Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

सामर्थ्यशाली छत्रपती शिवाजी मह

सामर्थ्यशाली छत्रपती शिवाजी मह

3 mins
486


  प्रजेचे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज अद्भूत सामर्थ्यशाली युगपुरुष होते.पुन्हच्छ शिवाजीसारखे महापुरुष होणे नाही.त्यांची कार्यपद्धती अतिशय उत्कृष्ट दर्ज्याची होती. आजही त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा स्फुर्ती देणारी आणि प्रेरणात्मक असून जनामनात रूजलेली आहे.शिवाजी राजे ध्येय,निश्चयापासून ढळले नाही. आपण त्यांच्या प्रत्येक खंबिरमताचा विचारक व अभ्यासक व्हायला पाहिजे. कारण त्यांच्या कृतीतून राष्ट्रप्रेम कस असायला पाहिजे याची कल्पना येते. 

शिवाजी महाराजांचे संस्कार श्रेष्ठ होते म्हणूनच अवघ्या

सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे धाडस करणे साधारण कार्य नव्हते,तसेच खचलेल्या जनतेच्या मनामध्ये स्वाभिमान पेरून पराक्रमाचा हुंकार जागृत केला होता.माता जीजाईच्या स्वप्नांना साकार केले. 


"शिवाजी महाराजांनी कधीही आईचा अवमान केलेला नाही,आई जिजाईने योग्य संस्कार दिले ही शिदोरी जन्मभर काळजात ठेवली,आईचा मान राखून शिवाजींनी कमी वयात अफाट महत्ता गाजविली.हसत-हसत येणाऱ्या संकटांना सामोरे गेले. प्रबळ इच्छाशक्ती आणि बुद्धीचातुर्याच्या जोरावर मोठमोठ्या आदिलशाही सत्तांना हादरवून सोडले व आपले वर्चस्व स्थापन केले आणि सिद्धही केलं.त्यांचे सवंगडीही त्यांच्या जीवास जीव देणारे ठरले.त्या-व्यतीरीक्त मनामनातला राजा महाराष्ट्राला मिळाला ,धन्य ती भूमी,धन्य ते मावळे,ज्यांनी आपल्या राजेचा साथ न सोडता लढूनी प्राण त्यागले."


छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटक, नियोजनबद्ध, अनुशासन, कर्मठपणा, धाडसीवृत्ती असे कित्येक उच्च कोटीचे गुण शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात .

शिवाजी महाराजांची राजवट निष्ठूर आदिलशहाच्या अधिपत्याखाली होती. त्या राजवटींमध्ये सुलतान आदिलशहाच्या विरोध करणे म्हणजे मृत्युशी झुंज देणे होते.समाज असल्या अन्यायी व अत्याचारी राजवटींतून निघणे अश्या असामान्य कृतीतून शिवाजी महाराजांनी आपले अढळ स्थान तयार केले.आणि असंख्य अन्याय-अत्याचारातून जनतेला रयतेचा राजा मिळाला. आणि हा उत्तम राजा ईश्वरा पेक्षाही जास्त प्रिय झाला.आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असाधारण ,अद्वितीय होता ,श्रेष्ठता कार्यप्रणाली थेट काळजापर्यंत पोहोचणारी होती.


आपल्या अपत्यापेक्षा जास्त जनतेचा हितचिंतक होता.या सर्व गोष्टी लक्षात ठेवून जनतेसाठी अनेक व्यवस्था राबविल्या, शेतकर्‍यांपासून लढाकू शूर सरदारांची विचार केला होता.धार्मिक स्थळांची व्यवस्था देखिल चोखपणे लावून दिल्या.


शिवाजी महाराजांनी अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाहीशी प्राणांतीक लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.

 हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासणकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली.असा राजा ज्याच्या स्वप्नी मनी सहिष्णूता, सक्षमता आणिली होती. आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे सतर्क होते. त्यामुळे प्रजेला राज्य आपले आहे असे वाटत असे.


त्यावेळी शत्रूविरुद्ध लढ्याण्याकरीता महाराष्ट्रातल्या दर्‍यां-डोंगर पालथे घातले गनिमी काव्याची रूपरेखा अमलात आणिली.तेंव्हा बलाढ्य छावा आदिलशाही,

 निजामशाही आणि मुघलसाम्राज्य अत्याचारी व होते. सरदारांवर आणि किल्लेदारांवर त्यांची भिस्त होती.त्याविरूद्ध शिवाजी महाराजांची दृष्टी अजात पक्ष्याप्रमाणे तिक्ष्न आणि चौफेर होती.स्वहस्ते लढा देण्यास त्यांची तलवार सदैव तयार असायची. महाराजांच्या भेदक नजरेतून कोणत्याही स्थितीत शत्रृ सुटायचा नाही. त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी अनेक सूत्र हुशारीने वापरून अनेक शत्रूंना आपल्या युक्तीने नामोहरन केले. तसेच स्वराज्यांतर्गत दगाबाजी लोकांचाही सामना केला,अनेक अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्ग काढून शत्रृराजवट उलथून टाकण्यात आली. यशस्वीरित्या स्वतंत्र राज्य निर्माण केले. हे साहसिक अतुलनिय कार्य आजही समाजाला प्रेरणाश्रोत आहे.ही अमुल्य देणी शिवाजी महाराजांचे ऋण फेडू शकत नाही.त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार आजही प्रेरीत करतात.


हे राजांचे वैशिष्टपुर्ण गूण प्रजेला आत्मसन्मानाने जगण्यासाठी मानसिक सामर्थ्य मिळाले होते.म्हणून महाराष्ट्रातच काय इतर राज्यातही शिवाजी महाराजांची वेगळीच किर्ती होती.कारण शिवाजी महाराजांचे कर्तृत्वाला महत्व दिले होते.

 छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव महापुरुष होते की त्यांनी माताभगिणीस मनापासुनी आदर सन्मान दिला त्याच्या रक्षणार्थ सदैव तयार असायचेत्यांनी निष्ठापुर्वक व्यवस्थापणा करून जनतेची मने जिंकली,शिवाजी खरे जनतेचे हितचिंतक होते परंतू त्यांनी कधीच लाचारी शिकविली नाही, लढून जगणे,जगून मरणे या कर्तबगारीने त्यांची धोरण होती,कष्ट करून माणुसकीनं जगण्याची शिकवण दिली. व्यसनात दंग होवून बसून खाणे किंवा मोफत मिळण्याची अपेक्षा करणे व अख्ख आयुष्य दु:खी करणे ही गोष्ट त्यांना कधीच आवडलेली नाही .त्यांनी आपल्या जनतेलाही आळशी बणवले नाही ,सन्मानाने जगणे ,लढून मरणे हिच शिकवण दिली म्हणुन इतिहासात त्यांची शुरवीर ख्याती जगभर पसरून

प्रलयंकारी त्यांच्या कार्याची शौर्य गाथा अमर झाली. 


Rate this content
Log in