Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

साहित्यिकाची सेवा सर्वात श्रेष

साहित्यिकाची सेवा सर्वात श्रेष

3 mins
524


   *"साहित्यिकाची सेवा सर्वात श्रेष्ठ दान"*


साहित्यिक समाजाचे भूषण असतात. साहित्य निर्माण करणारे साहित्यिक समाजाचे आधारस्तंभ असतात. विश्वामध्ये ज्या मोठमोठया क्रांत्या झाल्या,त्याचा पाया साहित्यिकांनीच रचला आहे. साहित्यिकांच्या लेखण्या तलवारीची धार आहे. त्यांच्या प्रेरणादायी,सखोल विचार धारेमुळे ती नदीच्या प्रवाहासारखी उत्स्फूर्तपणे आपल्या लेखणीतून कुठल्या कुठे रमतात.


  साहित्यिक हा एक अफलातून निर्मित मानव असतो.त्याला फक्त शब्दच आणि फक्त शब्दच आठवतात. खातांना,पितांना,कोणचेही कार्य करत असतांना कविता करीत असतात.नेमक कशी काय घटना जन्माला येते,हे ही सांगतांना साहित्यिकला सुचत नाही. खरे साहित्यिक फार दुर्मिळ झालेले आहेत.


    साहित्यिकांचे डोके इतरांपेक्षा वेगळे असते.एक प्रकारे त्यांच भावविश्व अती संवेदनात्मक असते.त्यांना फक्त एकच ध्यास असतो, तुफान वेगाने साहित्य रचने.कधी रात्ररात्र जागून लिहितात.चांगले साहित्यिक प्रसिद्धीच्या मागेपण नसतात.कधी-कधी साहित्यिक जगातून निघून गेल्यावर त्यांचे साहित्य उघडकीस येत असते.आणि त्यांची निष्ठा, महत्ता साहित्यात प्रसिद्ध होत असते.


     साहित्यिक आगळावेगळा निर्मितीकार असतो. स्वतःच्या प्रतिभेतून नवनविन कल्पनांना जन्मास घालत असतो.कधी,कुठे ,कशी सुचेल याचा काहीच नियम नसतो. कधी रस्त्याने, कधी गर्दीत, कधी चालताने, कधी ही अमुक वेळी त्यांना सुचेल हे स्वतः पण ठामपणे सांगू शकत नाही. तशी कवींच्या संवेदनशील मनावर एखाद्या बाह्य किंवा अंतस्थ: परिस्थितीचा आघात होतो आणि साहित्य बाहेर निघते. तिचा आवेग हा त्या भावनीक आघाताच्या तिव्रतेवर ठरत असतो. भावना या अनेक प्रकारच्या असतात, कधी राग,कधी आनंद, कधी द्वेष, कधी चीड, तर कधी हास्य अनेक भावनेचा संग्रह ती 


आपल्या ह्रदतात घेवून बसतात  


    साहित्यिक रशिया,फ्रान्स,चीन सारख्या देशांमध्ये जनता अन्यायी,अत्याचारी राजसत्तेविरुध्द पेटून उठली आणि बदल घडवून आणला.भारतामध्ये पोलीस सैनिक,शेतकरी,महिला,अल्पसंख्याक, प्रबोधनकार यांच्याकरीता अत्यंत वाईट दिवस आले आहेत.राजकीय मंडळी या लोकांविरोधात बिनकामाचे वक्तव्ये करीत आहे, साहित्यिकांवर हल्ले होत आहे,सत्य सांगितले म्हणून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जात आहे.


     साहित्यिक हा भावनेच्या तळागाळात जावून तारतम्य जुळवत असतो.आणि तसेच एखाद्याच्या साहित्य वाचताना तोंडातून वाहचा शब्द निघतो तेंव्हा साहित्यिकांच्या आयुष्याचे सार्थक होत असते. नविन गीतरचना जर का कोणाला आवडली तर त्या कवीचे ह्रदय गलबलुन डोळ्यात अश्रृ येतात. त्या भावनेला यथार्थ रुपात ऐकल्यावर अनेक रात्र तो जागुन सतत नवरचनांना घडवतो, मढवतो, श्रृंगारतो, आपल्या बाळाला आईवडिल जसे साकारतात,लाड करतात कौतुक करतात,तश्या पद्धतिने कवी आपली कविता गोंजारत आपली वाट प्रशस्त करत असतात.त्यापासून त्यांना काहिच मुल्यमापण नसत.तरीपण ती लिहितच असतात.         


आपल्या कविता ही कवींच्या भावना अविष्काराचे मूर्तीमंत स्वरूप असते. कविता जन्म घेताना कवी ज्या मानसिक भावना आवेगातून जात असतो, त्याच भावनेतून जर ऐकनाऱ्यांनी किंवा वाचणाऱ्यांनी ती आत्मसात केली तर?..धनार्जन मिळवल्याचे समाधान मात्र नक्कीच त्यांना मिळत असते. प्रेक्षक,वाचक साद देतीलच अस नाही. त्यांच्या मनाला भावेल अस नाही. सर्वांची मन सारखी नसतात. कारण साहित्यिक आणि वाचक यांचे स्वतंत्र भावविश्व असते.


कवितेत कवीने मांडलेला एखादा प्रसंग किंवा शब्द,ओळ वाचकाला आवडत नाही, मात्र कवीने मांडलेला प्रसंग, शब्द किंवा कथा ही कवीने ज्या पूर्वपार्श्वभूमीवर मांडलेली असते. ती पार्श्वभूमी प मात्र वाचाऱ्याना,ऐकणाऱ्यांना माहीत नसते.


    साहित्यिकांच्या जीवनाविषयीच्या जाणिवा असतात. जेंव्हा कुठे काही कमी जास्त होताना दिसते, ती प्रहार करायला लागते, कुठे व्यंगावर बोट ठेवते, कुठे उपरोधिक टिप्पनी करते, कुठे शाबासकीची थाप देते, कुठे हास्याची कारंजी फुलविते, कुठे प्रोत्साहनाचे अमृत देते, तर कुठे जगण्याला नवी दिशा देते, जीवनाला नव आकार देते. आणि या सर्व गोष्टी साहित्यिक करत असतो. त्यांची लेखणी म्हणजे एक क्रांतिकारक शस्र असते.अद्भूत करणारी आश्चर्यकारक अविष्कार असतो. रोंगटे उभे करणारे भयानक नाट्य साकारत असतात. साहित्यिक आपल्या जीवनपटावर नवनविन शोध, बोध, क्रोध, मौन छटा लोकांना समर्पण करीत असतात. हिच त्यांची सेवा आपल्या लोकांसाठी.

    त्यात कोणाला मनोरंजन तर कोणाला जीवन मिळतं असतं साहित्यिकाची सेवा सर्वात श्रेष्ठ दान" आहे



Rate this content
Log in