साधना
साधना
काळाच्या ओघात मनाची पानगळ होऊ नये.याची काळजी आपणच घ्यायला हवी. शेवटच्या श्वासापर्यंत, ती आपलीच जबाबदारी असते. पण जसे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, तसेच मनाची हिरवाई, म्हणजे उताविळपणा, उत्श्रुखल वागणं, बोलणं नक्कीच नाही.
मनाला कलात्मक आणि सकारात्मक स़स्काराची गोडी लागली की, त्याची रुची, छंद, ओढ उंचीकडेच जाते. ईश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर जगात, आवर्जून जपाव्यात अशा अनेक गोष्टी आहेत.निसर्गातील माणसाच्या व्यक्तीमत्वातले , सौंदर्य टिपणारी नजर , एकदा का तयार झाली की, मनाचा तजेला कधीच कमी होत नाही.
शेवटी वय नावाचं बंधन, परिमाण हे शरिराला लागू पडतेपडते, मनाला नाही. ते निरंतर चिरतरुण राहू शकतं. पण ते तस ठेवणं, हे आपल्याच हातात असतं. उच्च अभिरुची, अध्यात्मिक साधना, आणि सुसंगती या तिन्ही गोष्टी मनाची आत्म्याशी मैत्री होण्यासाठी पुरेशा असतात.
संघर्ष तेव्हाच होतो. जेव्हा मन आणि आत्म्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. पण एकदा का दोघांच्या समाधानाची दिशा एक झाली की हा संघर्ष संपून उरतो. ती फक्त शांतीची जाणीव......
