Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

"सामर्थ्य देणारे आईबाबांचे

"सामर्थ्य देणारे आईबाबांचे

2 mins
462


आपल्याला आठवतो तो काळ, लहानपणी आपण कसे रडत असायचो आणि सर्व लोकांना नादी लावायचो. मला आठवतंय, जेव्हा कधी मी लहानपणी खेळताना पडली तर, खूप गळा ताणून रडायला लागायची. किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे जखम होताच, आकांडतांडव करायची. आई-बाबा मला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवून माझं लक्ष इकडे-तिकडे कुठेतरी केंद्रित करायचे. म्हणायचे काही झालं नाही आणि आपणही त्या नसलेल्या वस्तूकडे किंवा त्या आभासी वृत्ताकडे बघत आपलं दु:ख विसरुन जायचो आणि पुन्हा खेळायला, हसायला लागायचो. ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई-बाबा हळूच पाय आपटून मारायचे. आणि त्या जागेकडे वस्तूकडे डोळे वटारून रागवायचे आणि असं केल्यावर आपल्यालाही आनंद व्हायचा, वाटायचं की आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो. असं आपलं लहानपण आणि अशी आपली कृती असायची. 


पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसतसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्दाही बोलणं बंद केलं, खरंच ते प्रेम आणि त्यावर ठेवलेला विश्वास किती प्रगाढ होता. मिळतंय का पुन्हा जीवनात असं बालपण? आणि मिळतं का आई-बाबांचं ते प्रेम, वात्सल्य, ममत्व आपल्याला किती पोरके झालो आपण या विभिन्न, अलौकिक जगाला.


मोठं झाल्यावर वाटायला लागलं हा काय पोरकटपणा होता तो, असं फूक मारुन आई-बाबा आपले दुःख घालवायचे, आपण नाही का त्यांचे दु:ख फुंकर मारून दूर करु शकत? पण तो विचारच आपल्या मनात येणंच बंद झालंय. पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते. ती जखम फूक मारल्यानी नाही बरी व्हायची, तर त्या हळुवार फुंकरीमधल्या विश्वासाने बरी व्हायची. 


खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा मस्ती करायला तयार व्हायचो. 


जसे मोठे झालो तसे आपण आपल्या जगात शाळा-कॉलेज, वेगवेगळ्या छंदात, स्पर्धेत, व्यवसाय, पैसा या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये गुरफटत जातो. कधी कधी आपण आपल्या छंदासाठी पण वेळ देवू शकत नाही. करियर घडवताना अनेक व्यत्यय येतात. कधी शारीरिक, कधी मानसिक तर कधी हृदयात शल्य जोपासावं लागतं. अनेक गोष्टीमध्ये मीनमेख काढू लागतो, जाती राजकारण, कधी व्यसनाधिनता, किंवा गरीबी ही तर अतिव दुख देणारी असते. आयुष्यात अनेक जीवघेण्या गोष्टींना समोर जावं लागतं. रोज नवीन आव्हाने समोर येऊ लागतात. कृत्रिम जगणं व बनावटीपणा जीवनात येतो.


ते आई-बाबांचे शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपले दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे शब्द होते. कधीतरी वाटतं की कितीही मोठं झालो आणि त्या लहानपणीच्या अदृष्य वलयात पुन्हा जाऊन आणि पुन्हा या नियतीशी लढायला सज्ज असायला हवं. यालाच संसार म्हणतात.


Rate this content
Log in