सासुरवाशीण
सासुरवाशीण
लग्नापूर्वी बोलत असताना कितीतरी वेळा तिच्या तोंडून ऐकायला मिळाली माझ्या बाबाच्या घरी असं आहे, तसं आहे. अगदी तिच्या सगळ्या नातेवाईकांविषयी देखील ती भरभरून बोलायची. तिच्या माहेरच्या गोष्टी विषयी माझं, या शब्दाचा उल्लेख मी कितीतरी वेळा ऐकला.
आणि विशेष करून माझे बाबा तिच्या रोजच्या बोलण्यात अनिवार्य भाग. त्याच मुलीच्या लग्नानंतर काही दिवसातच तिच्या माहेरी पहिल्यांदा तिच्या सोबत गेल्यावर तिच्या बोलण्यात एक वाक्य आलं ते ऐकून मला आश्चर्य कमी पण धक्का अधिक बसला.बोलता-बोलता तिच्या बाबांना ती म्हणाली, 'तुमच्या घरी असं आहे.
मी केवळ तिच्या कडे पाहतच राहीलो. माझे बाबा, माझे घर असे म्हणणाऱ्या मुलीने लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी सहजपणे स्वीकारली आणि त्यानुसार ती जगायलाही लागली.किती सहजपणे ती सरासरी समरस झाली. जिथे जीवनातील वीस-पंचवीस वर्ष घातली त्यांना क्षणार्धात "तुमचं घर" असं संबोधली आणि सासुरवाशीण झाली.या सासुरवासीणीचा अभिमान वाटला.पण नंतर तिने माझ्या घरचा ताबा मिळवला.
आता माझे घर केवळ नावापुरतेच राहीले.माझे आई-बाबा आता तिचे आई-बाबा झालेत.माझे नातेवाईक आता तिचे नातेवाईक झालेत.माझी प्रत्येक गोष्ट तिची झाली आहे.ती सहजपणे म्हणायला लागली तिच्या आई-बाबा चा उल्लेख. आपले आई-बाबा.पण मी प्रयत्न करुनही कायमच तुझे आई, तुझे बाबा असाच केला. तिच्या इतके सहजपणे स्वीकारायला मला जमले नाही.
जसाजसा अनुभव येत होता, तसा तसा तिचे महत्त्व वाढतच होते. अशी ही सासुरवाशीण होती............
