Sangieta Devkar

Others

2  

Sangieta Devkar

Others

सांगा कस जगायच ?

सांगा कस जगायच ?

3 mins
134


आजचे आपले जीवनमान पहाता ते खूप गुंतागुंतीचे,धावपळी चे तणावाचे बनले आहे. कामाचा ताण, वाढते प्रदूषण आणि इतर अनेक समस्यांना आपल्या रोजच सामोरे जावे लागते. म्हणूनच स्व: ताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही हेच कारण आपण प्रत्येकाच्या तोंडी ऐकत असतो,पण असे वेळे चे कारण देऊन आपणच आपली फसगत करत आहोत हे किती जणांच्या लक्षात येते? आरोग्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणणे म्हणजे हा आपला आळसच म्हणावा लागेल,मग एकदम गळ्याशी आल्यावर,शरीराने धोक्याची घंटा दिल्यावर आपण खडबडून जागे होतो,मग डॉक्टरां कडे जाणे,व्यायाम सुरु करणे ,थोडे फार खाण्यावर नियंत्रण ठेवणे सुरु होते,पण हे थोडेच दिवस,परत पुन्हा ये रे माझ्या मागल्या,,सुरु होते. या मध्ये जाणीवपूर्वक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते ती व्यक्ती म्हणजे प्रत्येक घरातील स्त्री होय,मला काय होते मी धडधाकट आहे बघू जेव्हा काही त्रास होईल तेव्हा असे म्हणत ,तो पर्यंत हिमोग्लोबिन ची कमतरता,कॅल्शियम ची कमतरता,डायबेटिक्स,थॉयराईड यांनी आपले रंग दाखवायला सुरवात केलेली असते. आपले जीवन आनंदी हसतमुख व्यतित करावयाचे असेल तर त्यासाठी उत्तम आरोग्य असणे गरजेचे नाही का? ज्या प्रमाणे एखादे मशीन सुरळीत चालू रहावे यासाठी आपण वरचेवर त्याला ऑईलींग करतो तसेच शरीर देखील उत्तम आणि निरोगी रहावे यासाठी व्यायाम हि तितकाच गरजेचा आहे. आज आपण आलिशान एसी ऑफिस मध्ये बसून काम करतो,शरीराला कमीत कमी त्रास होईल असे बघतो,शरीराला फार कष्ट पडणार नाहीत याची काळजी घेतो,आणि अनावश्यक वेळी जिभेला जे आवडत ते खातो. एका शास्त्रज्ञाने म्हणटले आहे"इटिंग ईज मेकिंग ब्लड,एक्सरसाईज इज डिस्ट्रीब्युटिंग ब्लड ,अँड ब्रिदिंग इज प्युरिफाइंग ब्लड,"म्हणजेच आहार मुळे रक्त निर्माण होत,निर्माण झालेलं रक्त व्यायामा मूळे शरीरभर पसरते आणि श्वासोश्वासा द्वारे ते शुद्ध बनते. याचाच अर्थ आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते.


 गेल्या पन्नास वर्षात भारतात उच्च रक्तदाब,मधुमेह,आणि हृदयविकार असणाऱ्या पेशन्ट ची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे,ही स्तिथी फारच भयानक आहे. शाळेत जाणारी लहान मुले ही लठठ पणाला बळी पडत आहेत कारण आजची आपली बदललेली जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती,,! आणि याला जोड आहे ती व्यायामाच्या अभावाची !


वाढत्या आजाराचं अजून एक कारण म्हणजे आपल्या जीवनातील हरवलेली "हार्मनी" होय. मोठ्या कार्यालयात मुख्य अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या जीवनाच्या अकाउंट ची पर्वा नाही,उत्तमोत्तम शिल्प बनवणाऱ्या शिल्पकाराच जीवनशिल्पच बेढब आहे ,मैंफिली वर मैफील गाजवणाऱ्या गायकाच्या जीवनातील संगीत मात्र कुठेतरी हरवलेले आहे,समाजातलं वाढलेले तुटकेपण,बिघडलेले नातेसबंध याला कारणीभूत आहेत. आज प्रत्येक गोष्टीत आपल्या शॉर्टकट हवा असतो,आहारा पासून ते अभ्यासा पर्यंत सर्वत्र शॉर्टकट चाच विचार होतो. वेळ वाचवायचा म्हणून आपण फास्ट फूड खातो,मात्र त्यामुळे शरीराची हानी होते याचा विचार केला जात नाही. आणि व्यायामाला वेळ नाही ही सबब पुढे करत राहतो. या मुळे आरोग्याच्या मूळ पायाकडेच आपण दुर्लक्ष करतो. शारीरिक व्याधी आणि आजचा प्रचंड ताण दूर करायला व्यायामा शिवाय पर्याय नाही. नियमित व्यायाम,योग्य आहार,योग्य विश्रांती आणि निसर्ग नियमांचे पालन करणे ही खरी आजची गरज आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्या साठी निसर्गा कडे बघा,चाहुबाजूला अनोखे सौन्दर्य आणि चांगल्या गोष्टीच तुम्हाला दिसतील,त्यासाठी शरीर निरोगी ठेवा, पाडगावकरांनी म्हणटले आहेच,," पेला अर्धा भरला आहे असे ही म्हणता येईल पेला अर्धा सरला आहे असे ही म्हणता येईल, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा'", सांगा कस जगायचं ,कण्हत कन्हत की गाणं म्हणत,,तुम्हीच ठरवा." आणि गाणं म्हणत जगायचं असेल तर मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ असायलाच हवे ना ? तर मग घेणार ना स्वतःची काळजी,,नक्की घ्या,कारण आयुष्य खरच सुंदर आहे..


Rate this content
Log in