Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Ujwala Rahane

Others


3  

Ujwala Rahane

Others


#रंगाची आगळी वेगळी कहाणी

#रंगाची आगळी वेगळी कहाणी

1 min 169 1 min 169

जिवनाची रंगसंगती आईच्या नजरेनेतून!.. 

   ऐका रंगदेवा तूमची कहाणी!लहाणपणापासून मनावर ठसा उमटून राह्यलेली. आटपाट नगर होतं, तिथे रंग नावाची एक वसाहत होती.सगळे मिळून मिसळून राहत होते. अगदी सुखासमाधाने पण त्यांच्या सुखाला ग्रहण लागले. मग प्रत्येकाची एक वेगळीच कहाणी सूरू झाली.रंग प्रत्येकाच्या मनातले.वेगवेगळ्या नजरेतले हे रंग माझ्या आईच्या नजरेतले...

 

आईने सांगितलेले रंग सूखी संसाराचे!सासर हे सूबक रांगोळी सारखे सजवायचे,ठिपके कितीही आसले तरी,सूबकता मात्र असायला हावी, रंग कल्पकतेने भरायचे, रंगसंगतीत सूबकता आणि मनाची समरसता असायला हावी. प्रत्येक रंगाची जीवनात ओळख वेगळी, पतीपत्नीच्या नात्यात आंबटगोड चवीबरोबर, गुलाबी रंगाची उधळण. मैत्रीच्या नात्याला सप्तरंगाची किनार. प्रेमाचा रंग थोडा हटके, प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात स्वकल्पनेतून साकारणारा. असो ही रंगरंगाची उधळण आगळी वेगळी.

 

रंगाचीसुध्दा मनमानी कोणता रंग कोणत्या रंगात मिसळून रंगसंगती साधायची ह्याची जागरुकता ठेवायची.

 कारण पारदर्शक रंग स्वच्छ मनाचा. ही जान कधीच नाही विसरायची.जीवन हे आसेच विविध रंगाने सजवायचं रंगाची उधळण मात्र सावधगिरीने करायची. प्रेमाच्या रंगाची उधळण केली तर तो कायम मनात मिसळवून घेईल ह्रदयात कायम घर करेल. रासायनिक रंगाची उधळण आज नाही तर उद्या धुऊन जाईल.

 

ही रंगाची किमया वेगळी जादुई स्वभावदर्शन दर्शवणारी मनाच्या रंगात हरवून जाणारी. खुप काही शिकवणारी रंग कोणतेही आसो फक्त रंगसंगती सुसह्य होणे महत्वाचे, मग नात्याची आसो वा रांगोळीचे.

 

आता तूच ठरवायचं रंगाचे हे गुपित तूच उलगडायचं. आईने सांगितलेली रंगाची ही कहाणी आजूनही स्मरणात नी, आचरणातही या अप्रतिम रंगाची कहाणी रंग रंगी सूफळ संपूर्ण!.. ऊज्वलाच्या लेखनीतून रंगाची आगळीवेगळी किमया!


Rate this content
Log in