Pallavi Udhoji

Others

1  

Pallavi Udhoji

Others

ऋणानुबंधच्या कुठून पडल्या गाठी

ऋणानुबंधच्या कुठून पडल्या गाठी

3 mins
561


ऋणानुबंध हा शब्द मनाला आधार देणारा दिलासा देणारा शब्द आहे. आज प्रत्येक जण आपल्या कर्माने जन्माला येतो. त्याचे जन्माला येतात प्रत्येकाशी नाते जुळते त्याचे ऋणानुबंध जोडले जातात. पोटात असताना त्याचे नाते आपल्या आईशीजोडले जाते. तिच्या मनाचे धागे आपल्या जीवाशी विणले जाते. ती आपल्या मुलाला चांगले संस्कार घेऊन लहानाचे मोठे करते. आज जन्माला येणारे मूल हे केवळ तो आपल्या कर्माने जन्माला येतो. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणूस ऋणानुबंध मध्ये बांधला गेला आहे त्याचे प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या नात्याने ऋणानुबंध जोडला गेला आहे या जगातील व्यवहार सुद्धा ऋणानुबंध चालतो आपल्या कुटुंबात सुद्धा बहीण-भाऊ आहेत त्यांच्यात प्रेम, माया,ममता, हे केवळ ऋणानुबंध जोडले गेले. ऋणानुबंध यामुळे जीवाला जीव देणारे मित्र निर्माण होतात. हे कशामुळे होते तर तुम्ही चारचौघात संबंध वाढवतात म्हणून यामुळेच रक्ताचे नाते नसले तरी ते केवळ तुमच्या प्रेमामुळे एकत्र आलेले असतात.


आज माणूस मानसिक तणावाखाली जगतो आहे. माणसाची मानसिक स्थिती बदलली की त्याला नातीगोती प्रेमाभाव रहात नाही. अशा स्थितीत तो आपल्याला त्यापासून दूर जातो. अशा स्थितीत त्याला प्रेमाची गरज असते. त्याच्या पाठीवर कुणी तरी प्रेमाने हात फिरवण्याची त्याला गरज वाटू लागते. कधी कधी तो मानसिक तणावाखाली इतका खेचला जातो की स्वतःची ओळख विसरून जातो. या अशा स्थितीमध्ये आपापसातले ऋणानुबंध हे त्या व्यक्तीला पूर्वस्थिती मध्ये आणू शकतात एवढी ताकत आहे ह्यात. ऋणानुबांधसाठी फक्त रक्ताची नाती आवश्यक नाही तर ऋणानुबंधमध्ये मित्र मैत्रिणी असतात हे नाते पण तेवढेच महत्त्वाचे असतात.

या नात्यांमध्ये कधीकधी ताण तणाव असतो. त्याचे कारण अगदीच क्षुल्लक असतात फक्त ते समजून घेणे हे ज्याच्या त्याच्या हातात असता. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतात एखाद्या वाऱ्यासारखे फुंकर मारून सुखाचा ओलावा देतात तर दुःखाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वाऱ्यासारखी चटके देऊन जातात. आयुष्यात आलेली सुखदुःख ही झोपळ्यासारखी मागे जातात तर त्याचं वेगाने पुढे निघून जातात.


आयुष्याच्या दोन बाजू असतात आपण त्या वेळेत मोडू.  एक चांगली तर दुसरी वाईट. एखाद्याच्या जीवनात जर वाईट वेळ आली तर त्यानंतर चांगली वेळ येईल. हा पाठशिवणीचा खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो फक्त त्याला धीराने तोंड देणे हे ज्याचा त्याला करावं लागतं पण तोंड देण्यासाठी माणसातले ऋणानुबंध कामी येतात. अरे, सुखात सगळे साथ देतात पण दुःखात कोणीही नसतो अशा वेळेस त्याच्या मित्र त्याची साथ हवी हवीशी वाटते. प्लंबर नळ दुरुस्त करून त्या नळाचे पाणी थांबवू शकतो पण डोळ्यातले पाणी थांबणारा कोणीतरी हवा असतो तुमच्याजवळ काही नसेल तर एकच गोष्ट हवी ती म्हणजे संयम.यश मिळवायचे असेल सुख मिळवायचे असेल तर फक्त संयम हवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो तुम्हाला तारून नेईल.


कोणाकोणाच्या आयुष्यात एखादी गोड व्यक्ती येते ती व्यक्ती त्याला योग्य सल्ला देते, तू कुठे चुकते, तुला काय करायला हवा ही दिशा दाखवते. या दिशा दाखवणार्या व्यक्तींना तुम्ही प्रेमाने जपा एखाद्या क्षुल्लक कारणाने त्यांना तोडून टाकू नका कारण तुमच्या जवळ उद्या सगळं असेल पण ही गोड माणसं नसतील तर तुमच्या आयुष्याला काही अर्थच नसेल. हे उजाड कोरडा वाळवंट अनुभवण्यापेक्षा तुमच्या हिरवळ बागेची काळजी म्हणजे या गोड माणसाची काळजी घेणे तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात वाईट दिवस येतात त्या दिवसांना सामोरे जा हे अनुभवल्याशिवाय त्यांना चांगल्या दिवसाची किंमत कळणार नाही.


आजकाल लोक ऑनलाईनवर वस्तू विकतात एक गोष्ट तुम्ही करा तुम्ही तुमचा अहंकार ऑनलाइनवर विका तो कोणीही विकत घेणार नाही तेव्हा तुम्हाला समजेल की आपण किती क्षुल्लक गोष्ट स्वतःजवळ बाळगत होतो. अरे, शेवटी मी हेच म्हणेल ऋणानुबंधाच्या या प्रेमाच्या गाठी हळुवार जपा आणि त्याच्या प्रेमाने सांभाळ करा मग ही विण कशी घट्ट होईल बघा.


Rate this content
Log in