किवा औषधीची वाट बघत बसणे आणि फक्त विज्ञान यंत्रणेवरच अवंलंबून बसणे किती यौग्य आहे. तसेही कोणत्याही क्षेत्रात बघा सर्व व्यापारात गुंतलेले आहेत. समाजाला दिलासा म्हणुन अापल्या घरगूती वस्तूचा बटवा उघडल्यास आपण आपले आयुष्य सुखद व सुंदर करू शकतोय.
तसेच आपली भारतीय संस्कृती फार चांगली आहे.इथे गळाभेटी सणावारा व्यतिरीक्तहोत नाहीत. दूरूनच
नमस्कार करण्याची पद्धत आहे.विदेशी लोकही आपली ही नमस्कारची पद्धत अवंलब करतांना दिसत आहेत.
आपणही त्यांच्याकडून स्वच्छतेसारखा चांगला गुण घेवू शकतोय.ज्या पैशाने देशाची सुधारणा करणार होते तोच पैसा आता स्वच्छतेवर किंवा रूग्णावर खर्च करण्यात येईल म्हणजेच भारत गरीबदेशातच गणल्या जाणार आहे.सततच्या आपत्तींना तोंड देता देता मात्र भारताला मोठा फटका बसला आहे.
तसेच या रोगाचा बुजगावण करून आपण संकट ओढविल्याच चित्र दिसतं आहे.कित्येक कोटींचे नुकसान झाले आहे. आपले सरकार या बद्दल गांभीर्य ठेवत आहे ही कौतूकास्पद बात आहे.परंतू ही उडालेली धांदल कश्याला या साथीचे रोग आधीही आलेले आहेत.या निव्वळ प्रचार माध्यमाने मानसिकतेचा छळ मांडून कळस गाठला आहे. अश्या अफवांना रोखण्यासाठी पाउल उचलायला हवे. आणि स्वत: खंबिर राहून इतरानांही दिलासा द्यायला हवा आहे.
जगभरात या आजाराने झालेल्या मृत्युमध्ये एकाही दहा वर्षांच्या खालील मुलाचा समावेश नाही. एवढंच नाही तर मृत पावलेल्या लोकांपैकी जवळपास लोक हे साधारणपणे पन्नाशी, साठी ओलांडलेले किंवा आधीच श्वसनाचे आजारी आहेत ज्यांना लागन झालेली आहे, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्याला साधारण लागन होत नाही आणि जरी झाले तरी योग्य उपचार घेऊन ठणठणीत बरे होता येते.
ज्या वुहानमध्ये दीड महिन्यापूर्वी मृत्युदर १७% होता तिथे तो आज ४% आहे. म्हणजे याच्यावर नियंत्रण मिळवणे तेवढे कठीण नाही.
अफवा व्हायरसनेच जास्त नुकसान होते आहे आणि आपण या टिव्हीसमोर बसून आपली चिंता करून स्वास्थ्य घालवत आहोत .आपले मन कमजोर होते आहे. वरून कल्पित घटना ऐकून आपला विश्वास डळमळतोय आहे म्हणुन टिव्हीच्या जास्त आहारी जावू नये. फक्त आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवायची यासाठी घरेलू इलाज कोणते करायचे यावर लक्ष केंद्रित करायला हवे .
जर कोरोनाचे काही लक्षने दिसले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा .प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवून घ्या.स्वत:कडे चांगला कॉटन चा रुमाल बाळगा.प्रत्येकाने स्वत:कडे कापराच्या काही वड्या आणि लसनाच्या काही पाकळ्या ठेवा.आणि लसुन व अदरक चटणी,हिंग जेवणात असू द्या.या शास्त्रीय दृष्ट्या हे दोन पदार्थ असे आहेत की कोणतेही व्हायरल इन्फेक्शन परतवून लावण्याची त्यात शक्ती आहे.याच्याबरोबर कडूनिंबाची पाने, राळ गुगल, अगरबत्ती,धूप याही पदार्थाचे ज्वलन करण्यास हरकत नाही.आपण इतके तर करूच शकतोय.